२८० |
रजनीचा भांडार शंशाकाच्या दारी खुले |
माझे मानस मंदीर ------- रावांनी जिंकले |
२८१ |
पाटानं आणलं पाणी शेतं पिकली मोत्यावाणी |
------- रावांच्या नावचं मोल आहे
सोन्यावाणी |
२८२ |
आधी ताना आलापी मग गाऊ भैरवी |
------- रावांच्या नावाची किती सांगू
थोरवी |
२८३ |
राम, लक्ष्मण, सीता तीन मुर्ती साक्षात |
------- रावांचे नाव घेते नीट ठेवा लक्षात |
२८४ |
कण्वमुनींच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर |
------- रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर |
२८५ |
कमळांच्या फुलांचा हार लक्ष्मीच्या गळ्यात |
------- रावांचे नाव घेते सुवासिनींच्या मेळयात |
२८६ |
अश्रुपूर्ण नेत्रांनी माहेरचा निरोप घेते |
------- रावांच्या बरोबर मी ग्रुहप्रवेश
करते |
२८७ |
स्वाती नक्षत्रातील थेबांचे शिंपल्यात
होती मोती |
------- रावांच्या संगतीत उजळली
जीवनज्योती |
२८८ |
यज्ञ,
धर्म, किर्ती, ऐश्वर्य आणि संपत्ती |
------- रावांचे नाव हीच माझ्या मनाची
त्रुप्ती |
२८९ |
टपोरा मोगरा फुलला छान |
------- रावांचे नाव घेऊन राखते सर्वाचा
मान |
२९० |
पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने,
फुले |
------- रावांचे नाव घेतल्यावर चेहरा माझा
खुले |
२९१ |
काजव्यांचा प्रकाश दिसे अंधार आहे तोवर |
------- रावांचे नाव घेते आग्रह आहे तोवर |
२९२ |
चंदनाच्या पेटीला सुवर्णाच्या चूका |
------- रावांचे नाव घेते सा-यांनी ऐका |
२९३ |
सागराला आली भरती नदीला आला पूर |
------- रावांच्या प्रीतीसाठी आई-वडिल
केले दूर |
२९४ |
पौर्णिमेच्या चंद्राची उज्जवल प्रभा |
------- राव हेच माझ्या सौभाग्याची शोभा |
२९५ |
विवाहाच्या सोहळयात अत्तर गुलाबांचा थाट |
------- रावांचे नाव घेऊन सोडते
मुंडावेळीची गाठ |
२९६ |
दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस |
------- रावांचे नाव घेते हळदी-कुंकवाचा
दिवस |
२९७ |
अर्जुनाच्या रथाचे क्रुष्णाने केले सारथ्य |
------- रावांच्या घरी करीन सर्वांचे
अतिथ्य |
२९८ |
पारिजातकाचे फुल म्हणजे सौदर्याचे प्रतीक |
थोरामोठय़ांच्या आशीर्वादाने लाभले -------
रावांसारखे पती |
२९९ |
प्रतिभेचा अविष्कार म्हणजे काव्य |
------रावांच्या सहवासात आहे माझे भवितव्य |