५०० |
मोठयांचा करावा मान सन्मान |
------- रावांच्या नावाने घेते सौभाग्याचे
वाण |
५०१ |
मन असावे स्वच्छ, प्रेमळ आणि पवित्र |
------- रावांच्या जीवनात राहो आनंद
सर्वत्र |
५०२ |
कपाळाला कुंकु गळयात मोत्यांचा हार |
------- रावांचे नाव घेताना आनंद होतो फार |
५०३ |
सासरच्या कौतुकात राहिले नाही काळाचे भान |
------- रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान |
५०४ |
पेटी वाजे वीणा वाजे सतार वाजे छान |
------- रावांचे नाव घेते राखून सर्वांचा
मान |
५०५ |
सत्यम, शिवम, सुंदरम साहित्याची आस |
------- रावांना घालते मी लाडवाचा घास |
५०६ |
क्रुष्ण प्राप्तीसाठी रुक्मिणीने लिहीले
पत्र |
------- रावांसाठी घातले मी मंगळसुत्र |
५०७ |
आषाढात दाटले घन मोर नाचतो होऊन विभोर |
------- रावांचे नाव घेते सर्वांसमोर |
५०८ |
चालली सप्तपदीची सात पावले |
------- रावांच्या नावाने मंगळसुत्र बांधले |
५०९ |
भावनात जन्मली कल्पना फुल गुंफीले शब्दांचे |
------- रावांचे नाव घेते मन राखून
सर्वांचे |
५१० |
प्राजक्ताच्या पायथ्याशी शुभ्र फुलांच्या
राशी |
------- रावांचे नाव घेताना मनात दाटली
खूशी |
५११ |
पुणेरी टांगा त्याला अरबस्तानी घोडे |
------- रावांचे नाव घेते सत्यनारायणापुढे |
५१२ |
देवाजवळ
करीत होते दत्ताची आरती |
------- राव आहेत माझ्या जीवनाचे सारथी |
५१३ |
जिरे साळीचा भात पिकतो मावळात |
------- रावांचे नाव घेते----- च्या
देवळात |
५१४ |
चंद्राची जशी चंद्रीका, वसिष्ठांची जशी
अरुंधती |
तशीच मी होईन -------- रावांची आवडती |
५१५ |
पानोपानी फुल फुलावे रंग गहिरे असावे |
------- रावांच्या संसारात सुख माझे हसावे |
५१६ |
शुभदिनी, शुभकाळी आली आमची वरात |
------- रावांचे नाव घेते ------- च्या
घरात |
५१७ |
थंडगार पाण्याला वाळयाचा सुवास |
------- रावांचे नाव घेते जोडी आमची खास |
५१८ |
सोन्याचे मणी रेशमात गुंफले |
-------- राव माझे वाचनात गुंतले |
५१९ |
सागरतिरी शुभ्र वाळू |
------- राव म्हणतात, चल राणी टेनिस खेळू |