पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे

 

पान नंबर

१०

११

१२

१३

१४

१५

१६

१७

१८

१९

२०

२१

२२

२३

२४

२५

२६

२७

२८

२९

३०

३१

३२

३३

३४

३५

३६

३७

३८

३९

४०

४१

४२

४३

४४

४५

 

 

 

पतीने पत्निचे नाव घेण्याचे उखाणे
 
पान नंबर

 

 

 

पतीने पत्नीचे नाव घेण्याचे उखाणे

९४६

शंकरासारखा पिता अन पार्वती सारखी माता
-------- राणी मिळाली स्वर्ग आला हाता
९४७

जन्म दिला मातेने पालन केले पित्याने

--------  च्या गळयात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने

९४८ वेरुळची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर
-------- आहे माझी सर्वापेक्षा सुंदर
९४९ पंच पक्वांनाच्या ताटात वाढले लाडु पेढे
-------- चे नाव घेताना कशाला हवे आढे वेढे
९५० उगवला सुर्य मावळली रजनी
-------- चे नाव सदैव माझ्य़ा मनी
९५१ क्रुष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास
--------  देतो मी लाडवाचा घास
९५२ सनई आणि चौघडा वाजतो सप्त सुरात
-------- चे नाव घेतो -------- च्या घरात
९५३ श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनुची रंगत न्यारी
-------- च्या साथीसाठी केली लग्नाची तयारी
९५४ मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट
--------  बरोबर बांधली जीवनगाठ
९५५ मोह नाही माया नाही, नाही मत्सर हेवा
-------- चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा
९५६ आई-वडील, भाऊ बहिणी, जणू गोकुळासारखे घर
-------- च्या आगमनाने पडली त्या सुखात भर
९५७ चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण
-------- चे नाव घेऊन सोडतो आता कंकण
९५८ पुढे जाते वासरु, मागुन चालली गाय
-------- ला आवडते नेहमी दुधावरची साय
९५९ संसाराच्या सागरात पती पत्नी नावाडी
-------- मुळे लागली मला संसाराची गोडी
९६० देवाजवळ करतो मी दत्ताची आरती
-------- माझ्या जीवनाची सारथी
९६१ स्वतंत्र भारताची तिरंगी ध्वजाने वाढविली शान
-------- चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान
९६२ काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशीगंध
-------- सोबत जीवनात मला आहे आनंद
९६३ नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व
-------- आहे माझे जीवन-सर्वस्व
९६४ भारत देश स्वतंत्र झाला, इंग्रज गेले पळून
-------- चे नाव घेतो जरा पहा मागे वळून
९६५ बहरली फुलांनी निशिगंधाची पाती
-------- चे नाव घेतो लग्नाच्या राती