पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे

 

पान नंबर

१०

११

१२

१३

१४

१५

१६

१७

१८

१९

२०

२१

२२

२३

२४

२५

२६

२७

२८

२९

३०

३१

३२

३३

३४

३५

३६

३७

३८

३९

४०

४१

४२

४३

४४

४५

 

 

 

पतीने पत्निचे नाव घेण्याचे उखाणे
 
पान नंबर

 

 

 

पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे

६८०

वसंतातील डाळ पन्हं देती थंडावा
-------- रावांसह मला आपला आर्शिवाद हवा

६८१

श्रीक्रुष्णाने पण केला रुक्मिणीलाच वरीन

-------- रावांच्या जीवनात आदर्श संसार करीन

६८२

जीवन रुपी कांदबरी वाचली दोघांनी
-------- रावांचे नाव घेते पत्नी या नात्यानी

६८

पौर्णिमेच्या दिवशी चंद्र उगवला बरवा
--------राव बसले पुजेला मी निवडते दुर्वा

६८

असा असावा सुखी संसार जिथे दुर्दैवाला घ्यावी लागे माघार
-------- राव आहेत माझ्या जीवनाचा आधार
६८ तानसेन मेघ बरसण्यासाठी आळवित असे मेघ मल्हार
--------रावांसारखे प्रेमळ पती लाभले मला सहचर
६८ घराला असावं अंगण, अंगणात डोलावी तुळस
-------- रावांच्या नावाचा संसारावर चढवीन कळस
६८ कुंकू लावते ठळक हळद लावते किंचीत
-------- रावांचं नाव घेते हेच माझं संचित
६८ महादेवाच्या पिंडीवर संत्र्याची फोड
-------- रावांचे बोलणं साखरेहुन गोड
६८ गर्व नसावा श्रीमंतीचा अभिमान नसावा स्वरुपाचा
--------रावांचे नाव घेते संसार करेन सुखाचा
६९ रुसलेल्या राधेला क्रुष्ण म्हणतो हास
-------- रावांचे नाव घेते आज दिवस आहे खास
६९ शिवरायांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने
-------- रावांचे नाव घेते प्रेमभाव भक्तीने
६९ संसाररुपी सागरात उसळल्या लाटा
-------- रावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा
६९ एका वाफ्यातील तुळस दुस-या वाफ्यात रुजवली
-------- रावांची सारी माणसे मी आपली मानली
६९ श्रीक्रुष्णाने केले अर्जुनाच्या रथाचे सारथ्य
-------- राव आणि माझ्या संसारात होईल तुमचे आदरातिथ्य
६९ शिवाजीला जन्म देणारी धन्य जिजाऊ माता
-------- रावांचे नाव घेते आपल्या शब्दाकरीता
६९ जीवनात ही घडी अशीच राहू दे
-------- रावांची प्रीत सदैव अशीच फुलू दे
६९ माहेरचे निरांजन  सासरची वात
-------- रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरुवात
६९ कुलदेवतेला स्मरुन वंदन करते देवाला
-------- रावांचे सौभाग्य अखंड दे मला
६९ संसारात स्त्रीने नेहमी रहावे दक्ष
-------- रावांचे नाव घेते इकडे द्या लक्ष