१२१ |
भाऊ माझा दादा, बहिण माझी ताई |
----- रावांसाठी सोडली प्रेमाची आई |
१२२ |
असंख्य तारे नभात पाहावेत निरखून |
----- रावांसारखे पती वडिलांनी दिले
पारखून |
१२३ |
काचेच्या पेल्यात सुखदुःखाचं पेय |
----- रावांना किर्ती मिळावी हेच माझे
ध्येय |
१२४ |
द्वारकेत क्रुष्ण, अयोध्येत राम |
----- रावांचे चरण हेच माझे चारही धाम |
१२५ |
कुबेराच्या भांडारात हिरे-माणकांच्या राशी |
----- रावांचे नाव हिच माझी अयोध्या काशी |
१२६ |
नाशिक केले, पंढरपूर केले, करायची राहिली काशी |
----- रावांचे नाव घेते ----- ची भाची |
१२७ |
काचेच्या अलमारीत गणपतीची मुर्ती |
----- राव बसले पुजेला मी ओवळते आरती |
१२८ |
सर्व दागिन्यात श्रेष्ठ काळे मणी |
----- राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी |
१२९ |
हाताने करावे काम मुखाने म्हणावे राम |
----- रावांचे चरण हेच माझे चारही धाम |
१३० |
सासु-सासरे ज्ञानी,
आई-वडिल सदगुणी |
----- रावांच्या नावाने
गळ्यात घातले काळे मणी |
१३१ |
अडचणीच्या वेळी कामात
पडते साठवण |
----- राव इथे नसले कि
त्यांची येते आठवण |
१३२ |
२०० शे ची दमनी, ३०० चा
बिछाना |
----- राव बसले धुरीवर
चंद्र सुर्य दिसेना |
१३३ |
काचेची बांगडी केसापेक्षा
बारीक |
----- रावांचे नाव घेते
आज आहे ----- तारीख |
१३४ |
आता वाजले सहा |
----- राव म्हणतात
माझ्याकडे एकदा तरी पहा |
१३५ |
चांदीची कुयरी हळदी कुंकवाने भरावी |
----- रावांची सेवा जन्मोजन्मी घडावी |
१३६ |
चहा केला नेऊन दिला, दुधाने भरले कप |
----- रावांसाठी केले अठरा वर्षे तप |
१३७ |
पोथी, पुराणे वाचून बोध होतो मनाला |
----- रावांचे नाव घेते वटसावित्रीच्या
सणाला |
१३८ |
चिकन सुपारी फोडावी दाताने |
----- रावांचे काकण सोडावे उजव्या हाताने |
१३९ |
रिमझीम पाऊस पडे मोत्याचा सुटला वारा |
----- रावांच्या घरी येताना डोळयाला
लागतात धारा |
१४० |
सोन्याच्या बेसरीत पाचूचा खडा |
----- राव अन माझा जन्माचा जोडा |