३६० |
ओल्याचिंब केसांना टाँवेल दया पुसायला |
------- रावांचे नाव घेते शालू दया नेसायला |
३६१ |
डाळिंबाचे झाड पानोपानी दाटले |
------- रावांचे नाव घेताना आनंदी मला
वाटले |
३६२ |
गुलाबाचे फुल दिसायला ताजे |
------- रावांचे नाव घेते सौभाग्य माझे |
३६३ |
अंगणी होती तुळस, तुळ्शीला घालत होती पाणी |
आधी होती आईबापाची तान्ही
नंतर झाली --------- रावांची राणी |
३६४ |
दारी होता टेबल त्यावर होता फोन |
-------- रावांनी पिक्चर दाखविला हम आपके
है कौन |
३६५ |
राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार |
------- रावांनी घातला मला मंगळ्सुत्राचा हार |
३६६ |
पौर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो साजरा |
------- रावांनी आणला मला मोग-याचा गजरा |
३६७ |
चांदीचे जोडवे, पतीची खुण |
------- रावांचे नाव घेते ------- ची सून |
३६८ |
नव्हती कधी गाठभेट एकदाच झाली नजरानजर |
आई-वडिल विसरते ------- रावांसाठी सुटला
प्रीतीचा पाझर |
३६९ |
ह्र्दयात दिले स्थान तेव्हा दिला हातात
हात |
------- राचांच्या जीवनात लावते प्रीतीची
फुलवात |
३७० |
नववधू आले मी घरी जीव गेला बावरुन |
------- रावांनी मारली हाक शिणचं गेला
निघून |
३७१ |
धरला यांनी हात वाटली मला भीती |
हळूच म्हणाले -------- राव अशीच असते
प्रीती |
३७२ |
जेव्हा मी यांना पाहते चोरुन विचार करते
मुक होवून |
घडविले देवांनी ------- रावांना जीव लावून |
३७३ |
घातली मी वरमाला हसले ------- राव गाली |
थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली |
३७४ |
वय झाले लग्नाचे, लागली प्रेमाची चाहूल |
------- रावांच्या जीवनात टाकते मी पहिले
पाऊल |
३७५ |
राजहंस पक्षी शोभा देतो वनाला |
------- रावांचे नाव घेते आनंद माझ्या
मनाला |
३७६ |
सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान |
------- रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान |
३७७ |
आकाशी चमकते तारे, जमिनीवर चमकते हिरे |
------- राव हेच माझे अलंकार खरे |
३७८ |
पर्जन्याच्या व्रुष्टीने स्रुष्टी होते
हिरवीगार |
------- रावांच्या नावाने घालते
मंगळसुत्राचा हार |
३७९ |
लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा |
------- रावांचे नाव घेऊन उखाणा करते पूरा |