५६० |
टिळकांचा केसरी
अत्र्यांचा ललकार |
------- रावांची
विदवत्ता हाच माझा अलंकार |
५६१ |
कवींच्या कवितेत
मोरोपंतांची आर्या |
------- रावांचे नाव
घेते ------- भार्या |
५६२ |
गणेशाला आवडती
रक्तवर्ण कमळे |
------- रावांसोबत
माहेर विसरुन रमले |
५६३ |
चांदीच्या तबकात खडीसाखरेचे खडे |
------- रावांचे नाव घेते गौरीहरापुढे |
५६४ |
सातासमुद्रापलीकडे
राधा-क्रुष्णाचा खेळ |
------- रावांचे नाव
घेते सांयकाळची वेळ |
५६५ |
स्त्रियांचे कर्तव्य पतिसेवा हेच |
------- रावांचे आयुष्य वाढो भुषण मला
हेच |
५६६ |
नेत्राच्या निरांजनात
प्रितीची वात |
------- रावांच्या
नावास केली सुरुवात |
५६७ |
रामाने राज्य दिले,
भरताने नाकारले |
------- रावांनी
सौभाग्य दिले ते मी स्वीकारले |
५६८ |
मणीमंगळसुत्र
सौभाग्याची खूण |
------- रावांचे नाव
घेते------- ची सून |
५६९ |
चांदीच्या तबकात हळदी
कुंकवाचा काला |
------- रावांच्या
नावांस आरंभ केला |
५७० |
भिल्लीणीच्या रुपाने
शंकर झाले मोहीत |
------- रावांचे नाव
घेते सासुसास-यांसहीत |
५७१ |
जय जवान जय किसान
गर्जतो सारा देश |
------- रावांच्या
जीवाकरिता घातला सौभाग्याचा वेष |
५७२ |
वडीलांचा आशिर्वाद
मातेची माया |
------- रावांसारखे पती
मिळाले ही ईश्वराची दया |
५७३ |
काँग्रेसच्या पायात
सत्याग्रहाची बेडी |
------- रावांच्या
जीवावर घातली मंगळ्सुत्राची जोडी |
५७४ |
दत्तात्रयाला शोभे गाय,
महादेवाला शोभे नंदी |
------- रावांच्या
जीवावर मी आहे आनंदी |
५७५ |
तुळशीला घालते पाणी,
विष्णूची करते शांती |
------- रावांचे
आयुष्य वाढो हीच ईश्वराला विनंती |
५७६ |
यमुनेकाठी क्रुष्ण
खेळत होता बासरी |
------- रावांमुळे आज
मी आले सासरी |
५७७ |
अंगणी टाकला सडा
त्यावर घातली रांगोळी |
------- रावांचे नाव
घेते हळदी कुंकवाच्या वेळी |
५७८ |
ज्योतीला मिळेल ज्योत
त्यात पडेल प्रकाश |
------- रावांच्या
जीवनात ठेंगणे होईल आकाश |
५७९ |
गुलाबाचे फुल दिसायला
छान |
------- रावांचं नाव
घेते ठेवते आपला मान |