पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे

 

पान नंबर

१०

११

१२

१३

१४

१५

१६

१७

१८

१९

२०

२१

२२

२३

२४

२५

२६

२७

२८

२९

३०

३१

३२

३३

३४

३५

३६

३७

३८

३९

४०

४१

४२

४३

४४

४५

 

 

 

पतीने पत्निचे नाव घेण्याचे उखाणे
 
पान नंबर

 

 

 

पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे

८८०

वडिलांना पडली होती काळजी कसे मिळेल घर
------- रावांसारखे शांत मिळाले वर

८८१

शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी

------- राव आहेत माझे जीवन साथी

८८२

दारी होती विहीर, विहीरीवर होते बारा हंडे
बाराहंडयावर बाराकरंडे, बाराकरंडयावर बारा वाती
------- राव माझे शंकर आणि मी त्यांची पार्वती
 

८८४

झुन झुन झुन्यात, बसली मेण्यात
कंचोळी अंगात गुलाल भांगात
जायफळ वटीत लवंगा दोळे मुठीत
हंडयावर परात, परातीत भात
भातावर तुप, तुपासारखे रुप
रुपासारखा जोडा ------- रावांना म्हणते
सारीकामे सोडा अन माहेरी चला
 
८८५ साखरेचे खाणार त्याला देव देणार
-------- रावांसाठी आज मी गौरीहर पुजणार
८८६ घरोघरी मातीच्या चुली
-------- रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली
८८७ नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा
-------- रावांसह मी बसते जेवायला
८८८ वडयाचं तेल वांग्यावर
-------- रावांचे नाव आहे माझ्या ओठांवर
८८९ ऐकावे जनाचे करावे मनाचे
-------- राव आहेत मोठया उदार मनाचे
९०० चंदनाचा पाट आणि चांदीचे ताट
-------- रावांसंगे राहण्यात आहे मोठा थाट
९०१ वासरात लंगडी गाय शहाणी
-------- रावांची झाले आज अर्धांगिनी
९०२ चार दिवस सासुचे, चार दिवस सुनेचे
-------- रावांचे नी माझे बंधन आहे सात जन्माचे
९०३ संसारातील रेशमी शालूवर प्रीतीची लावते फुलवात
-------- राव देतात मला सुखदुःखात आधार
९०४ तिरंगी ध्वजाला चंदनाची काठी
-------- रावांचे नाव घेते अखंड सौभाग्यवती
 

९०५

 
ह्रदयात असावे प्रेम, प्रेमात असावा त्याग
त्यागात असावी निष्ठा, निष्ठेत असावी क्रुती
क्रुतीत असावी कला -------- च्या संसारात काय उणे मला