७०० |
चांदीच्या ताटात लावते
तुपाची फुलवात |
--------रावांचे नाव
घेऊन आजपासुन करते संसाराला सुरुवात |
७०१ |
-------- रावांच्या
प्रेमाला जगात नाही तोड |
प्रभुच्या चरणी
प्रार्थना शेवट व्हावा गोड |
७०२ |
फुलफळांनी बहरलेली बाग
सर्वानाच आवडे |
-------- रावांचे नाव
घेण्यात अविट गोडी वाटे |
७०३ |
नेत्रांच्या निरांजनात प्रितीची वात |
-------रावांचे नाव
घेऊन संसाराला करते सुरुवात |
७०४ |
नील नभांगण जणु अंगठी,
चंद्र शोभे त्यातला खडा |
ईश्वर सदा सुखी ठेवो
-------- राव नी माझा जोडा |
७०५ |
नको मोहन माळ, नको हि-यांचा हार |
-------- रावांच्या जीवनात मी सुखी फार |
७०६ |
नाव घ्या नाव घ्या
आग्रह कशासाठी |
-------- रावांचे नाव
होते ओठावरती पण थांबले होते अखण्यासाठी |
७०७ |
ज्यांच्या सर्व्हिसला
होल वर्ल्ड इज रेडी |
-------- रावसाहेबांची
मी ब्युटी फुल लेडी |
७०८ |
शाळेच्या ग्राऊंडवर
खेळत होते गेम |
तिकडुन आले --------
राव त्यांनी विचारले व्हाँट इज युवर नेम |
७०९ |
सुशील माझे सासु सासरे
सुशील माझे माता पिता |
-------- रावांचे नाव
घेते -------- ची मी माता |
७१० |
वैचारीक प्रगल्भतेचे --------
राव मला लाभले |
म्हणूनी जीवनी स्वप्न
माझे साकारले |
७११ |
विचाराने सरळ मनाने
निर्मळ -------- राव मला लाभले |
सुर ताल मिळाल्याने
जीवनी स्वर्ग अवतरले |
७१२ |
सप्तपदीच्या सात
पावलांनी केली संसाराची नांदी |
-------- रावांच्या
संसारात राहीन मी आनंदी |
७१३ |
भवसागरात तरंगते
संसाररुपी होडी |
लक्ष्मीच्या क्रुपेने
सुखी राहो -------- व -------- ची जोडी |
७१४ |
विनय हाच खरा स्त्रीचा
अलंकार |
-------- रावांच्या
सहवासात होवो ध्येय-आशा साकार |
७१५ |
भुंग्याच्या सहवासात
विकसते कळी |
-------- रावांचे नाव
घेते -------- च्या वेळी |
७१६ |
मंगळागौरीपुढे हळदी
कुंकवाच्या राशी |
-------- रावांचे नाव
घेते -------- च्या दिवशी |
७१७ |
द्राक्षाच्या वेलीचे
त्रिकोणी पान |
-------- रावांचे नाव
घेते राखते सर्वांचा मान |
७१८ |
तबला वाजे, पेटी वाजे,
छान वाजे वीणा |
-------- रावांचे नाव
घेते वन्दे मातरम म्हणा |
७१९ |
लग्न करुन आनंदाने
संसार करते सुरु |
-------- राव आहेत माझे
प्राणपाखरु |