४४० |
सुवासिक पारिजात बहरो प्रितीच्या दारी |
------- रावांसाठी माहेर सोडून आले मी
सासरी |
४४१ |
१९४७ पुर्वी भारतात माजली होती आंदा-धुंदी |
------- रावांना घास घालते बासुंदी |
४४२ |
ल्याले मी आज सौभाग्याचा साज |
------- रावांचे नाव घेते नववधु रुपाने आज |
४४३ |
नागिणीच्या वेलीखाली हरीणी घेते विसावा |
------- रावांचे नाव घेते शुभार्शिवाद दयावा |
४४४ |
परमेश्वराचे सोबती सुखदुःखाचे भागीदार |
------- रावांच्या जीवनात मी आहे साथीदार |
४४५ |
काव्य तेथे कविता सागर तेथे सरिता |
------- रावांचे नाव घेते तुमच्या इच्छेकरिता |
४४६ |
सातासमुद्रापलीकडे सापडतात शिंपलेमोती |
------ रावांचे नाव घेते तुमचा मान राखूनी |
४४७ |
महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून |
------ रावांचे नाव घेते तुमचा मान राखून |
४४८ |
गर्व नसावा पैशाचा, अभिमान नसावा रुपाचा |
-------रावांना घास घालते वरण भात तुपाचा |
४४९ |
जीवनाच्या सागरावर सप्तरंगी फुल विचाराचा |
------ रावांसह सुखी होईल प्रवाससंगीत
संसाराचा |
४५० |
निसर्गावर करु पाहत आहे आजचा मानव मात |
अर्धांगी म्हणून दिला ------ रावांच्या
हाती हात |
४५१ |
जीवनाच्या कोंदणात फुलले प्रितीचे पुष्प |
------- रावांच्या नावाने घेते मी
सौभाग्याचा गुच्छ |
४५२ |
मावळला सुर्य उगवला शशी |
------- रावांचे नाव घेते डोहाळे जेवणाच्या
दिवशी |
४५३ |
शंकर पार्वतीच्या पोटी जन्मले गणराज |
------- रावांचे नाव घेते गौर बसली आज |
४५४ |
आदघर माजघर, माजघरांत पलंग, पलंगावर उशी |
------- रावांच्या जीवावर मी आहे खुशी |
४५५ |
शरयु नदीत जन्म झाला मेघदुतांचा |
------- रावांच्या जीवनात उगम झाला आनंदाचा |
४५६ |
माहेरच्या प्रागंणात वेचले
ज्ञानकण |
------- रावांचे नाव घेऊन
बांधते कंकण |
४५७ |
संसाररुपी सागरात
प्रेमरुपी सरोवर |
आयुष्याचा प्रवास करते
------- रावांबरोबर |
४५८ |
सांजवात लावतेवेळी होते
माहेरची आठवण |
------- रावांसाठी ------
ची पाठवण |
४५९ |
वाडयात सव्वाहात तुळशीचे
व्रुदांवन |
------- रावांचे नाव घेऊन
तुमचे करीते आभिनंदन |