४८० |
लक्ष्मी माते वंदन करते मनी श्रध्देचे बळ |
------- रावांच्या संसारी दे सम्रुध्दीचे
फळ |
४८१ |
जलाशयात असते जसे निर्मळ पाणी |
तशीच मी ------- रावांची सहधर्मचारिणी |
४८२ |
कोसळल्या जलधारा, धरा आनंदली रातोरात |
-------- रावांच्या सहवासात होवो सौख्याची
बरसात |
४८३ |
संध्याकाळी तूळशीपाशी मंद ज्योत तेवते |
------- दिवस म्हणून ------- रावांचे नाव घेते |
४८४ |
सर्व कार्याचा पाठीराखा विघ्नहर्ता गणेश |
------- राव हेच माझ्या जीविताचे परमेश |
४८५ |
सरस्वतीच्या मंदीरात साहित्याच्य़ा राशी |
------- रावांचे नाव घेते शुभमंगलदिवशी |
४८६ |
दोन कुल उद्धरते कन्या एक कुल उद्धरतो
पुत्र |
------- रावांच्या नावाने बांधले
मंगळसुत्र |
४८७ |
मंगल झाली प्रभात, विहंग उडले गात |
------- रावांच्या हाती दिला हात |
४८८ |
संध्याकाळच्या चंदन गंधात अधिर झाली दिशा |
-------रावांचे आयुष्य कळीकळीने उमलावे
हीच माझी मनिषा |
४८९ |
संसार सौख्याची मनामध्ये आस |
------- रावांना घालते ------ चा घास |
४९० |
राव आमचे मोठे करारी |
म्हणून तर मी घेऊ शकले उंच भरारी |
४९१ |
ज्याचा जसा भाव तशी भावना दिसते |
------- ची प्रतिमा माझ्या मनी वसते |
४९२ |
देवाजवळ सांयकाळी करेन देवाची आरती |
------- राव आहेत माझ्या जीवनाचे सारथी |
४९३ |
कपाळावर कुंकु त्याखाली हळद सजते |
हातावरच्या मेंदीत ------- रावांचे नाव
रेखाटते |
४९४ |
सुंदर काळेभोर केसात सजते गुलाबाचे फुल |
------- राव क्षमा करतात माझी प्रत्येक
भुल |
४९५ |
प्रेम दयावे प्रेम घ्यावे प्रेमाचा असावा
साठा |
------- रावांच्या सुखदुःखात माझा अर्धा
वाटा |
४९६ |
नीलवर्णी आकाशात मधुर पक्षांचा टाहो |
------- रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य
लाभो |
४९७ |
जाई-जुईच्या वेलीखाली हरीण घेते विसावा |
-------- रावांचे नाव घेते
तुमचा आशिर्वान असावा |
४९८ |
आई-वडिल करीत होते काळजी कसे मिळते घर |
----- रावांचे नाव घेते भाग्य माझे थोर |
४९९ |
शुक्राची चांदणी ढगाला देते शोभा |
------- रावांच्या पाठीवर परमेश्वर उभा |