५२० |
नाव घ्या नाव घ्या सगळे
झाले गोळा |
------- रावांचे नाव
आहे लाख रुपये तोळा |
५२१ |
पौर्णिमेच्या दिवशी
प्रुथ्वीवर पडतो चंद्राचा प्रकाश |
ग्रुहलक्ष्मी
सहभाग्यलक्ष्मी येवो ------- रावांच्या घरात |
५२२ |
जीवनासाठी कला म्हणून
कलेवर केली मात |
कलात्मक जीवन
जगण्यासाठी ------- रावांच्या हाती दिला हात |
५२३ |
सूर छेडिता शब्द उमटले नवे |
-------- रावांचे नाव घेते अखंड
सौभाग्य मला हवे |
५२४ |
नभी उमटते सप्तरंगी
इंद्रधनुष्य |
------- रावांचे नाव
घेते त्यांना मिळो दीर्घायुष्य |
५२५ |
नवीन निघाल्या वाचून घ्यावा बोध |
------- रावांच्या जीवनात लागला सुखाचा
शोध |
५२६ |
सोन्याचे पंचपाळ त्याला
नागाचा वेढा |
------- रावांचा आणि
माझा साता जन्मांचा जोडा |
५२७ |
जिथे घराची स्वच्छता
तिथे घराची शोभा |
------- रावांच्या
पाठीमागे परमेश्वर उभा |
५२८ |
लग्नानंतर प्रत्येक
स्त्री होते जबाबदार |
------- राव माझे
दिसतात फारच रुबाबदार |
५२९ |
राजहंस पक्षी खातो
मोत्यांचा चारा |
------- रावांच्या
संसारात नाही दुःखाचा वारा |
५३० |
काचेच्य़ा बशीत
संत्र्याची फोड |
------- रावांचे बोल
अम्रुताहूनी गोड |
५३१ |
चांदीच्या सुपात फणसाचे
गरे |
------- राव दिसतात बरे,
पण वागवतील तेव्हा खरे |
५३२ |
कौतुकी सासुसासरे, हौशी
नणंद |
------- रावांचे नाव
घेताना होतो खुप आनंद |
५३३ |
पाँलीस्टरचा कपडा
कातरीने कापला |
------- रावांच्या
जीवनात मला आनंद वाटला |
५३४ |
रोज माझ्या अंगणात
रांगोळी सजते |
-------- रावांच्या
डोळयात माझेच प्रतिबिंब दिसते |
५३५ |
विद्येचा नसावा आभिमान
पैशाचा नसावा गर्व |
------- रावांचे नाव
घेते ऐकत राहा सर्व |
५३६ |
भुंग्याच्या सहवासात
विकसते कळी |
------- रावांच्या
साक्षीने लिहिते सौभाग्याच्या ओळी |
५३७ |
असावे नेहमी हसतमुख
बोलावे नेहमी गोड |
------- रावांच्या
संसाराला ------- ची लाभली जोड |
५३८ |
मंगळ्सुत्राच्या दोन
वाटया म्हणजे सासर माहेरचा संगम |
------- रावांच्या
सहवासाने झाला सौभाग्याचा उगम |
५३९ |
बरेच दिवसांची आकांक्षा
आज झाली साकार |
------- रावांनी केलाय
माझा पत्नी म्हणून स्वीकार |