८४० |
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत |
------- रावांच्या छायेत झाले
मी ही भाग्यवंत |
८४१ |
ऋण काढून सण करणे आहे दुषण |
------- रावांचे नाव हेच माझे
भुषण |
८४२ |
संसाराच्या आमच्या कसलीच नाही वाण |
------- राव म्हणजे रुप-गुणांची
खाण |
८४३ |
क्रुष्ण म्हणतो राधेला आता जरा हास |
------- रावांना घालते
------- चा घास |
८४४ |
गौतमाच्या शापाने अहिल्या झाली पाषाण |
------- रावांचे
नाव घेते सौभाग्य हेच माझे निशाण |
८४५ |
शरदाच्या चांदण्यात चंद्र करतो अम्रुताचा वर्षाव |
------ रावांच्या यशाने झालाय
त्यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव |
८४६ |
सासु-सास-यांच्या छायेत मला नाही कशाची
कमी |
------ राव हेच माझे सर्वस्वाचे
स्वामी |
८४७ |
चांदीच्या अडकित्याला हिरेमोती जोडले |
------ रावांसाठी आई वडिल सोडले |
८४८ |
------ रावांच्या कर्तुत्वाची
पाहून चढती कमान |
त्यांची पत्नी असण्याचा मला आहे अभिमान |
८४९ |
राम, लक्ष्मण, सीता तिघे निघाले वनी |
------- रावांचे
नाव पडो सर्वांच्या कानी |
८५० |
निसर्गाला कधी नाही अंत |
------- राव
आहेत मला मनपसंत |
८५१ |
सर्वस्वाचे देऊन दान मुक्त मी झाले |
------- रावांच्या
सहवासात आनंदाने न्हाले |
८५२ |
घराला होती खिडकी, खिडकीत होती वीट |
------- रावांना
झाली दिठ तर चपलीत केली नीट |
८५३ |
चेहरा आहे मानवी मनाचे दर्पण |
------- रावांना
केले मी सर्वस्व अर्पण |
८५४ |
सुखी माझ्या संसार वेलीवर डोलताहेत दोन
सुंदर फुलं |
------- रावांनी
माझ्या सुखाचं केलं नव दालन खुलं |
८५५ |
मातापित्यानी वाढवलं मनासारखे शिक्षण दिलं |
सर्व सुखाच्या संसारात
------- रावांनी
मला स्वामिनी केलं |
८५६ |
अजान व्रुक्षाखाली ज्ञानेश्वरी वाचून केली
किर्ती |
------- रावांचे
नाव घेते वटसावित्रीच्या दिवशी |
८५७ |
छोटसं घरकुल माझं सामावून घेते सा-यांना |
------- रावांची
प्रेमळ साथ त्रुप्त करते मनाला |
८५८ |
हळद लावते कुंकु लावते वाण घेते घोळात |
------- रावांचे
नाव घेते सवासिनींच्या मेळयात |
८५९ |
वसंताच्या चाहूलीने कोकीळा लागते गाऊ |
------- रावांच्या
नावाचा नाही वाटत बाऊ |