Back to Jokes Home

सुपरहिट जोक्स

पान नंबर

१०

११

१२

१३

१४

१५

१६

 

 

 

 

अहो जरा हसता का ?

 • तो माणूस गरीब चेह-याने कोर्टात उभा होता. वकील त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करीत होता.

  ' आमच्या अशिलानं तुझी कबूतरे गोळ्या घालून ठार मारली असं तू शपथपूर्वक सांगू शकशील?'

  'मी त्याने ठार मारली असं म्हणालो नाही.'

  'मग तुझं म्हणणं तरी काय आहे? '

  'मी म्हणालो, माझा त्याच्यावर संशय आहे.'

  'तू माझ्या अशिलावर का संशय घेतोस याची कारणे सांगू शकशील?' वकीलाने कुत्सिकपणे विचारले.

  'हो, एक म्हणजे मी त्याला माझी कबूतरे जेथे होती त्या जागी बंदूक घेऊन उभा असलेला दुरुन बघितला.'

  'पण त्यावरुन त्याने तुझी कबूतरे मारली, असे सिध्द होत नाही.'

  'दुसरे असे की, मी बंदूकीच्या गोळीचा आवाज ऎकला आणि त्याचवेळी चार- पाच कबूतरे खाली पडतांना बघितली.'

  'यावरुनही ही त्यानेच मारली असं सिध्द होत नाही.'

  'तिसर म्हणजे माझी चार कबूतरे त्याच्या खिशांत मिळाली.'

  ' यावरुन काय सिध्द होणार? एवढंच सिध्द होतं की, ती माझ्या खिशात शिरली आणि बंदूकीच्या गोळीने मरण्यापेक्षा आत्महत्या केलेली काय वाईट, असा विचार करून त्यांनी आत्महत्या केली.' तो माणूस उपरोधिकपणे म्हणाला.

 • 'हा माणूस प्यालेला आहे हे तू कसं ऒळखलंस?' इन्स्पेक्टरने पोलीसाला विचारले.

  'साहेब' पोलीस म्हणाला, 'त्याने पेट्रोल पंपात दहा पैशांच नाणं टाकलं आणि समोरच्या टाँवरमधील घड्याळाकडे पहात तो ऒरडला, बापरे माझ वजन सात पौडांनी कमी झालंय.'

 • या कंपनीच्या मनगटी घड्याळाने मला खूप पैसा मिळवून दिला. फ़ारच चांगंल दिसतंय हे घडयाळ.

  हो ना? चांगलं आणि स्वस्त. मला ते १०० रुपयांना पडतं आणि मी ते १०० रुपयांना विकतो.

  म्हणजे मी नाही समजलो? तुझी खरेदी जर १०० रुपये आणि विक्रीची किंमतही १०० रुपये, तर त्यात तुला फ़ायदा कसा काय मिळतो?

  मिळतो तर ..... दुरुस्तीच्या वेळी खूप मिळतो.

 • एका न्हाव्याकडे एक टकल्या माणूस गेला आणि केस कापायला बसला.

  'तुम्ही माझे केस स्वस्तात कापून दिले पाहीजेत. कारण तुम्हीच बघा माझ्या डोक्यावर तर जवळ जवळ केस नाहीतंच.'

  न्हावी हसला आणि म्हणाला, 'साहेब, तुमच्यासारख्या माणसांचे केस कापायचे पैसेच घेत नाही.'

  'म्हणजे तुम्ही टक्कल असलेल्या लोकांन फ़ुकट केस कापून देता?'

  'होय साहेब.'

  केस कापून झाल्यावर तो माणूस उठला, तेव्हा न्हावी म्हणाला, 'पाच रुपये झाले साहेब.'

  'अरे,तू तर म्हणालास हजामत फ़ुकट करतो म्हणून.'बरोबर आहे. तुमच्या केस कापण्याचे पैसे नाहीत. 'हे केस शोधण्याचे पैसे आहेत.'

 • काय रे माझ्याशी खोटं बोलतोस?' साहेबाने विचारले. कारकून काहीच बोलला नाही.

  'आपली कंपनी खोटं बोलणा-या माणसाला कुठं पाठवते माहीत आहे ना?'

  'होय साहेब.' कारकून खाली मान घालून म्हणाला.

  कुठे सांग बघू.

  'कंपनी त्याला आपल्या वस्तूंचा विक्रेता म्हणून बाहेर पाठवते.'

 • आमच्याकडे अशी गोष्ट आहे की जिच्यामुळे आम्ही भींतीपलीकडचे पाहू शकतो.

  अरे वा ! मजा आहे. पण त्या गोष्टीला काहीतरी नाव असेलच की.

  आहे तर! आम्ही त्याला खिडकी म्हणतो.

 • त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. तो तिचा प्रियकर होता, ती त्याची प्रेयसी होती.

  एक दिवस ते बागेत बसले होते. तिने त्याच्या छातीवर डोके ठेवले होते. ती त्याला म्हणाली. 'तुमचं ॠदंय किती कठीण आहे हो ?'

  'अगं, ते माझे ॠदय नाही. ती माझी बुशशर्टच्या खिशातील तंबाखूची डबी आहे.'

 • माझी तार तुला मिळाली नाही?

  मिळाली.

  मी त्यात स्पष्ट लिहीलं होतं, तुझ्या आईला आणू नकोस.

  हो.

  मग? त्याचा अर्थ तुल समजला नाही?

  मला समजला रे! पण आई तुला विचारायला आलीय, तुमच्या तारेचा अर्थ काय?

 • 'मला त्या माणसाचा अक्षरशः कंटाळा आला आहे, एक फ़्रेंच तरुणी म्हणाली. आम्ही मधुचंद्राहून आल्यापासून त्याने एकदाही माझे चुंबन घेतलेले नाही.'

  'अच्छा! मग तू त्याला घटस्फ़ोट का देत नाहीस?'

  'ते क्सं शक्य आहे अजून आमचे लग्न कुठे झालंय.'

 •  माधवराव आरामखुर्चीत बसले होते. तोच त्यांचा पाच वर्षाचा नातू बंड्या त्याच्याजवळ आला आणि त्याने विचारले, ' आजोबा, तुम्हाला एकही दात नाही का हो?

  'नाही बाळ!' गुंडोपंत म्हणाले.

  'तर मग आजोबा, तुम्हाला चणे, फ़ुटाणे काही खाता येत नसतील.' बंड्यानं म्हटलं.

  'दात नाही तर चणे कसे खाणार ?' गुंडोपंत म्हणाले. पण तु हे कशाकरता विचारतोस?'

  बंड्याने खिशातून चण्याचं पुडकं बाहेर काढलं आणि ते आजोबांच्या स्वाधीन करत म्हणाला,'मी आंघोळीला जातो, तेव्हा हे चणे तुमच्याजवळ ठेवायला आता मला काही भीती नाही.'

Click Here To Send This Greetings To a Friend

 
www.shreeyoginfo.com
2007-09 All Rights Reserved