Back to Jokes Home

सुपरहिट जोक्स

पान नंबर

१०

११

१२

१३

१४

१५

१६

 

 

 

 

अहो जरा हसता का ?

 • एक लठठ माणूस समोरुन येत होता. ते बघून राजू थांबला. त्यावर लठठ माणूस म्हणाला, ' का रे थांबलास ?'

  राजू उत्तरला, ' ते काय लिहिलंय फलकावर, अवजड वाहनास आधी वाट द्या.'

 • 'आहो अण्णासाहेब, काल तुमची शैला मी बागेत पाहिली.'

  'शक्य आहे तिला फिरायला जायची आवड आहे.'

  'काल ती बागेत बाकडयावर एका तरुणाजवळ बसली होती.'

  'तेही शक्य आहे, पण ती करत काय होती?'

  'अगदी लाडात येऊन गप्पा मारत होती.'

  'आणखी काही?'

  'छे छे, मी अर्धा तास तिथे होतो, तसं काही नाही.'

  'काय म्हणता काय? मग ती आमची शैला नव्हेच.'

 • एका काँलेजकुमाराच्या खोलीत सात-आठ काँलेजकुमार दारुपिण्यात गुंगून गेले होते. पितांना त्यांच्या गप्पांना आणि हसण्या-खिदळण्याला भलताच ऊत आला होता.

  त्यांचा गोंगाट चालू असताना शेजारच्या घरातला एक गडी येऊन म्हणाला, 'आमच्या शेठनं तुम्हाला निरोप सांगायला सांगितलं आहे.'

  'कसला निरोप?' एकानं विचारलं.

  'शेठनं सांगितलं आहे कि गडबड जरा कमी करा.' तो गडी म्हणाला, 'त्यांना वाचता येत नाही.'

  'वाचता येत नाही? काय वय आहे तुझ्या शेठचं? दुस-याने विचारलं.

  'चाळीस'? आणि वाचता येत नाही?' तिसरा म्हणाला, त्याला सांग, 'वाचता येत नाही सांगायला लाज वाटायला हवी. मी पाचव्या वर्षी वाचू लागलो होतो.'

 • 'आनंद उभा रहा.' शिक्षक म्हणाले.

  आनंद उभा राहीला.

  ' मी वर्गात सगळ्यांना कुत्र्यावर निबंध लिहायला सांगितलं होतं,'

  ' मी लिहीलाय सर.'

  'हो, पण तुझा आणि तुझ्या मित्राचा निबंध यात कणभरही फ़रक नाही. दोघांचा शब्द न शब्द सारखा आहे.'

  'सर, आम्ही दोघांनी एकाच कुत्र्यावर निबंध लिहीला आहे.'

 • तुरुंग खात्याचे मंत्री तुरुंगाला भेट देत होते. त्यांनी कैद्यांना विचारलं, 'तुमच्या मागण्या काय आहेत?'

  'आम्हाला आठवड्यातून दोन वेळा पत्नीची भेट झाली पाहीजे.' एका कैद्यानं सांगितलं.

  'मंजूर' मंत्री म्हणाले. ' आठवड्यातून एकदा तुरुंगात आम्हांला दारुची बाटली हवी.' दुसरा कैदी म्हणाला 'मंजूर'  मंत्र्यांनी मान्यता दिली.

  ' आमच्या खोलीत रंगीत टी. व्ही. पाहीजे.' तिसरा कैदी म्हणाला 'मान्य आहे,' मंत्री म्हणाले.

  कैद्यांच्या सर्व मागण्या मान्य करुन मंत्री बाहेर पडले. गाडीत बसल्यावर त्यांचा चिटणीस म्हणाला, ' साहेब कैद्यांच्या अशा भरमसाट मागण्या मान्य करण्यापेक्षा तोच पैसा शाळांवर खर्च केला असता तर बरं झालं असतं.'

  ' माझी मंत्रीपदाची मुदत एक महीन्याने संपते आहे. त्यानंतर मी शाळेत जाण्याचा अजिबात संभव नाही. त्यापेक्षा जिथे माझा मुक्काम पडण्याची शक्यता आहे, तिथे आधीच आपली तरतुद केलेली बरी.

