७८० |
मंगळागौरीसाठी जमवली
सोळा प्रकारची पत्री |
------- रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या
रात्री |
७८१ |
नको सोनं, नको मोती,
नको मला चंद्रहार |
------- रावांचे ज्ञान
नी कर्तुत्व हेच माझे अलंकार |
७८२ |
खुप पाहिली तीर्थक्षेत्र, पवित्र वाटते
काशी |
------- रावांचे नाव घेते
-------- च्या दिवशी |
७८३ |
केतकीच्या वासाने नाग होतो धुंद |
------- रावांमुळे
सारं घडलं पण शब्द नाहीत आभारा |
७८४ |
इंद्रधनुच्या झुल्यावर मन झोके घेई |
------ रावांच्या संसारी
बालक्रुष्ण येई |
७८५ |
ताटभर दागिन्यांपेक्षा माणसे असावी घरभर |
------- रावांचे नाव घेते
आर्शीवाद द्यावा जन्मभर |
७८६ |
कोकिळाच्या कुंजनाने लागते वसंताची चाहूल |
------ रावांबरोबर टाकते
संसारात पाऊल |
७८७ |
द्राक्षाच्या वेलीची दाट पसरते सावली |
------ रावांना जन्म देणारी
धन्य ती माऊली |
७८८ |
देशाच्या स्वातंत्र्यासाठी विरांनी घेतली
उडी |
------ रावांच्या नावाने गळयात
बांधते मंगळसुत्राची जोडी |
७८९ |
देशाच्या स्वातंत्र्यासाठी सावरकरांना
झाली शिक्षा |
------ रावांकडे मागितली मी
सौभाग्याची भिक्षा |
७९० |
देवा ब्राम्हणांच्या साक्षीने घेतला माझा
हातामध्ये हात |
------ रावांची लाभली मला साता
जन्माची साथ |
७९१ |
झाड डोले, वेल डोले, डोलतो वनश्री |
------- रावांचे नाव घेऊन झाले
मी भाग्यश्री |
७९२ |
प्रेमळ माझे आई वडील, वत्सल सासु सासरे |
------- रावांच्या घरी येणार
आता तारे हसरे |
७९३ |
निलमणी आकाशात चंद्राची
प्रभा |
------- रावांच्या
नावामुळे कुंकवाची शोभा |
७९४ |
सुवासिनीचं पहिल व्रत
मंगळागौरीची पुजा |
------- रावांचे नाव घेणं म्हणजे गोड
सजा |
७९५ |
निलमणी आकाशात लक्ष्मी
करते वास |
------- रावांना घास घालते करंजीचा घास |
७९६ |
चंद्र सुर्य
नक्षत्रांनी शोभा येते नभाला |
------- रावांच्या प्रेमाचा सुगंध
माझ्य़ा मनाला |
७९७ |
सरस्वतीच्या देवळात
तांदुळाच्या राशी |
------- रावांचे नाव घेते
-------- च्या दिवशी |
७९८ |
प्रसन्न माझे घरकुल
साधे, इथे शांती नांदे |
------- राव मला पती लाभले भाग्य थोर
माझे |
७९९ |
रात्री फुलराणी देते
सुगंध |
------- रावांच्या जीवनात नेहमीच असतो
आनंद |