पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे

 

पान नंबर

१०

११

१२

१३

१४

१५

१६

१७

१८

१९

२०

२१

२२

२३

२४

२५

२६

२७

२८

२९

३०

३१

३२

३३

३४

३५

३६

३७

३८

३९

४०

४१

४२

४३

४४

४५

 

 

 

पतीने पत्निचे नाव घेण्याचे उखाणे
 
पान नंबर

 

 

 

पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे

४०

नेत्रीच्या निराजंनात तेवते प्रितीची फुलवात
------- रावांच्या साथीने संसाराला करते सुरवात

४१

यौवनात पदार्पण केले सरले माहेरचे अंगण

------- रावांचे नाव घेऊन सोडते मी कंकण

४२

संसाररुपी कांदबरीत रेखल्या भावनेच्या ओळी
------- रावांचे नाव घेते ------- च्या वेळी

४३

सागराला भेटण्याकरिता खळखळत जाते सरिता
------- रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाकरिता

४४

लज्जेचे बंधन असले तरी नाव आहे ओठी
------- रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाकरिता
४५ भवसागरात तरंगते संसाररुपी नौका
------- रावांचे नाव घेते सर्वजण ऐका
४६ आहा रे जीवा करु नको हेवा
------- रावांच्या चरणांची करेन सेवा, तर मिळेल मोक्षाचा ठेवा
४७ भक्तांच्या भेटीसाठी वेडा झाला नंदाचा नंदन
------- रावांचे नाव घेऊन मंगळागौरीला करते वंदन
४८  घना निळा सुसाट वारा
------- राव छेडीती माझ्या ह्रदयाच्या तारा
४९ सासरी आहेत माझ्या सासु-सासरे अन दीर
------- रावांना आवडते रव्याची खीर
५० दोन वाती, दोन ज्योती, दोन शिंपले दोन मोती
------- रावांची राहो मी अखंड सौभाग्यवती
५१ नयन रम्य बागेत नाचत होता मोर
------- रावांसारखे पती मिळाले भाग्य माझे थोर
५२ नीलवर्ण आकाशात पक्षी उडाले सात
------- रावांची अन माझी जन्मोजन्मीची साथ
५३ निळया निळया आकाशी उगवला शशी
------- रावांचे नाव घेते ------- च्या दिवशी
५४ झुळझुळ वाहे चंद्रभागा, मंद चाले होडी
परमेश्वरा सुखी ठेव माझी अन -------- रावांची जोडी
५५ चांदीच्या निरंजनात मनोभावे लावते फुलवात
------- रावांच्या सोबत करते सुखी जीवनाला सुरुवात
५६ फुलात फुल जाईचे, प्रेमात प्रेम आईचे
------- राव आहेत माझ्या प्रितीचे
५७ घरावर परडं, परडयात गहू
तुमच्या आग्रहासाठी ------- रावांचं नाव किती वेळा घेऊ
५८ कांजीवरम साडी बनारसी खण
------- रावांचं नाव घेते आज आहे ------- सण
५९ केस माझे कुरळे सावली पडली गालावर
------- रावांचे नाव घेते मैत्रिणींच्या बोलावर