Back to Jokes Home

सुपरहिट जोक्स

पान नंबर

१०

११

१२

१३

१४

१५

१६

 

 

 

 

अहो जरा हसता का ?

 • दोन बायका ट्रेनमध्ये भांडत होत्या. त्यांचे भांडण खिडकी वरुन चाललं होतं. एक बाई खिडकी उघडत होती आणि दुसरी तितक्याच जोरात बंद करीत होती.

  'ही खिडकी उघडली तर मला सर्दी होईल आणि मी मरुन जाईन.' एक म्हणाली.

  ' पण खिडकी बंद ठेवली तर मी गुदमरुन जाईन,' दुसरी म्हणाली.

  आजूबाजूचे सगळेजण त्या भांडणाला वैतागले होते. पण काय करावं हे कुणालाच कळत नव्हतं.

  तेवढ्यात त्याच डब्यात बसलेला एक चुणचुणीत मुलगा पुढे आला आणि म्हणाला, 'मी सांगतो काय करायंच ते. प्रथम ही खिडकी उघडा. त्यामुळे एक बाई मरेल. नंतर बंद करा. म्हणजे दुसरी बाई मरेल आणि आपल्याला शांतता मिळेल.'

 • दोन मित्र खूप दिवसांनी एकमेकांना भेटले.

  'तुझी बायको स्वभावानं कशी आहे रे?' एकाने विचारले.

  'खूप चांगली आहे.' दुसरा म्हणाला.

  ' वा ... ऎकून बरं वाटलं.'

  ' तुझी रे' माझी बायको तर रोज माझी पूजा करते.

  ' काय म्हणतोस?'

  ' हो. रोज एकदा तरी माझ्यापुढे हात नाचवून ती म्हणते आता दिवे ऒवाळू का तुम्हाला?'

 • गणिताचे खडूस सर आडनावाप्रमाणेच खडूस होते. नदीत बुडत असतांना एका विद्यार्थ्याने त्यांना वाचवल्यावर ते त्याला म्हणाले, 'बोल, तुझ्यासाठी काय करु?'

  'सर फ़क्त एकच करा. मी तुम्हाला वाचवलं हे शाळेत कुणालाही सांगू नका. नाहीतर मुलं मलाच नदीत बुडवतील,' विद्यार्थी म्हणाला.

 • विनू एक प्रामाणिक कारकून होता. एके दिवशी त्याला पगारात २५ रुपये जास्त आले. तात्काळ तो आँफ़िसात गेला आणि आपल्या साहेबाला म्हणाला, ' साहेब, यावेळी चुकून माझ्या पगारात २५ रुपये जास्त आले आहेत.'

  साहेबांनी त्याला सांगितले, 'तुम्हाला पंचवीस रुपयांनी वाढ दिलेली आहे. चूक वैगरे काही नाही.'

  'केव्हापासून दिली?' विनूने विचारले.

  'गेल्या सहा महीन्यापासून.' साहेब म्हणाले.

  'साली!....'

  आँ, कुणाला म्हणालात?'

  'तुम्हाला नाही. बायकोला. तिनं मला हे कधीही सांगितलं नाही.'

 • एकदा एक म्हातारा माणूस देवळात गेला. तेथे देवळाचा पुजारी बसलेला होता.

  'या पेटीत पै-पैसा टाका.' पुजारी म्हणाला.

  त्या म्हाता-या माणसाने पेटीत एक रुपयाचे नाणे टाकले. 'हे पैसे जमवून तुम्ही काय करता?' त्याने पुजा-याला विचारले.

  'ते देवाचे असतात. आम्ही ते देवाला देतो.'

  'तुझं वय काय?'

  'तीस. तो पुजारी म्हणाला.

  'मी ऎंशी वर्षांचा आहे. तुझ्यापेक्षा मीच देवाकडे अगोदर जाईन, असं नाही का तुला वाटत?' एवढे बोलून त्याने ती पेटी उचलली आणि तो चालू लागला.

 • दोन दारुडे गप्पा मारत रेल्वेच्या रुळामधून चालले होते. बराच वेळ ते असेच चालत होते. थोड्या वेळाने त्यातला एकजण दुस-याला म्हणाला, ' माझ्या आयुष्यात मी जिन्याला इतक्या पाय-या बघितल्या नाहीत. थकलो रे बाबा.'

  दुसरा दारुड्या त्याच्याकडे बघत रागाने म्हणाला, ' मुर्ख कुठला. थकायला काय झालं? पाय-या काही फ़ार उंच नाहीत.'

 • तो प्रथम तुरुंगात गेला.

  तो निरक्षर होता. तरी हुशार होता.

  म्हणून त्याला तिथं लिहायला शिकवण्यात आलं.

  आता तो खोट्या सह्या करण्याबद्दल तुरुंगवास भोगतो आहे.

 • 'तुला तुमचं छोटं बाळ आवडतं?' काकांनी छोट्या बंडूला विचारलं. 'मुळीच नाही.'

  'का रे?'

  'मला भाऊ हवा होता.' 

  'का?'

  'तो माझ्याशी क्रिकॆट खेळला असता. दुसरे खॆळ खॆळला असता. हा तर नुसता रडतच असतो.'

  'मग तुझ्या आईला सांगून हाँस्पिटलमधून भाऊ घेऊन ये की.'

  'आता उशिर झाला. आम्ही हे बाळ दहा दिवस वापरलं आहे. आता बदलून कसं देतील?'

 • एका मारवाड्याचे आँपरेशन होते. आँपरेशनची सगळी तयारी झाली होती. डाँक्टर त्याला आँपरेशन टेबलावर नेणार तोच मारवाड्याने खिशात हात घातला आणि पैशांचे पाकीट काढले.

  तोच डाँक्टर त्याला म्हणाले, 'छे! ....छे! .... पैसे आँपरेशन झाल्यावर द्या. आता काही घाई नाही.'

  मारवाडी म्हणाला,' नाही मी आत्ताच पैसे देत नाही. फ़क्त तुम्ही क्लोरोफ़ाँम देण्यापूर्वी मी ते मोजून ठेवतो आहे.'

 •  'अत्रे साहेब, तुम्ही एवढे पहाडासारखे आहात, वाघासारखे शूर आहात, ग्रेट आहात, पण समजा एखादा वाघ अचानक तुमच्यापुढे येऊन उभा राहीला, तर तुम्ही काय करायंच ठरवाल?' एका अत्रे भक्ताने अत्रे यांना विचारले.

  अत्रे म्हणाले, 'मी कोण ठरवणार? काय करायचं ते वाघानेच ठरवायचे आहे.

Click Here To Send This Greetings To a Friend

 
www.shreeyoginfo.com
2007-09 All Rights Reserved