Back to Jokes Home

सुपरहिट जोक्स

पान नंबर

१०

११

१२

१३

१४

१५

१६

 

 

 

 

अहो जरा हसता का ?

 • मुलगा - बाबा आज मला फिरायला जावेसे वाटते. चला, आपण सूर्यास्त पहायला जाऊ.

  वडील - आज नको बाळा, आपण उद्या सकाळी जाऊ.

 • अजय - बाबा गेल्या महिन्यात ताईचे डोके दुखत होते म्हणून तुम्ही तिला चष्मा आणला. आज माझे मनगट दुखते आहे.

  बाबा - मग मी काय करु ?

  अजय - मला घडयाळ आणून द्या.

 • शिक्षक - संजू, तू सांग हिमालयाचे टोक किती उंच आहे ?

  संजू - मला माहित नाही सर.

  शिक्षक - (रागाने) बाकावर उभा रहा.

  संजू - पण सर, बाकावर उभे राहिल्यामुळे हिमालयाचे टोक थोडेच दिसणार आहे ?

 • फौजदार - तुझा चेहरा कुठंतरी पाहिला आहे मी. कुठं बरं ?

  आरोपी - इथंच, माझा चेहरा जन्मापासून माझ्या मानेवरच आहे, दुसरीकडे कुठं पाहणार आपण?

 • एक वक्ता - ( लांबलेलं भाषण आटपत) साँरी हं, माझ्याजवळ घड्याळ नसल्यामुळे वेळेचं भान राहीलं नाही. त्यामुळे माझें भाषण लांबल.

  एक आवाज - पण तुमच्यामागे कँलेडर होते ते तरी पहायचे.

 • शिक्षीका - मीनी, तू काय लिहित आहेस?

  मीनी - मी माझ्या भावाला फ़्रेंचमधून पत्र लिहित आहे.

  शिक्षीका - अगं, पण तुला कुठे फ़्रेंच भाषा येते?

  मीनी - मग त्याला तरी कुठे फ़्रेंच येते.

 • नानासाहेब - (टांगेवाल्याला) का हो, रेल्वे स्टेशनपर्यंत जायला किती रुपये होतील?

  टांगेवाला - एका माणसाला दहा रुपये व सामान मोफ़त.

  नानासाहेब - मग फ़क्त माझे सामानच घेऊन जा. मी चालत येईन.

 • ( तीन माणसे गप्पा मारत असतात)

  पहिला - मी इतकी थंडी पाहिली आहे, की झोपतांना अंगावर सात-आठ  पांघरुणं घ्यायला लागत असत.

  दुसरा - ते तर काहीच नाही. मी इतकी थंडी पाहिली आहे, की एका गावात दोन माणसे एकमेकांशी बोलत असली तर शब्दच गोठून जात असत. ते तव्यावर परतल्यानंतर मगच ऎकू येत असत.

  तिसरा - अरे, ते सगळे सोडा. मी अशी थंडी पाहिली आहे, की टाईपरायटरवर पाणी असा शब्द टाईप केला तर बर्फ़ असा शब्द उमटत असे.

 • आई - जा, परीक्षेचा रिझल्ट घेऊन ये. तो हारही घेऊन जा. पास झालीस तर शिक्षकांच्या गळ्यात घाल.

  मुलगी - आणि नापास झाले तर?

  आई - स्वतःच्या गळ्यात घालून ये.

 •  नवरा : आजचं मी पन्नास हजारांचा विमा उतरवला. माझं काही बरंवाईट झालंच तर तुझी आणि मुलांची तरतूद करुन ठेवली आहे मी.

  बायको : बरं झालं. आता उगीच उठल्या सुटल्या डाँक्टरांकडे जाऊन औषधं आणि इंजेक्शनं घेण्यात पैसा घालवू नका.

Click Here To Send This Greetings To a Friend

 
www.shreeyoginfo.com
2007-09 All Rights Reserved