Back to Jokes Home

सुपरहिट जोक्स

पान नंबर

१०

११

१२

१३

१४

१५

१६

 

 

 

 

अहो जरा हसता का ?

 • एक तरुण चित्रकार आपले फ़्रेम केलेले एक उत्क्रुष्ट चित्र घेऊन एका दुकानात गेला आणि त्याने ते चित्र दुकानाच्या मालकाला दाखवून म्हटलं, ह्याची किती किंमत येईल?'

  मालकाने चित्राकडे क्षणभर पाहिले आणि मग तो म्हणाला,'तीस रुपये'

  'काय, फ़क्त तीस रुपये?' चित्रकाराने चकीत होऊन विचारले, होय, फ़क्त तीसच 'त्याबरोबर चित्रकार काहीशा रागाने म्हणाला, ह्या फ़्रेमचीच किंमत तीस रुपये आहे.'

  'मला माहीत आहे,' दुकानदार शांतपणे म्हणाला, 'मी फ़्रेमचीच किंमत सांगितलीय तुम्हाला.'

 • शत्रूंची दाणादाण उडवल्यावर मेजर बहादूरसिंगांनी एका सैनिकाला विचारले, 'या लढाईत तू कसली कर्तबगारी दाखवलीस?'

  'सर,' सैनिक म्हणाला, 'मी शत्रूकडच्या एका सैनिकाचा पायच उडवला.'

  'पायाऎवजी खरं तर तू त्याचं मुंडकं उडवायला पाहीजे होतसं.' मेजर साहेब म्हणाले.

  'सर मुंडकं आधीच कुणीतरी उडवलं होतं. सैनिकानं सांगितलं.'

 • सुभाषरावांकडे एकदा एक दूरचा मित्र गप्पा मारायला म्हणून आला. आल्यावर त्याने जी काही बडबड सुरु केली की सांगता सोय नाही. साधारण चारपाच तास बडबड करुन चांगला चहा आणि फ़राळ ढोसून झाल्यावर स्वारी म्हणाली, 'आता मला गेलंच पाहीजे.'

  'इतक्या लवकर? पण खरोखर जर तुम्हाला महत्वाचं काम असेल तर मी आग्रह नाही करीत थांबण्याचा.' सुभाषराव, पीडा कधी एकदा जाते, ह्याची वाट पहात म्हणाले.

  'मला आता गेलंच पाहीजे.' पाहूणे म्हणाले, 'खरोखर किती मजेत वेळ गेला म्हणून सांगू. ईथे येण्यापूर्वी माझं भयंकर दुखत होतं. आता डोकेदुखी पार पळाली.'

  'अहो, पळाली नाही ती.' सुभाषराव शांतपणे म्हणाले, 'माझ्या डोक्यात शिरली.'

 • त-हेवाईक व्यक्तींचा एक कंपू होता. या कंपूने एकदा ठरवले की, कंपूपैकी कुणीही एक प्रश्न विचारायचा. त्याचे उत्तर तो स्वतः देऊ शकला नाही, तर त्याला दहा रुपये दंड सुरवात चक्रमराव यांनी केली. इतर सदस्यांना त्यांनी पुढीलप्रमाणे प्रश्न विचारला, एक ससा आहे तो जमीनीत बीळ खोदतो, तेव्हा बिळाच्या तोडांशी मातीचा छोटासाही ढीग करीत नाही, तर ते कसं?

  इतरांनी आपापले डोके खाजवले, परंतू कुणालाही उत्तर सुचले नाही शेवटी चक्रमरावांनाच उत्तर सांगण्याविषयी सुचवण्यात आले. 'उत्तर सोपं आहे, ससा बिळाच्या पायध्यापासून ते खणायला सुरुवात करतो.' चक्रमराव म्हणाले.

  'पण तो बिळाच्या पायथ्याशी कसा जातो?' दुस-याने विचारले, ' हा प्रश्न तुझा आहे.-तुच उत्तर दे. चक्रमराव उत्तरले.'

 • एकदा एक प्रसिध्द वकीलाकडे एक श्रीमंत गि-हाईक आलं. केस बरीच लफ़ड्याची आणि गुंतागुंतीची होती. वकीलाने आपल्या अशिलाचे संपूर्ण बोलणे एकून घेतले आणि मग ते म्हणाले, 'दिवाणी दावा आहे, तेव्हा झटपट काही निकाल लागणार नाही, वर्ष-दिड वर्ष तरी चालेल. जरी सबंध केसचे पैसे अगोदर घेतो, तरी, तुमच्याकडून हप्त्या हप्त्यानं घेईन. पहिल्या प्रथम मला चार हजार रुपये द्या.' दुस-या महिन्याला हजार रुपये द्या. मग मात्र दर महिन्याला.

   'हे तर स्कूटर घेण्यासारख झालं !' अशील म्हणाला.

  'बरोबर आहे' वकील म्हणाला, 'माझाही तोच बेत आहे.'

