Back to Jokes Home

सुपरहिट जोक्स

पान नंबर

१०

११

१२

१३

१४

१५

१६

 

 

 

 

अहो जरा हसता का ?

  • एक ग्रुहस्थ आपल्या डाँक्टर मित्राकडे गेला आणि म्हणाला,'मित्रा, मला शंभर रुपयांची गरज आहे, देतोस का?'

    डाँक्टर म्हणाला, 'माझ्याकडे शंभर रुपये नाहीत. पण मी तुझ्यासाठी एक काम करु शकेन.'

    'कोणते?' मित्रानं मोठय आशेनं विचारलं.

    'मी तुझी दाढ काढू शकेन. त्यासाठी मी शंभर रुपये घेतो.' डाँक्टरनं सांगितलं.

  • भडक डोक्याचा साहेब एका लहान स्टेशनवर गाडीची वाट पहात होता. लांबून गाडीचा धूर दिसला, तेव्हा तो गाडीत चढण्यासाठी तयार झाला. तेवढयात फलाटावरचा हमाल म्हणाला, 'सरदारजी, ही मेलगाडी फास्ट आहे.ती इथे थांबत नाही. ही गेल्यावर तुमची पँसेजर येईल.'

    साहेब गर्वाने म्हणाला, 'अरे, ती नाही तिचा बाप थांबेल.' असे म्हणत त्याने आपले क्रुपाण काढले आणि दोन रुळांमध्ये उभा राहून तो 'ठहरो, ठहरो' असे ओरडू लागला. आता काय होणार असे वाटून फलाटावरचे सगळे लोक श्वास रोखून पाहू लागले. समोरुन भरधाव वेगात येणा-या गाडीच्या ड्रायव्हरने जोरजोरात शिटया मारल्या. गाडी चार फुटांवर आली, तेव्हा मात्र साहेबाने घाबरुन लांब उडी मारली.

        गाडी निघुन गेल्यावर हमालाने विचारले, 'काय साहेब घाबरलात काय?'

    साहेब फुशारकी ने म्हणाला, 'मी घाबरणार? छट! अरे, ती गाडीच घाबरली आणि मला मारु नका म्हणुन गयावया करु लागली ते तू ऐकलं नाहीस का? शरण येणा-याला मारणं हे माझं ब्रीद नाही.'

  • पेशंटला तपासताना डाँक्टर गंभीरपणे म्हणाले, ' तुम्ही सिगरेट ओढणं ताबडतोब सोडलं पाहिजे.'

    पेशंटनं विचारलं, 'सिगरेट ओढणं इतकं धोक्याचं आहे काय?'

    डाँक्टर म्हणाले, 'होय. तुम्हाला मी तपासत असतांनासुध्दा तुम्ही सिगरेट ओढता. त्यामुळे माझ्या पँटला दोन वेळा जळत्या सिगरेटनं भोकं पडली. यापेक्षा अधिक धोका तो कोणता?'

  • एकदा स्टेशनच्या फलाटावर एक सधन व्यापारी उतरले.थोडयाच वेळात एक ग्रुहस्थ त्यांच्याजवळ जाऊन म्हणाला, 'आपण शेठ पारीख ना?'

    'हो, पण आपण कोण?' पारीख यांनी विचारलं.

    'दहा वर्षापूर्वी मी पैशाच्या अडचणीत होतो. याच फलाटावर तुम्ही मला पन्नास रुपये दिले होते. परत-'

    'छे, छे, परत कशाला करता? एखादा गरजू इसम दिसला तर त्याला मदत करा म्हणजे झालं.' शेठ पारीख औदार्यानं म्हणाले.

    त्यावर त्या ग्रुहस्थानं सांगितलं, 'तसं नाही साहेब, मला परत पन्नास रुपयांची गरज आहे, ते तुम्ही देण्यासाठी मी तुमची विनंती करत होतो.'

  • तुमच्या मिसेसची ड्रायव्हींगची काय प्रगती?

    फार जोरात. मी एल. आय. सी. चा एजंट असल्यामुळे मला तर फायदा झाला.

    तो कसा काय?

    अहो, आमच्या आळीतील सर्वांनी आता विमा उतरवलाय.

  • विमा एजंट सर्व आँफ़िसातून फ़िरत होता.

    'खुर्च्यांचा विमा उतरवला आहे?'

    'हो' कारकून म्हणाला.

    'पंख्यांचा विमा उतरवला आहे?'

    'हो,'

    'टेबलाचा?'

    'उतरवला.'

    'या भिंतीवरच्या घड्याळाचा?'

    'नाही.'

    'का बरं?'

    'ते चोरीला जाणार नाही.' आम्ही सगळे कारकून त्याच्यावर नजर ठेउनच काम करतो.

  • मी जेव्हा तुला बघतो, तेव्हा मला चंदूची फ़ार आठवणं येते.

    का? माझ्यात आणि चंदूत काही साम्य नाही.

    ते बरोबर आहे. पण तुम्ही दोघं माझे शंभर रुपये देणं लागता.

  • एकदा एक मुर्ख माणूस, न्हावी आणि टकल्या प्रवासाला निघाले. चालता चालता रात्र झाली. ते एका रानात आल्यावर त्यांच्या लक्षात आले की ते वाट चुकले आहेत. शेवटी तिघांनी एका झाडाखाली झोपायचे ठरवले. रानात चोरांचे भय असल्यामुळे दोघांनी झोपायचे आणि उरलेल्या एकाने पहारा करायचा असे ठरले.

    प्रथम नाव्ही म्हणाला, तुम्ही दोघं झोपा. मी पहारा करतो.' दोघे झोपले न्हावी पहारा करीत बसला.काहीतरी उद्योग हवा, म्हणून न्हाव्याने आपली धोपटी काढली आणि बसल्या बसल्या मूर्ख माणसाचे केस कापून तुळतुळीत गोटा केला. थोड्यावेळाने त्याने पहा-यासाठी मूर्ख माणसाला उठवले. मूर्ख उठला व म्हणाला, 'न्हावीदादा, तुम्ही चूक केलीत. मला उठवण्याऎवजी तुम्ही टकल्याला उठवलेलं दिसतंय !'

  • पार्टी रंगात आली होती. पण वासूनाना घरी जायची घाई करीत होते त्यावर त्यांचा एक मित्र म्हणाला, 'वासूनाना एवढे बायकोला घाबरता? तुम्ही पुरुष आहात की उंदीर?'

    'मी नक्कीच पुरुष आहे' वासूनाना म्हणाले.

    'कशावरुन?'

    कारण माझी बायको उंदराला घाबरते,' वासूनाना म्हणाले.

  •  'ज्यांनी ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला त्यांना त्यांना तू फ़सवलंस ? ' वकील आरोपीवर बोट रोखून तावातावाने बोलत होता. नंतर वकीलाने कळवळून विचारले, 'अरे, जो तुझ्यावर विश्वास ठेवतो, त्याला फ़सवणं तुला शक्य तरी कसं होतं?'

    'सोपं आहे साहेब,' आरोपी शांतपणे म्हणाला, ' जो माझ्यावर विश्वास ठेवत नाही, त्याला फ़सवणं मला कधीच शक्य होत नाही.'

Click Here To Send This Greetings To a Friend

 
www.shreeyoginfo.com
© 2007-09 All Rights Reserved