पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे

 

पान नंबर

१०

११

१२

१३

१४

१५

१६

१७

१८

१९

२०

२१

२२

२३

२४

२५

२६

२७

२८

२९

३०

३१

३२

३३

३४

३५

३६

३७

३८

३९

४०

४१

४२

४३

४४

४५

 

 

 

पतीने पत्निचे नाव घेण्याचे उखाणे
 
पान नंबर

 

 

 

पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे

   रुक्मीणीने पण केला क्रुष्णालाचं वरीन
   ----------  रावांच्या साथीनं आदर्श संसार करीन

   नव्या आयुष्याची नवी नवी गाणी

   --------- च्या घराण्यात ---------- रावांची झाले मी राणी

   पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते
   ---------- रावाचं नाव घेऊन आशीर्वाद मागते

   सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही

    ---------- रावाचं नाव ह्ळुच ओठी येई

    हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी
    ------ रावांचे नाव घेते, शालू नेसून भरजरी

    शिंपल्यात सापडले माणिक मोती

    ------ रावांच्या जीवनात झाले मी सारथी

    महादेवाला बेल,विष्णूला तूळ्स
    ------ रावांचे नाव घ्यायला कसला हो आळस
    आंनदाने भरला दिन हा लग्नाचा
    ----- रावांना घास देते गोड जिलेबीचा
    मनाच्या व्रुंदावनात आंनद डोलते भावनेची तुळस
    ----- रावांच्या साथीने संसार मंदिरावर सुखाचा कळ्स
१०     आई-वडील सोडताना, पाऊल होतात कष्टी
    ----- रावांच्या संसारात करीन मी सूखाची व्रुष्टी
११     सासूबाई आहेत प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी
    ----- रावांचे नाव घेते लग्नाच्या दिवशी
१२     सुवर्णाची अंगठी, रुप्याचे पैजंण
    ----- रावांचे नाव घेते ऐका सारेजण
१३     सासरचे निराजंन माहेरची फुलवात
    ----- रावांचे नाव घेण्यास करते सुरुवात
१४     जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने
    ----- रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने
१५     माहेर जणू गंगा, सासर जणू सागर
    त्यातच एकरुप ----- रावांचे सूख निर्झर
१६     आकाशाच्या अंगणात ब्रम्हा, विष्णू आणि महेश
    ----- रावांचे नाव घेऊन करते हो ग्रुहप्रवेश
१७     पायातल्या जोडव्यात माहेरची स्म्रुती
    ----- रावांच्या स्नेहाने गेली माझी भिती
१८     सत्य प्रुथ्वीचा आधार, सूर्य स्वर्गाचा आधार
    यज्ञ देवतांचा आधार ----- राव माझे आधार
१९      मंगळ्सूत्रात राहे सासरची प्रीती
     ----- रावांचे नाव घेऊन समाधान चित्ती
२०      पित्याचे कर्तव्य संपले, कर्तव्याला माझ्या सुरूवात
     ----- रावांचे सह्कार्य लाभो, माझ्या भावी जीवनात