 • मराठी माणसाचं एक तत्व आहे. आपलं वाईट झालं तरी चालेल, पण दुस-याचं बरं झालेलं त्याला पहावत नाही, एकदा बोट फ़ुटली आणि तिघेजन बेटावर अडकून पडले ते बेट ऒसाड होतं. इतक्यात एका झाडातून देवता आली आणि म्हणाली, तुम्हा प्रत्येकाची एक एक इच्छा मी पूर्ण करीन.

  त्यातला एक जण मारवाडी होता. तो म्हणाला, मला अमेरीकेतला कोट्याधीश करा.देवतेने आपला आर्शिवाद दिला. त्याची ईच्छा पूर्ण होऊन तो तिथे दिसेनासा झाला.

  दुसरा माणूस बायकांचा हौशी असा उत्तर हिंदुस्तानी होता. तो म्हणाला, मला स्वर्गातल्या अप्सरांबरोबर रहायचं आहे. देवतेने त्याची ईच्छा पूर्ण केली.

  आता मराठी माणसाची पाळी आली. खरे तर त्या देवतेच्या क्रुपेने तो जन्मभर सुखात लोळला असता. पण स्वतःला सुख मिळवण्यापेक्षा त्या दोघांच सुख कसं नाहीस होईल याचीच त्याला चिंता उत्पन्न झाली. देवतेपुढे हात जोडून तो म्हणाला, ' मला इथं अगदी एकटं वाटत आहे. त्या माझ्या दोन्ही मित्रानां इथं पुन्हा आण.'

  तथास्तू असं म्हणून देवतेने त्या दोघांनाही अमेरीकेतून आणि स्वर्गातून पुन्हा त्या ऒसाड बेटावर आणलं.

  मग त्या दोघांनी त्या मराठी माणसाला यथेच्छ बडवून काढलं.

 • रात्री अचानक भूकंप झाला आणि पलंगावर झोपलेली प्रचंड वजनाची बायको जमीनीवर झोपलेल्या नव-याच्या अंगावर पडली. नवरा दचकून जागा होऊन म्हणाला, अग, काय झालं?

  'अहो, भूकंप झाला,' बायकोनं सांगितलं, 'त्यामुळे मी पडले.'

  नव-याने विचारले, 'भूकंप झाल्यामुळे तू पडलीस, की तू पडल्यामुळे हा भूकंप झाला?'

 •  घरी आलेल्या एका पाहुण्याकडे आपल्या लहानग्या सोनालीचं प्रमिलाकाकू कौतूक करीत होत्या.

  'आमच्या सोनालीला की नाही, कलेची फ़ार आवड आहे' प्रमिलाकाकू म्हणाल्या.

  'असं?'  पाहुण्यांनी म्हट्लं, मग चांगली गोष्ट आहे!'

  'पण मला अजून एक निर्णय घेता येत नाही.'

  कोणता? 'सोनालीला गाणं शिकवावं की सतार?' प्रमिलाकाकू गंभीरपणे म्हणाल्या.

  'तुम्ही तिला सतारवादनच शिकवा' पाहुणे म्हणाले.

  'का?' प्रमिलाकाकूंनी विचारलं.

  'तुम्ही तिचं सतारवादन ऎकलंय? 'नाही!'

  'पाहुणे म्हणाले,'पण तिचं गाणं मी ऎकलंय.

 • एक इसम डाँक्टर कडे येऊन म्हणाला, 'डाँक्टर, मी अगदी जीवाला कंटाळून गेलोय.'

  काय होतंय आपणाला?' डाँक्टरने विचारले.

  'रात्रीची झोप कशी ती येत नाही' पेशंट म्हणाला, ' रोज मध्यरात्री स्वयंपाकघरात चोरट्यापावलांनी चालणा-या मांजराचा आवाज ऎकूनही माझी झोपमोड होते.'

  'ठीक आहे, मी झोपेच्या गोळ्या देतो तेवढ्या घ्या' डाँक्टर म्हणाले.

  'किती घ्यायच्या गोळ्या?' पेशंटने विचारले.

  'तुम्ही फ़क्त एक घ्या' आणि त्या माजंराला दोन द्या.!'

 •  सुरेश आपल्या मित्राला घेऊन घरी आला. वाटेत तो म्हणाला, 'कांदेपोहे मिळतील याची मी काही खात्री देऊ शकत नाही. पण माझी बायको चहा तरी नक्की देईल.'

  ते दोघे घराजवळ आले, आता सुरेश दारावरची बेल वाजवणार, तोच त्यांना घरातून कांदेपोह्यांचा वास आला. त्याबरोबर सुरेश आनंदाने म्हणाला, 'आपण सुदैवी आहोत बुवा. अरे, माझ्या बायकोच्या माहेरचं कोणीतरी आलेलं दिसतंय. तेव्हा आपल्याला आता कांदेपोहे नक्की मिळणार.'

Click Here To Send This Greetings To a Friend

 
www.shreeyoginfo.com
2007-09 All Rights Reserved