पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे

 

पान नंबर

१०

११

१२

१३

१४

१५

१६

१७

१८

१९

२०

२१

२२

२३

२४

२५

२६

२७

२८

२९

३०

३१

३२

३३

३४

३५

३६

३७

३८

३९

४०

४१

४२

४३

४४

४५

 

 

 

पतीने पत्निचे नाव घेण्याचे उखाणे
 
पान नंबर

 

 

 

पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे

६६

दस-याच्या सणाला केला साखरभात
------- रावांचे नाव घेते --------- पंतांची नात

६६

कँप्टन लक्ष्मी नेताजी सुभाषचंद्र बोस

------- रावांचे नाव घेऊन जयहिंदचा करु घोष

६६

दवबिंदुचा जन्म आहे विरण्यासाठी
------- रावांशी लग्न केले मी सुख जोपसण्यासाठी

६६

आल वारा, गेला वारा रुपये घ्या पारखून
राजाच्या दरबारी --------राव कारकून

६६

पूण्यात जन्मले, गंगेत न्हाले
आणि -------- रावांच्या जीवासाठी मुबंईत आले
६६ सोन्याची पेटी सदरेला दाटी
------- राव बसले पेढीवर तेथे राजा आला भेटी
६६ पाण्याच्या हंडयावर फुलांचे झाकण
------- रावांच्या हातात सोन्याचे कंकण
६६ झिरी मिरी पाऊस लागे मोत्यांच्या धारा
------- रावांच्या छत्रीला मोत्यांचा तुरा
६६ गंधाने भरली कपोळ त्यात पडली समुर
आणि ------- च्या घराण्यात -------- राव चतुर
६६ दारी होती तुळस तिला घालीत होते पळी पळी पाणी
आधी होते आई-बाबांची तान्ही, मग झाले -------- रावांची राणी
६७ साजुक तुपात नाजुक चमचा
-------- रावांचे नाव घेते आग्रह तुमचा
६७ अबोलीचा गजरा रुपयाला एक
-------- रावांचं नाव घेते -------- घराण्याची लेक
६७ ज्याचा जसा भाव तसा त्याला देव दिसे
-------- रावांची प्रतिमा नेहमी माझ्या मनी वसे
६७ शुटींग, शर्टींग, कटपिसेस
-------- राव माझे मिस्टर मी त्यांची मिसेस
६७ सुर्याला कुणी म्हणतात रत्नाकर, कुणी म्हणतात भास्कर
--------  राव माझे जन्मोजन्मीचे प्रियकर
६७ संसार रुपी करंडा मनोरुपी झाकण
-------- रावांचे नाव घेते आर्शिवाद द्यावा आपण
६७ एकदानी केली बिंदी केली करायची राहिली सरी
-------- रावांच्या नावासाठी काळी पोत बरी
६७७ शेगावच्या गजानना वंदन करते तुला
-------- रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य मला
६७  मंदिरात वाहते फुल आणि पान
-------- रावांचे नाव घेऊन राखते सर्वांचा मान
६७ चंद्राचा झाला उदय अन समुद्राला आली भरती
-------- रावांच्या प्रेमाने सर्व दुःख हरती