२६० |
वेलदोडयाच्या वेलावर हवा सुटली गार |
------- रावांचे नाव घेते रात्र झाली फार |
२६१ |
देवासमोर काढली रांगोळी मोराची |
------- रावांचे नाव घेते स्नूषा थोरांची |
२६२ |
न चुकता टी. व्ही. वर बघत असते रामायण
रविवारी |
न कंटाळता ------- रावांचे नाव घेते
------- वारी |
२६३ |
विठ्ठलाच्या देवळात भक्तांची दाटी |
------- रावांचे नाव घेते सा-यांसाठी |
२६४ |
लावीत होते कुंकु त्यात सापडला मोती |
------- राव पती मिळाले म्हणून भाग्य मानू
किती |
२६५ |
जाई, जुई, चमेली, शेवंती, नागचाफा |
------- रावांचे नाव घेऊन माळते सोनचाफा |
२६६ |
हिंदमातेच्या डोक्यावर सोन्याची जाळी |
------- रावांचे नाव घेऊन बांधल्या
मुंडावेळी |
२६७ |
सोन्याचं मंगळसुत्र सोनाराने घडवलं |
------- रावांचे नाव घेताना ------- नी
अडवलं |
२६८ |
सत्यभामेने श्रीक्रुष्णाची केली सुवर्णतुला |
------- रावांचे नाव घेते आशीर्वाद दया मला |
२६९ |
समुद्राला कुणी म्हणे सागर, कुणी म्हणे
रत्नाकर |
------- राव आहेत माझे जन्मोजन्मीचे
प्रियकर |
२७० |
चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा |
------ रावांच्या नावाचा घालते सौभाग्याचा
चूडा |
२७१ |
दहयाचे केले श्रीखंड, दूधाचा केला खवा |
------- रावांचे नाव घेते नीट लक्ष ठेवा |
२७२ |
केसात घालते फुल, डोळयात घालते काजळ |
------- रावांचे नाव घेऊन वाहते फुलांची
ओंजळ |
२७३ |
प्रीतीचा व निष्ठेचा पसरु दे सुगंध |
------- रावांच्या जीवनात निर्मीन मी आनंद |
२७४ |
लग्नासारख्या गोड दिनी आज्ञा
मोडून कशी रूसू |
------- रावांना घास
देताना मला येई गोड हसू |
२७५ |
माहेरचे दिवस पाखरासारखे
उडाले |
स्म्रुतीठेवा त्यांचा
घेऊन ------- रावांच्या घरी आले |
२७६ |
हिरव्या हिरव्या रानात
मोहक पिवळी फुले |
------ रावांचे नाव
घेताना मन हिंदोळयावर झुले |
२७७ |
गोपाळ क्रुष्णाला आहे
बासरीचा छंद |
------ रावांच्या जीवनात
आहे मला आनंद |
२७८ |
कात, चुना, लवंग पानाचा
विडा |
------- रावांच्या नावाचा
भरते लग्नाचा चूडा |
२७९ |
खवळला समुद्र लाटा
काठोकाठ |
------- रावांचे नाव घेते
------- च्या पाठोपाठ |