Back to Jokes Home

सुपरहिट जोक्स

पान नंबर

१०

११

१२

१३

१४

१५

१६

 

 

 

 

अहो जरा हसता का ?

 • नवीन गड्याला ठेवून कुठं पंधरा वीस दिवस झाले नाहीत तोच एक दिवस रमा त्याला मोठमोठ्यानं बोलताना दिसली. रमेशला हे मुळीच आवडलं नाही. परंतू तो गप्प राहीला.

  परंतु संधी मिळताच तो तीला म्हणाला, 'अगं कशाला उगीच त्या बिचा-याला एवढं बोललीस?'

  'तुम्हाला समजायचं नाही ते. मी मुद्दामच बोलले त्याला.' रमा म्हणाली.

  'मुद्दाम?' रमेशने चकित होऊन विचारले.

  'होय,' रमा म्हणाली, 'आज त्याला मी गाद्या, सतरंज्या, उशा उन्हात घालायला सांगितल्या आहेत.'

  'पण त्याचा काय संबध...?'

  'आहे' रमा हसून म्हणाली, 'तो रागात असला की धोपटण्याचं काम चांगल करतो.

 • साहेबांनी आपल्याला का बोलावलं असेल याची कल्पना अम्रुतरावांना काही येईना, त्यांनी भीतभीतंच साहेबांच्या खोलीत प्रवेश केला आणि दोन्ही हात मागं धरत ते अदबीने उभे राहिले.

  ' या अम्रुतराव' साहेब, अम्रुतरावांकडे पहात म्हणाले, 'अम्रुतराव, तुम्ही मला फ़ारच कंजूष समजता ना? '

  'नाही... नाही... साहेब मी तसं कधीच म्हटंल नाही.' अम्रुतराव घाबरत म्हणाले.

  'घाबरु नका अम्रुतराव,' साहेब हसून म्हणाले, ' तुमच्या कामाची जाणीव आम्हाला आहे, आम्ही त्याची कदर करतो. गेली वीस वर्ष तुम्ही प्रामाणिकपणे आणि इमानाने काम केलं आहे, त्याची कदर म्हणून मी तुम्हाला शंभर रुपयांचा हा चेक देणार आहे.'

  अम्रुतराव एकदम खूष होऊन म्हणाले, 'मी...मी... आपला फ़ार आभारी आहे. आपण ....'

  परंतू त्यांना थांबवून साहेब पुढे म्हणाले, 'आणि ह्याच प्रामाणिक पणाने जर तुम्ही पुढची पंधरा वर्षे काम केलं तर मी ह्या चेकवर सही करणार आहे.'

 • एक कम्युनिस्ट आपल्या कम्युनिस मित्राला कम्युनिझम म्हणजे काय हे सांगत होता, 'मित्रा... तो म्हणाला, एखाद्या मांजराला तू तिखट कसे खायला लावशील?'

  'दोन मार्ग आहेत,' मित्र म्हणाला, 'मी त्याची मानगुट पकडीन आणि खायला लावीन  किंवा एक मासा कापून त्या माशात तिखट भरीन आणि तो खायला देईन.'

  ' हे आपल्या कम्युनिस्ट तत्वप्रणालीच्या विरुध्द आहे. पहिल्या प्रकारात बळजबरी आहे, तर दुस-या प्रकारात त्या मांजराची फ़सवणूक आहे.'

  'मग? ' मित्राने विचारलं.

  'सोपं आहे. मी त्या मांजरीच्या शेपटीला तिखट चोळीन जेव्हा त्या शेपटीची आग होईल, तेव्हा ते आपणहूनंच शेपूट चाटायला लागेल.

 • एक नवी बिल्डिंग तयार होत होती. सगळे मजूर तेथे काम करीत होते. एक मजूर मुकादमाकडे आला आणि म्हणाला, 'माझं फ़ावडं मिळत नाही. कुणी तरी चोरलेलं दिसतंय.'

  मुकादमाने एकदा त्याच्याकडे बघितले आणि तो म्हणाला, 'काही काळजी करु नकोस जा. आज आराम कर.' तरी तो मजूज तेथेच उभा. मुकादमाने त्याला विचारले, 'काय रे काय झालं? आराम कर. आजच्या दिवसाचे पैसे तुला मिळतील.'

  'ते खरं आहे हो. पण फ़ावडे नसतांना आराम कसा करु?

