८२० |
सासु-सास-यांची छाया,
आई वडिलांची माया |
मी तर आहे ------- रावांची
जाया |
८२१ |
ज्ञानेशांची ओवी, मोरोपंताची आर्या |
मी तर आहे ------- रावांची
भार्या |
८२२ |
नव्या नवरीचा आज उतरला साज |
ख-या अर्थाने ग्रुहिणी ------- रावांची
झाले आज |
८२३ |
सहवासाने वाढते संसारात रंगत |
------- रावांचे नाव घेताना
वाटते मला गंमत |
८२४ |
चांदीची चुल सोन्याचा विस्तव |
------- रावांचे आले दोस्त तर
माडीवर जाऊन बस |
८२५ |
या झाडावरुन त्या झाडावर उडत होते पक्षी |
------- रावांचे नाव घेते चंद्र
सुर्य साक्षी |
८२६ |
पुणं तिथं काय उणं म्हणतात सारी जणं |
------- रावांनी केलं सार्थ
माझं जिणं |
८२७ |
नको मला सोनं चांदी, नको मला शालु शेला |
------- रावांच्या जीवनासाठी
देह अर्पण केला |
८२८ |
भ्रमराच्या गुंजारवे मुग्ध झाली कमलिनी |
------- रावांची पत्नी झाले
आजच्या शुभदिनी |
८२९ |
थोडा गुण सोन्याचा, थोडा गुण सोनाराचा |
------- रावांनी केला माझा
संसार सुखाचा |
८३० |
तांब्याच्या घागरी चकचक घासल्या |
------- रावांच्या बहिणी तबला
पेटीवर नाचल्या |
८३१ |
राम, लक्ष्मण, सीता तीन मुर्ती साक्षात |
------- रावांचे नाव घेते नीट
ठेवा लक्षात |
८३२ |
संसारात करावी लागते सगळयांनाच तडजोड |
पण
------- रावांची लाभली छान मला
जोड |
८३३ |
आता निघाल्या प्लास्टीकच्या खुर्च्या |
------- रावांच्या बहिणी जशा
खुरासनी मिरच्या |
८३४ |
माहेत सोडून येताना डोळयात आसू |
------- रावांच्या प्रेमळ
संसारात ओठावर असतं हासु |
८३५ |
सत्यवानासाठी सावित्रीने केला यमाचा
पिच्छा |
------- राव सुखी राहोत हिच
माझी इच्छा |
८३६ |
पुजा केली मनोभावे, गौराई म्हणे काय हवे |
------- राव नी माझ्य़ा संसाराला
देवी तुझे आशीर्वाद हवे |
८३७ |
दाग नको, दागिना नको, नको चंद्रहार |
------- रावांचं नाव हाच माझा
अलंकार |
८३८ |
परिसाच्या संगतीने झाले लोखंडाचे सोने |
------- रावांच्या क्रुपेने
लाभले सौभाग्याचे लेणे |
८३९ |
मंगळसुत्राच्या वाटयांनी जोडले सासर माहेर |
------- रावांनी दिला मला
सौभाग्याचा आहेर |