३८० |
गौरीहर पुजले अन बोहल्यावर चढले |
------- रावांच्या सुखासाठी संसारात गढले |
३८१ |
१२ वर्षे तुळशीला प्रेमाने घातले पाणी |
देवतेच्या वरदानाने झाले ------- रावांची
राणी |
३८२ |
------- रावांची कन्या झाली -------
पंतांची सून |
------- रावांच्या राज्य़ात नाही कशाची उण |
३८३ |
सौभाग्याचे अलंकार म्हणजे काचेचे चुडे |
------- रावांचे नाव घेते सुवासिनी पुढे |
३८४ |
काश्मीरच्या नंदनवनात नाचतो मोर |
------- रावांसारखे पती मिळाले भाग्य माझे
थोर |
३८५ |
नागपुरची संत्री कोकणातले नारळ |
------- रावांचे नाव घेते साधे आणि सरळ |
३८६ |
एकनाथाच्या घरी हरी पाणी भरतो कावडीने |
------- रावांचे नाव घेईन मी आवडीने |
३८७ |
प्रांजळपणे बोलणे, मनमोकळे हसणे |
------- रावांच्या सहवासात कशाला हवे रुसणे
? |
३८८ |
पती पत्नी असतात सुखदुःखाचे साथी |
------- रावांचे नाव घेते जगदंबे वरद हस्त
असु दे माथी |
३८९ |
माहूर गडावर रेणुकेची वस्ती |
------- रावांना मिळावे आयुष्य जास्ती |
३९० |
पित्याने दिली विद्या मातेने दिले
ग्रुहशिक्षण |
------- राव मिळाले हेच माझे भुषण |
३९१ |
वसंत ऋतुच्या आगमनाने कोकिळा गाते गाणी |
अर्पण करते आयुष्य ------- रावांच्या चरणी |
३९२ |
फुलला पळस रानोरानी, मोहरला आंबा पानोपानी |
------- राव माझे धनी मी त्यांची
अर्धांगिनी |
३९३ |
शितल आहे चंदन वारा आहे मंद |
------- रावांना सिनेमाचा भारीव छंद |
३९४ |
आहे हौशी नणंद, प्रेमळ आहे जाऊ |
------- रावांच्या गुणांचे गोडवे किती गाऊ |
३९५ |
गणपतीला दुर्वा, शिवाला बेल |
------- रावांच्या संगतीत बहरली संसाररुपी
वेल |
३९६ |
गुढीपाडव्याच्या सणाला पुरण्पोळीचा मान |
------- रावांच्या सहवासात विसरते मी भूक
तहान |
३९७ |
अमावस्येच्या रात्री चांदोबाचं लपणं |
------- राव हेच माझं गुलाबी स्वप्न |
३९८ |
क्रुष्णाच्या हातात सोनेरी बासरी |
------- रावांचे नाव घेताना सदा मी हसरी |
३९९ |
स्वप्नातला गुलाब गालात हसला |
------- रावांचे नाव घेण्यास मान कसला |