पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे

 

पान नंबर

१०

११

१२

१३

१४

१५

१६

१७

१८

१९

२०

२१

२२

२३

२४

२५

२६

२७

२८

२९

३०

३१

३२

३३

३४

३५

३६

३७

३८

३९

४०

४१

४२

४३

४४

४५

 

 

 

पतीने पत्निचे नाव घेण्याचे उखाणे
 
पान नंबर

 

 

 

पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे

५८

श्रावणात महादेवाला दुधाचा अभिषेक
------- रावांच्या नावाने बेल वाहिला एकशे एक

५८

इंग्रजी भाषेत गवताला म्हणतात ग्रास

------- रावांचे नाव घ्यायला वाटत नाही त्रास

५८

विदयेचे माहेरघर आहे म्हणतात पुणे
------- रावांच्या संसारात नाही मला उणे

५८

गुलाबाच्य़ा फुलांचा लाजवाब सुगंध
------- रावांना केले मी ह्रदयात बंद

५८

तानाजी शिवाजी जिवलग मित्र
------- रावांनी आणले माझ्यासाठी मंगळसुत्र
५८ चांगली पुस्तके आहेत माणसाचे मित्र
------- रावांच्या सहवासात रंगविले संसाराचे चित्र
५८ ज्ञानदानाने करते मी कर्तव्यपुर्ती
------- रावांच्या शब्दांनी मिळते मला स्फुर्ती
५८ गीतात जसा भाव, फुलात तसा गंध
------- रावांबरोबर जुळले रेशमी बंध
५८ महादेवाच्या मंदीरात उदबत्तीचा वास
------- रावांना घालते करंजीचा घास
५८ श्रावणधारेच्या वर्जवाणीत प्रुथ्वी बनते अंजली
------- रावांच्या सहवासात मी तुळस रंगविली
५९ नेत्राचे निरांजन लावते पापणीच्या ताटी
------- राव आणि माझ्या ऋणानुबंधाच्या गाठी
५९ माप ओलांडून ग्रुहप्रवेश करते
------- रावांचे नाव घेऊन सौभाग्य मागते
५९ नीलवर्णी आकाशात  लागली चाहूल
------- रावांच्या संसारात पडले पहिले पाऊल
५९ सासरचे निरांजन माहेरची फुलवात
------- रावांचे नाव घेण्यास करते सुरुवात
५९ कोल्हापूरच्या देवीपूढे हळदी कुंकवाच्या राशी
------- रावांचे नाव घेते --------- च्या बारशाच्या दिवशी
५९ विजेचे वर्तन ढ्ग करती गडगड
------- रावांचे नाव घेताना होई माझी गडबड
५९ श्याम सावळा सखा भक्तांचा कैवारी
जीवन माझे सुखी ------- रावांच्या संसारी
५९ संसाराच्या अंगणात सुखदुःखाचा खेळ अविनाशी
------- रावांचा उत्कर्ष होवो हेच मागणे हो देवापाशी
५९ निसर्गाला नाही आदि आणि अंत
------- राव आहेत मला मनपसंद
५९ सदसदविवेक बुध्दिला असे शिक्षणाचे  वरदान
------- रावांच्या संसारात देईन सर्वाना मान