६२० |
पंढरपुरच्या यात्रेत
हरीनामाचा गजर |
------- रावांचे नाव
ऐकण्यासाठी सर्वजण हजर |
६२१ |
श्रीक्रुष्णाच्या
गळयामध्ये वैजयंतीमाला |
------- रावांचे नाव
घेते मंगल दिन आला |
६२२ |
आरक्त गालावर उमटले
लज्जेचे भाव |
------- रावांनी घेतला
माझ्या अंतःकरणाचा ठाव |
६२३ |
सकाळच्या वेळी बागेत फुल तोडतो माळी |
------- रावांचे नाव घेते आता
तुमच्यावर आली पाळी |
६२४ |
यमुनेच्या तीरावर
ताजमहालाची इमारत |
------- रावांचे नाव
घेण्यास नाही मी हरत |
६२५ |
महादेवाच्या पुढे असतो नंदी |
------- रावांचे नाव घेऊन देते
तुम्हांला संधी |
६२६ |
पहाटेच्या वेळी वारा
वाहतो झुळझुळ |
------- रावांचे नाव
घेताना पैजंण वाजतात खुळ्खुळ |
६२७ |
चांदीच्या तांब्याला
नागाची खुण |
------- रावांचे नाव
घेते ------- रावांची सून |
६२८ |
हिरवी बांगडी गुलाब
दास |
------- रावांच्या
ताटापूढे अत्तराचा वास |
६२९ |
लाज-या राधिकेला
कन्हैया म्हणतो हास |
------- रावांना घालते
लाडवाचा घास |
६३० |
वसंत ऋतुत कोकीळा करते
कुंजन |
------- रावांच्या
बरोबर करते लक्ष्मीपुजन |
६३१ |
चंद्राभोवती तारकांनी
धरले गोल अंगण |
------- रावांच्या
नावाने बांधले मी कंकण |
६३२ |
जमीन दुभंगुन सीता झाली
गुप्त |
------- रावांनी हार
घालुन आईवडिलांना केले मुक्त |
६३३ |
अम्रुत मुर्तीला
स्वरुप देतो कलाकार |
------- रावांचे सदगुण
हेच माझे अलंकार |
६३४ |
हळद लावते किंचीत कुंकु
लावते ठसठशीत |
------- रावांसारखे पती
मिळाले हेच माझे पूर्व संचित |
६३५ |
सीतेच्या पर्णकुटीत
लावल्या केळी |
------- रावांचे नाव
घेते पुजेच्या वेळी |
६३६ |
मेघरुपी पिंपातून टपटप
पडतात मोती |
------ रावांसारखे पती
मिळाले देवाचे आभार मानू किती |
६३७ |
रुसलेल्या राधेला
क्रुष्ण म्हणतो हास |
------- रावांचे नाव
घेते तुमच्यासाठी खास |
६३८ |
संसाररुपी देवळात
नंदादीप तेजावा समाधानाचा |
------- रावांच्या
पाठीशी आशिर्वाद असावा तुमचा |
६३९ |
यमुनेच्या डोहात
क्रुष्णा वाजवी पावा |
------- रावांच्या
जीवावर संसार सुखाचा व्हावा |