पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे

 

पान नंबर

१०

११

१२

१३

१४

१५

१६

१७

१८

१९

२०

२१

२२

२३

२४

२५

२६

२७

२८

२९

३०

३१

३२

३३

३४

३५

३६

३७

३८

३९

४०

४१

४२

४३

४४

४५

 

 

 

पतीने पत्निचे नाव घेण्याचे उखाणे
 
पान नंबर

 

 

 

पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे

२२१

अंगणातील तुळस म्हणजे पावित्र्याचे स्थान
------------ रावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान

२२२

मनातल्या भावना दिसतात डोळ्यांत

मी बघते आरशात तर ---------- रावच दिसतात मला माझ्या डोळ्यांत

२२३

मुके झाले शब्द ओठी लज्जेचे बंधन
----------- नावाभोवती कशी करू उखाण्याची गुंफण

२२४

सागर तेथे सरिता कवी तेथे कविता
------------ रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाकरिता

२२५

गळ्यात गळसरी नाकात घातली नथ
---------- च्या साथीने ओढीन संसाराचा रथ
२२६ दिल्ली का कुतूबमिनार, दौलताबाद का चान्दमिनार
हैद्राबाद का चारमिनार ------- मिया से मेरे जीवन में सदाबहार
२२७ फुलासारखं शील त्याला कीर्तिचा सुगंध
---------- चा सहवास हाच माझा आनंद
२२८ उगवले अरुण उषेला आली लाली
---------- रावांच्या जीवनात मी भाग्यशाली
२२९ रत्नजडित सिंहासन मखमली गालिचे, सासुबाईंच्या पोटचे वन्संच्या पाठचे
-------- राव झाले आमचे विसरा बरे तुमचे
२३०  नजरानजर झाली छोट्याशा बोळात
दोघेही हसलो ओठातल्या ओठात
बघता बघता वरमाला पडल्या गळ्यात
--------- रावांचं नाव घेते मैत्रिणिच्या घोळक्यात
२३१ गजाननाची क्रुपा गुरुचां आशीर्वाद
------- रावांचे नाव घ्यायला आज करते सुरुवात
२३२ आली आली सक्रांत घ्या सौभाग्याचं वाण
----- राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खाण
२३३ तारुण्याच्या वाटेवर मिळाली मैत्रिणींची साथ
संसाराच्या वळणावर मिळाला -------- रावांचा हात
२३४ सुखदुःखाच्य़ा ऊनपावसात चालतो संसाराचा खेळ
--------- रावांचे नाव घेते ---------- ची वेळ
२३५ कर्ता करविता परमेश्वर त्यावर टाकते मी भार
------- रावांचे नाव घेते कर देवा संसार नौका पार
२३६ पती पत्नी असतात सुखदुःखाचे साथी
-------- रावांचे नाव घेते आशीर्वाद असु दयावा माथी
२३७ कळत नाही माझेच मला आहे स्वप्न कि भास
------- रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास
२३८ गुलाबाचे फुल गणपतीला वाहीले
------ रावांसाठी ------- गाव पाहीले
२३९ रातराणीच्या सुगंधाने आसमंत झाले मोहीत
------- रावांना आयुष्य मागते सासुसास-यासहीत