Back to Jokes Home

सुपरहिट जोक्स

पान नंबर

१०

११

१२

१३

१४

१५

१६

 

 

 

 

अहो जरा हसता का ?

 • जेलर - अरे, महिन्यातून एक दिवस तुला भेटण्यासाठी नातेवाईकांना मुभा आहे, पण गेल्या सहा महिन्यांत तुला भेटायला तुझा एकही नातेवाईक कसा आला नाही?

  कैदी - साहेब, माझे सारे नातेवाईक याच तुरुंगात आहेत.

 • संजू - काका, त्या फ़ोटोग्राफ़रला हा रोल द्या आणि गरम पाण्याने धुवायला सांगा.

  काका -  का ?

  संजू - यात माझे फ़ोटो आहेत आणि थंड पाण्याने मला सर्दी होते.

 • प्रीती - आजी, आज देवपुजेची घंटी हळूहळू वाजव.

  आजी -  का गं  प्रीती?

   प्रीती - देवाची तब्येत ठीक नाही वाटत.

  आजी -  चूप काही तरी बडबडू नकोस.

   प्रीती - काहीतरी नाही. खरंच सांगते. अगं शेजारचे डाँक्टर म्हणे देवाघरी गेलेत सकाळी.

 • शिक्षक - तुम्ही सर्वजण मूर्ख आहात. तुमच्यापैकी जो स्वतःला जास्त मूर्ख समजतो त्याने उठून उभे राहावे.

  (थोड्याच वेळाने एक मुलगा हळूच उभा राहतो.)

  शिक्षक - काय रे, सबंध वर्गात तू एकटाच स्वतःला मूर्ख  समजतोस काय?

  मुलगा - नाही, सर, तुम्ही एकटेच उभे आहात हे पाहून मला वाईट वाटलं, म्हणून मी तुमच्या सोबतीला उभा राहीलो.

 • पेशंट - डाँक्टर लवकर माझ्या पोटातून सोन्याचे नाणे बाहेर काढा. ते मी ५ वर्षापूर्वी गिळले होते.

  डाँक्टर - ५ वर्षापूर्वी, मग तुम्ही तेव्हाच का नाही सांगितले?

  पेशंट - अहो, डाँक्टर तेव्हा मला पैशाची अजिबात गरज नव्हती.

 • रामराव - श्यामराव, तुम्ही प्रवासाला सहकुटुंब जाणार होता त्याचं काय झालं? कधी जाणार?

  श्यामराव - ते माझ्या मित्राच्या येण्यावर अवलंबून आहे. जातांना तो माझी सुटकेस, थर्मास, वाँटरबँग, कँमेरा, गाँगल, स्कार्फ़, स्वेटर, टिफ़ीन बाँक्स, हँडबँग आणि उसने म्हणून पाचशे रुपये घेऊन गेला आहे. त्याच्याच येण्याची मी वाट बघतोय.

 • तरुण - आजोबा,मला शंभर रुपये देता का?

  आजोबा - मला डाव्या कानानं नीट ऎकू येत नाही. उजव्या कानाशी येऊन सांग.

  तरुण - (उजव्या कानाशी) मी पाचशे रुपये मागितले होते.

  आजोबा - तर मग माझ्या डाव्या कानाशी येऊन सांग. म्हणजे नाही म्हणणं सोईच होईल.

 • गंपूअण्णांनी झंपूअण्णांना विचारले, काय हो, तुमच्या डोक्याला एवढी खोल जखम कशी काय झाली?    

  झंपूअण्णा - काल रात्री माझ्या बायकोने रागाच्या भरात माझ्या डोक्यावर फ़ुलं फ़ेकली.

  गंपूअण्णा - हे आपले काहीतरीच. अहो अण्णा, फ़ुले फ़ेकल्यामुळे खोल जखम कशी पडेल?

  झंपूअण्णा - बोलू नका कुणाला, ती फ़ुले पितळी फ़ुलदाणीत ठेवलेली होती.

 • उमेदवार - मला वीस टक्के मते सिंध समाजाची, वीस टक्के मुस्लीम समाजाची, वीस टक्के हिंदूची आणखी वीस टक्के दलितांची ....

  मित्र - मला वाटले होते तुला मते देणा-यात कोणी भारतीय मतदार आहेत की काय?

 •  पेशंट - मला पाणी हवंय.

  नर्स - तहान लागलीय काय ?

  पेशंट - न ... न ... नाही.

  नर्स - मग? पाणी कशाला हवंय?

  पेशंट - पाणी प्यायल्यावर माझा घसा गळतोय का इतकंच पाहायचंय.

Click Here To Send This Greetings To a Friend

 
www.shreeyoginfo.com
2007-09 All Rights Reserved