६१ |
साता जन्मीची पूण्याई फळाला आली आज |
----- रावांच्या हाताने ल्याले
मंगळ्सुत्राचा साज |
६२ |
पत्रिका जुळ्ल्य़ा योग आला जूळून |
----- राव पती मिळावे म्हणून नवस केला
कुलदेवतेला स्मरुन |
६३ |
संसार सागरात प्रीतीच्या लाटा |
----- रावांच्या सुखदु:खात उचलीन मी अर्धा
वाटा |
६४ |
आईवडिलांच्या आशिर्वादाने आला भाग्याचा दिवस |
----- राव पति मिळावे म्हणुन कुलदेवतेला केला नवस |
६५ |
सीतेची पतिभक्ती, सावित्रीचा निग्रह |
----- रावांचे नाव घेण्यास नको मला आग्रह |
६६ |
लाल चूटूक मेंदी, हिरवागार चुडा |
----- रावांसाठी जीव झाला माझा वेडा |
६७ |
आनंदाच्या लाटांनी भरले मानस सरोवर |
आयुष्याचा प्रवास करीन ----- रावांच्या
बरोबर |
६८ |
आकाशात चमकतो तारा, अंगठीत चमकतो हिरा |
----- राव पति मिळाले हाच भाग्योदय खरा |
६९ |
सोन्याच्या साखळीत खुलतात काळे मणी |
----- राव झाले माझ्या सौभाग्याचे धनी |
७० |
मनोभावे प्रार्थना करुन पुजला गौरीहर |
----- रावांचा सहवास लाभो जन्मभर |
७१ |
प्रेमाचा दिला हुंडा, मानाची केली करणी |
जीवनाचे पूष्प वाहिले ----- रावांच्या
चरणी |
७२ |
चांदीच्या ताटात पक्वानांची रास |
----- रावांना देते लाडूचा घास |
७३ |
रंगबेरंगी रांगोळ्यांनी पंगतीला शोभा येते |
लाडूचा गोड घास ----- रावांना देते |
७४ |
मंगळागौरीची पूजा मनोभावे करते |
----- रावांसाठी दीर्घायुष्य मागते |
७५ |
चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल |
----- रावांच्या जीवनात टाकते पहिले पाऊल |
७६ |
नातेवाईक जमले केले मोलाचे आहेर |
----- रावांच्या सहवासासाठी सोडले मायेचे
माहेर |
७७ |
उंबरठयावरचं माप पायांनी लोटते |
----- रावांच्या घरात भाग्याने प्रवेश
करते |
७८ |
आई, बाबा येते आशीर्वाद दयावा |
----- रावांचा सहवास जन्मभर लाभावा |
७९ |
----- रावांच्या बरोबर मन गेले गांगरुन |
आईबाबांच्या आशिर्वादाची शाल घेते पांघरुन |
८० |
मोत्याची माळ, सोन्याचा साज |
----- रावांचे नाव घेते मंगळागौर आहे आज |