  सगळे मजूर फ़ावड्यावर डोकं टेकून आराम करतात.'

 • माझी मिसेस खोटं बोलतेय अशी माझी खात्री आहे.'

  'ती कशी काय?'

  'काल दुपारी तू कुठं होतीस असं विचारताच ती म्हणाली, मी माझ्या मैत्रीणी बरोबर, कविता बरोबर पिक्चरला गेले होते.'

  'मग?'

  'खोटी गोष्ट आहे. कारण त्यावेळी मीच कविताला घेऊन पिक्चरला गेलो होतो.'

 • एक श्रीमंत माणूस रेल्वेच्या पहिल्या वर्गाच्या डब्यातून प्रवास करीत होता. आपण खूप पैसेवाले आहोत, त्यामुळे आपल्याला सगळे ओळखतात, असे त्याला वाटे, तोच तिकीटतपासनीस आला.

  'तिकीट प्लीज,' तिकीट चेकर तिकीट मागू लागला.

  'माझ्याजवळ तिकीट नाही,' तो श्रीमंत ऎटीत म्हणाला. त्याला वाटलं, तिकीट चेकर आपल्याला ऒळखेल आणि म्हणेल, 'तुम्ही? मी प्रथम ऒळखलं नाही आपल्याला.'

  पण झालं उलटंच, तो तिकीट चेकर म्हणाला, 'तुम्हाला या डब्यातून उतरावे लागेल.'

  'मला ऒळखलं नाहीस. माझा चेहरा हेच माझे तिकीट आहे.' श्रीमंत ऎटीत म्हणाला.

  'असं?' त्याचा चेहरा न्याहाळत तिकीट चेकर म्हणाला, 'मग थर्ड क्लासचं तिकीट असतांना फ़स्ट क्लासमध्ये का?'

 • रेल्वेतील कारकून आपल्या साहेबाला म्हणाला, ' या आणखी एका शेतक-याने गायीच्या संदर्भात रेल्वेला कोर्टात खेटले आहे.'

  'आपल्या एखाद्या गाडीने त्याच्या गायीला उडवलेलं दिसतंय. ती बिचारी गाय बहुतेक मेली असावी.'

  'नाही, तसं नाही साहेब, त्याची तक्रार वेगळीच आहे. तो म्हणतो की दोन स्टेशनांच्या मध्ये आपल्या गाड्या इतक्या हळू चालतात की, प्रवासी चक्क खाली उतरुन गायीचं दूध काढतात आणि पुन्हा गाडीत जाऊन बसतात.'

 • नुकत्याच मुलाखतीसाठी आलेल्या नव्या उमेदवाराला मँनेजर म्हणाला, 'तुमच्या अर्जावरुन असे दिसते की, गेल्या महीन्यात तुम्ही चार ठिकाणी नोक-या केल्यात.'

  'होय साहेब, त्यावरुन तुमच्या लक्षात येईल की, मला किती ठिकाणी बोलवतात.'

 • म्हाळसकाकू न्यायाधिशांसमोर उभ्या होत्या.न्यायाधीशांनी एकदा त्यांच्याकडे बघितले आणि विचारले 'तुमचा नवरा तुम्हाला कंटाळला आहे असं तुम्हाला का वाटतं?'

  'मला हल्ली तसंच वाटतं?'

  'किती दिवस असं वाटतं?'

  'खूप दिवस.'

  'पण का?'

  'कारण गेल्या सात वर्षात ते एकदाही घरी आले नाहीत.'

 •  चिंतामण ज्या कार्यालयात कामाला होता. त्या कार्यालयातील त्याचा एक साहेब एक दिवशी चिंतामणवर चांगलाच भडकला.आणि तो त्याला म्हणाला, 'मला तू काहीही सांगू नकोस, कोणत्या गाढवाने तुला नोकरीला ठेवले, खड्यात जा एकदाचा.'

  ही हकीकत चिंतामणने घाईघाईने आपल्या सास-याला कथन केली आणि साहेब आपल्याला खड्यात जा म्हणाला असे कळवळून सांगितले. त्यावर सासरेबुवा चिंतामणला म्हणाले.

  'असे म्हणाला तुझा साहेब? मग तू काय केलेस.'

  'मग मी काय करणार, मी तुमच्याकडे आलो.' चिंतामण उद्गरला.

Click Here To Send This Greetings To a Friend

 
www.shreeyoginfo.com
2007-09 All Rights Reserved