 • एकदा एक मांजर आपल्या आवडत्या बोक्याला भेटायला गेली. तिला लंगडताना पाहून बोक्यानं विचारलं, पायाला काय झालं गं? मनी म्हणाली, ' मी घरातून बाहेर पडले, तेव्हा अपशकुन झाला, त्याच वेळी ऒळखलं मी की आज काहीतरी वाईट घडणार आणि तसचं झालं. एकानं माझ्या पायावरनं सायकल नेली नी माझा पाय दुखावला.'

  ' अगं, पण कसला अपशकुन झाला?' बोक्याने विचारले.

  मनी म्हणाली, ' अरे, मी रस्त्यातून येत होते, तेव्हा एक माणूस आडवा गेला.

 • प्रवासाला निघालेल्या वसंतरावानी एकदा वासंतीकाकूंकडे आणि सामानाकडे नजर टाकली आणि ते त्यांना म्हणाले, 'काय गं आपलं गोदरेजचं कपाट घेतलं नाहीस बरोबर?'

  'कळतात बरं मला,  तुमची कुजकी बोलणी.'

  'नाही ग तसं नाही' वसंतराव काकुळतीला येऊन म्हणाले.

  'एक शब्द बोलू नका. चला आता, नाहीतर आपली गाडी चुकेल.'

  'अगं पण ......'

  'चला म्हणते ना......'

  'हो......... पण...... कपाट.....'

  'कपाट कपाट काय करताय एकसारख?'

  'अगं म्हणजे त्याचं काय आहे, आपली तिकीटे मी कपाटातच विसरलो आहे.'

 • "मला असा माणूस माहीत आहे की, ज्याच्या लग्नाला तीस वर्ष झाली आणि तो आपली प्रत्येक संध्याकाळ घरातच बायकोच्या सहवासात घालवतो."

  "व्वा याला म्हणतात प्रेम!"

  "पण डाँक्टर म्हणतात पँरँलेसिस.....!!"

 • आपल्या दिवंगत पतीची आठवण नेहमी सतेज रहावी म्हणून बाईना पतीराजांचा एक फोटो मोठा करुन घरात लावायचा होता.

  खुप शोधुनही एकही निगेटिव्ह सापडेना. शेवटी एक ग्रुप फोटो घेऊन त्या एका अत्यंत कुशल फोटोग्राफरकडे गेल्या.

  'माझ्या यजमानांचा फोटो एनलार्ज करायचा आहे. पण माझ्याकडे निगेटिव्ह नाहीये, दुस-या फोटोवरनं करता येईल का?'

  'हो, या ग्रुप फोटॊमधले तुमचे पती कोणते?'

  'हे टोपीवाले. पण एक करा बाई. यांच्या डोक्यावरची टोपी काढून टाका.'

  'टोपी का काढायची?'

  'चांगली नाही दिसत ती, अगदी हेच दिसतात टोपी घातल्यावर. काढता येईल ना टोपी?'

  'हो, जरा मेहनत घ्यायला लागेल, पण होईल . बरं आता मला असं सांगा, त्यांना टक्कल होतं का डोक्यावर केस होते?'

  'छान केस होते.'

  'भांग डावीकडे होता की उजवीकडे होता?'

  'काय की बाई. आठवत नाही. पण तसं कशाला? टोपी काढली की तुम्हाला दिसलेच की.'

 •  चित्राताईनी नवीन स्वयंपाकीणबाई ठेवल्या होत्या.एक दिवस त्या त्यांना म्हणाल्या,'काकू आज आपल्याकडे तीन पाहुणे येणार आहेत. तेव्हा स्वयंपाक कसा कराल?'

  'कसा करु?' स्वयंपाकीणबाईंनी विचारले.

  'म्हणजे ... ते तुम्हीच ठरवा,' चित्राताई म्हणाल्या.

  'हो ते झालेच. पण कसा करू?'

  'म्हणजे?'

  'म्हणजे तुम्हाला ते परत यावेसे वाटतात की नाही. यावर सगळा स्वयंपाक अवलंबुन आहे.

Click Here To Send This Greetings To a Friend

 
www.shreeyoginfo.com
2007-09 All Rights Reserved