पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे

 

पान नंबर

१०

११

१२

१३

१४

१५

१६

१७

१८

१९

२०

२१

२२

२३

२४

२५

२६

२७

२८

२९

३०

३१

३२

३३

३४

३५

३६

३७

३८

३९

४०

४१

४२

४३

४४

४५

 

 

 

पतीने पत्निचे नाव घेण्याचे उखाणे
 
पान नंबर

 

 

 

पतीने पत्नीचे नाव घेण्याचे उखाणे

९०६ ता-यांचं लुकलुकणं चंद्राला आवडलं,
-------- मी जीवनसाथी म्हणून निवडलं
९०७

विज्ञान युगात माणुस करतोय निसर्गावर मात

-------- चा अर्धांगिनी म्हणुन घेतला मी माझ्या हातात हात

९०८ चंद्र आहे चांदणीचा सांगाती
-------- आहे माझी जीवनसाथी
९०९ चौकोनी आरशाला वाटोळी फ़्रेम
माझ्या लाडक्या -------- वर माझे खरे प्रेम
९१० निसर्गाला नाही आदी नाही अंत
------- आहे माझ्या मनपसंत
९११ चित्रकाराने केली फ़लकावर रंगाची उधळण
-------- चे नाव भासे जणू माणिक मोत्यांची उधळण
९१२ कपाळाचे कुंकु जशी चंद्राची कोर
-------- च्या मदतीवर माझा सगळा जोर
९१३ पुणं तिथं का उणं म्हणतात सारी जणं
-------- न केलं सार्थ माझं जिणं
९१४ कळी हसेल फुल उमलेल, मोहरुन येईल सुगंध
-------- च्या सोबतीत गवसेल जीवनाचा आनंद
९१५ खडी साखरेचा खडा खावा तेव्हा गोड
-------- च्या रुपात नाही कुठेच खोड
९१६ श्रीमंत माणसांना असते पैशाची धुंदी
-------- चे नाव घेण्याची ही पहिलीच संधी
९१७ रसाळ पाहिजे वाणी स्त्री पाहिजे निर्मला
-------- च्या नावाचा लागला मला जिव्हाळा
९१८ हि-याचा कंठा मोत्याचा घाट
-------- च्या हौशीसाठी केला सगळा थाट
९१९ गुलाबाचे फ़ुल गणपतीला वाहीले
-------- च्या साठी -------- गाव पाहीले
९२० आंबे वनात कोकीळा गाते गोड
-------- आहे माझ्या तळहाताचा फ़ोड
९२१ लाखात दिसते देखणी, चेहरा सदा हसरा
-------- च्या रुपापुढे अप्सरेचा काय तोरा
९२२ मुखी असावे प्रेम हातामध्ये दया
-------- सोबत जडली माझी माया
९२३ वरमथळा खाली बातमी, वर्तमान पत्री रीती
-------- चे नाव घेतो अजोड आमची प्रीती
९२४ रखरखत्या वैशाखात प्रेमाचा धुंद वारा
जीवनाचा खेळ समजला -------- मुळे सारा
९२५ इंद्राची इंद्रायणी, दुष्यंताची शकुंतला
-------- नाव ठेवले माझ्य़ा प्रिय पत्नीला