४२० |
शाहू राजे बांधतात कोल्हापूरी फेटा |
------- रावांच्या संसारात आहे माझा अर्धा
वाटा |
४२१ |
हिरवा शालू नेसून आले |
------- रावांच्या जीवनात समरस झाले |
४२२ |
दारात अंगण, अंगणात काढली रांगोळी |
------- रावांचे नाव घेऊन बांधते मुंडावेळी |
४२३ |
काचेच्य़ा तांब्यात सरबत आहे गार |
------- रावांचे नाव घ्यायला उशीर झाला फार |
४२४ |
मोहमाया प्रेमाची जाळी पसरली दाट |
------- रावांची सेवा करणे हीच माझी
मोक्षाची वाट |
४२५ |
चाफळया मंदीरात राम, सीता, लक्ष्मण |
------- रावांचे नाव घेऊन घालते आपोषण |
४२६ |
प्रेमाचा दिला हूंडा मानाची केली करणी |
------- रावांचे नाव घेऊन करते घरभरणी |
४२७ |
सासु सासरे प्रेमळ जावा दीर हौशी |
------- रावांचे नाव घेते ------- च्या
दिवशी |
४२८ |
निशिगंधाच्या वासाने मन झाले मोहीत |
------- रावांचे नाव घेते ------ सहीत |
४२९ |
जात होते फुलाला पदर अडकला वेलीला |
लिंबलोण कुणाला तर ------ रावांच्या गुणाला |
४३० |
यमुनेच्या तिरावर क्रुष्ण वाजवतो पावा |
------- रावांचे नाव घेते तुमचा आशिर्वाद
हवा |
४३१ |
सोनाराने मंगळ्सुत्र घडवले सोन्याच्या
साखळीवर |
------- रावांचे नाव माझ्या ह्रदयाच्या
पाकळीवर |
४३२ |
कबीर विणतो शेला देव घालतो घडी |
------- रावांच्या जीवावर मी घालते
मंगळसुत्राची जोडी |
४३३ |
दया, क्षमा, शांती प्रेमाचे माहेर |
------- रावांनी केला सौभाग्याचा आहेर |
४३४ |
एक पाय ठेवते तळयात, एक पाय ठेवते मळयात |
------- रावांचे नाव घेते सासरच्या मेळयात |
४३५ |
अमुल्य वेळी उमलली कळी |
------- रावांचे नाव घेते सायंकाळच्या वेळी |
४३६ |
देहरूपी निरंजनात प्रेमरूपी वात |
------- रावांचे नाव घ्यायला आज केली
सुरूवात |
४३७ |
शुभमंगलप्रसंगी गणेशाची साथ |
------ रावांचे नाव घ्यायला आज केली
सुरूवात |
४३८ |
श्रीमंतीने दाखवू नये श्रीमंती, गरीबांना
दयावी सवलत |
------- रावांची विद्वता हीच माझी दौलत |
४३९ |
श्रावणी सरी नंतर प्रुथ्वीची काया |
------- रावांच्या घरी मिळते माहेरची माया |