Back to Jokes Home

सुपरहिट जोक्स

पान नंबर

१०

११

१२

१३

१४

१५

१६

 

 

 

 

अहो जरा हसता का ?

  • सुनिलने एक कुत्रा पाळला. सहा महीने झाले, तरी तो कुत्रा नुसता खाऊन पिऊन गप्प बसायचा. अखेर वैतागून एक दिवस सुनिल म्हणाला, 'अगं' मला वाटलं तू मोत्याला काही शिकवशील. दारातलं वर्तमानपत्र उचलून आणाणं, परकं कोणी आलं तर इशारा देऊन आपल्याला सावध करणं, मुलांच्या बरोबर खेळणं असं काहीतरी, पण तू त्याला सहा महिन्यांत काहीही शिकवलं नाहीस.    बायकोनं सांगितलं, 'अहो, त्याला जरा वेळ द्या नं. लग्नानंतर पहिले सहा महिने तुम्ही तरी काय शिकलात ? नुसते घरी बसुनच होतात ना ? मग वर्षभरात कपबशा विसळणे, कांदा चिरणे, चहा करणे अशी कामं सुरु करु लागलात तुम्ही. मोत्याही शिकेल तुमच्यासारखाच हळूहळू.

  • लंडन येथील इंडियन हायमध्ये बंगाली, पंजाबी, मद्रासी खूपच आहेत. मराठी लोकांना या उच्च नोक-यांपासून कसे लांब ठेवावे, याबद्द्ल त्यांच्यात खल चालला होता.  तेव्हा एक मद्रासी म्हणाला, त्यांची तुम्ही काही काळजी करु नका. फ़क्त एका मराठी माणसाला इथं चांगली नोकरी द्या.   मग बाकीच्या मराठी लोकांना मज्जाव करण्याचं काम तो एकटा मराठी माणूस आनंदाने करील.

  • शेखर टेकाडे एका चित्रपट साप्ताहिकासाठी प्रसिध्द चित्रपट निर्माता शेठ लक्ष्मीचंद्र यांची मुलाखत घेत होता. त्याने शेठजींना विचारले, 'चित्रपटस्रुष्टीत पैसे  गुंतवणारे लोक लक्षाधीश होतात हे खरं आहे का ?'     'खरं आहे', शेठ म्हणाले, 'सिनेमा डब्यात गेला की कोटयाधीश लगेच लक्षाधीश होतात.'

  • एका भारतीय लेखकाला भेटण्यासाठी एक मोठा आफ्रिकन लेखक आला. तो म्हणाला, 'आमचे घराणे तसे फार मोठे थोर आहे पण आमच्या नातेवाईंकापैकी एकजण खुनाच्या गुन्ह्यासाठी फाशी गेला. त्यामुळे आम्हाला ती गोष्ट अगदी मनाला लागून गेली आहे.     त्याचं सांत्वन करण्यासाठी भारतीय लेखक म्हणाला, 'आमच्या घराण्यात कोणी फाशी गेला नाही हे खरं पण ज्यांची लायकी फाशी जाण्याची आहे, असे दहावीस लोक आमच्या घराण्यात होऊन गेले आहेत.

 

  • बाळू हा बालवाडीत शिकत होता. परंतू अगदी लहानपणापासून तो खूप समजूतदार होता. प्रत्येकाला तो मदत करायचा. एकदा त्याच्या वर्गात नव्यानेच गोडबोले बाई आल्या आणि प्रत्येकाला 'मोठेपणी तू कोण होणार? हा प्रश्न विचारण्यास सुरवात केली.' मग पोरांनी 'मी डाँक्टर होणार,' 'मी वकील होणार,' अशी उत्तरे द्यायला सुरवात केली. शेवटी बाईनी पिंकीला प्रश्न विचारला, 'काय गं तू मोठेपणी कोण होणार?' 'किनई बाई मी मोठेपणी आई होणार आहे.' बाई या उत्तरावर काहीच बोलल्या नाहीत. त्यांनी सरळ बाळूला तोच प्रश्न विचारला. तेव्हा बाळू डोळे पिंकीकडे लावीत उत्तरला. 'बाई-बाई, मी कीनई हिला आई बनवायला मदत करीन.'

  • उत्तर प्रदेशातील जयक्रुष्ण पांडे या धनाढ्य जमीनदाराचा मुलगा पाच वर्षे अमेरीकेत राहून भारतात कायम वास्तव्यासाठी परत येणार होता. पांडे यांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. घरातल्या दिवाणखाण्यात टेबलावर त्यांनी व्हिस्कीची बाटली, नोटांचं पुडकं, गीता हा धर्मग्रंथ आणि एक पिस्तुल ठेवलं.

     मग ते आपल्या पत्नीला व मित्राला म्हणाले, 'माझा मुलगा आल्याबरोबर जर त्यांन व्हिस्कीची बाटली उचलली तर तो दारुड्या होईल. त्यानं नोटांचं पुडक  उचललं तर तो व्यापारी होईल. त्यानं गीता उचलली तर तो साधू होईल आणि जर त्याने पिस्तूल उचललं तर तो गुंड होईल.

    मुलगा परदेशातून आला. घरात आल्याबरोबर त्याने टेबलावरच्या बाटलीतून व्हिस्की ग्लासात घेऊन मद्यपान केलं. मग त्याने नोटांच पुडकं खिशात टाकलं, गीता काखोटीत मारली आणि हातात पिस्तूल घेउन माजघरात प्रवेश केला.

    हे सर्व लांबून पहात असणारे जयक्रुष्ण पांडे म्हणाले, 'अरे बाप रे. माझा मुलगा नक्कीच उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री होणार. दिसेल ते सगळेच खिशात टाकतो आहे हा !'

  • दोन चोर रात्रीच्या वेळी सोनाराच्या दुकानात शिरले. त्यांनी सगळा माल लांबवण्यासाठी एकत्र केला. तोच एका चोराची नजर त्या दागिन्यांवर लावलेल्या किंमतीकडे गेली. तो आपल्या साथीदाराला म्हणाला, " काय चोर आहे लेकाचा, काय अफ़ाट किंमती ठेवल्या आहेत दागिन्यांच्या, यांना गरीब लोकांच्या खिशावर डल्ला मारायला का आवडतं कोण जाणे?"

  • दोन मूर्ख एका होडीत बसून नदी पार करीत होते. त्यांची होडी नदीच्या मध्यभागी आली तोच त्यांच्यातला एक म्हणाला, ' अरे.... अरे... बहुतेक होडीला तळाशी भोक पडलेल दिसतंय. होडी बुडेल.' 'तू कशाला काळजी करतोस?', दुसरा त्याला म्हाणाला, 'होडी आपली कुठं आहे? भाड्याने तर घेतलीय!'

  • पेपर संपल्यावर बाहेर येऊन दोन विद्यार्थी आपापसांत चर्चा करीत होते. एक म्हणाला, 'मला एकही प्रश्न आला नाही. मी पेपर कोरा टाकला. तू काय केलंस?'

    'मीसुध्दा पेपर कोराच टाकला. पण मी तुझ्यामागेच बसलो असल्यामुळे मी तुझी काँपी केली असं बालटं येणार बघ तुझ्यावर.'

  • चाणाक्ष उद्योगपती फ़िरते विक्रेते म्हणून विवाहीत पुरुषांचीच निवड करतात. कारण त्यांना आँर्डर घेण्याची सवय असते.

Click Here To Send This Greetings To a Friend

 
www.shreeyoginfo.com
© 2007-09 All Rights Reserved