३२० |
इंग्रजी भाषेत
पाण्य़ाला म्हणतात
वाँटर |
------- रावांचे नाव घेते ------- ची
डाँटर |
३२१ |
आम के पेड पर बैठे थे बंदर |
------- रावजी का घर है स्वर्ग से सुंदर |
३२२ |
पूर्णा नदीच्या काठावर क्रुष्णा वाजवितो
बासरी |
------- रावांसोबत आले मी सासरी |
३२३ |
मुंबई राजधानी आहे महाराष्ट्राची |
------- राव आहेत तर कमी नाही कशाची |
३२४ |
आधुनिक स्वयंपाक घरात शोभते डायनिंग टेबल |
------- रावांच्या नावासमोर माझ्य़ा गावाचे
लागले लेबल |
३२५ |
आपले राष्ट्रगीत आहे जन - गण - मन |
------- रावांना अर्पण केले तन - मन - धन |
३२६ |
चांदीच्या चमच्याने वाढते मी मीठ |
घाबरु नका ------- रावांचा संसार करीन मी
नीट |
३२७ |
मंदिराच्या गाभा-यात विठ्ठलाची मुर्ती |
------- रावांची होवो सगळीकडे किर्ती |
३२८ |
कशी बाई कोकीळा कुहू कुहू बोले |
------- रावांनी आणली सोन्याची कर्णफुले |
३२९ |
पेरुची फोड दिली पिंज-यातल्य़ा पोपटाला |
------- रावांचे नाव घेते चंद्र तारे
साक्षीला |
३३० |
मंद मंद गंध घेताना झाले मी धूंद |
------- रावांचे नाव घ्यायचा लागला मला
छंद |
३३१ |
गळयात मंगळसुत्र, मंगळसुत्रात डोरलं |
------- रावांचे नाव माझ्या ह्रुदयात कोरलं |
३३२ |
सासु सास-यांनी काम केलं पुण्याचे |
------- रावांना दान दिले मला जन्माचे |
३३३ |
पिवळा पितांबर श्रीक्रुष्णाच्या अंगावर
घातला |
------- रावांच्या जीवनासाठी स्त्री जन्म
घेतला |
३३४ |
मंगलदेवी, मंगलमाते वंदन करते तुला |
------- रावांचे नाव घेते अंखड सौभाग्य दे
मला |
३३५ |
सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत
घराण्यात आले |
------- रावांशी लग्न करुन मी सौभाग्यवती
झाले |
३३६ |
नील नभाच्या तबकात नक्षत्रांचा हार |
------- रावांचा स्वभाव फारच उदार |
३३७ |
प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची |
रावांच्या साथीने सुरूवात करते सहजीवनाची |
३३८ |
प्रेमाचे कच्चे धागे खेचती मागे पुढे |
------- रावांच्या साथीसाठी माहेर सोडावे
लागे |
३३९ |
निळया नभात चंद्राचा प्रकाश
|
------- रावांवर आहे माझा विश्वास |