Back to Jokes Home

सुपरहिट जोक्स

पान नंबर

१०

११

१२

१३

१४

१५

१६

 

 

 

 

अहो जरा हसता का ?

 • बाबूराव एकदा चीनची राजधानी पेकींग येथे कामानिमीत्त गेले होते. परंतु त्यांना चीनी भाषा काही येत नव्हती आणि चीनी लोकांना इंग्रजीचा गंध नव्हता. त्यामुळे पहिल्याच मुक्कामी बाबूरावांची पंचाईत झाली. ते ज्या हाँटेलमध्ये त्यांना काहीतरी फ़ळांचा रस पाहीजे होता.तरुण वेटर मुलगी. तिला ते निरनिराळ्या खुणा करत आपल्याला काय पाहिजे ते सांगत होते. परंतु तेवढ्याने काही जमेना. तेव्हा अचानक बाबूरावांचे लक्ष तिच्या गळ्यातल्या लाँकेटकडे गेले. तेव्हा लाँकेटमध्ये एक सोन्याचे छोटेस सफ़रचंद लटकावलेले त्यांना दिसले. त्यांनी त्याकडे बोट दाखवून ते पिळतात अशी खूण करत त्याचा रस मागितला. ती तरुणी लाजली व जरा वेळाने बाबूरावांच्या टेबलावर ग्लासभर दूध घेऊन आली.

 • लढवय्या स्त्रियांनी स्त्री-मुक्ती चळवळ सुरु केली, तशी कोणी पुरुष मुक्ती चळवळ का सुरु करीत नाही? एवढी हिंमत असलेले लढवय्ये पुरुष ( पक्षीः नवरे) आणायचे कुठून बायकांना कळलं तर?

 • चंद्रावरती दोन गुलाब' या गाण्यात गुलाब दोन का आहेत? ...बहुधा एक त्याच्या प्रेयसीच्या गालांवर उमललेला व दुसरा चाचा नेहरु नेहमी बटणात खोवायचे तो असणार?

 • बिल क्लिटन हे आपली पत्नी हिलरी हिच्याशी किती एकनिष्ठ आहेत? ...मंत्रीपद स्वीकारतांना घेतलेल्या शपथेशी आपले मंत्री असतात तितके.

 • काश्मीर पाकिस्तानला देऊन टाकले तर आपले संबंध नक्की सुधारतील का? ... असं काही नाही. नंतर ते मुंबई मागतील.

 • वर्ल्डकप फ़ुटबाँलमध्ये भारतीयांचा सहभाग का नव्हता? ...एकमेकात लाथाडी करण्यापासून फ़ुरसत मिळेल तेव्हा ना भारतीय फ़ुटबाँलला लाथ मारणार.

 • प्रुथ्वी गोल आहे कशावरुन? ...नील आर्मस्ट्रांगने चंद्रावरुन पाहिली तेव्हा त्याला ती तशी दिसली होती. त्यावरुन आर्मस्ट्राँग फ़ेकत असेल तर अन्य कारणे भूगोलाच्या पुस्तकात दिली आहेत.

 • अमिताभ बच्चन व जिराफ़ यांच्यात काय साम्य आहे? ... दोघेही शाकाहारी आहेत.

 • पेन आणि बाँलपेन यात चांगले काय? ... परीक्षेत काँपी करायला की बँकेत खोटी सही करायला?

 • राम प्रधान यांच्या पराभवला शरद पवार जबाबदार आहेत काय? ... त्यांच्या स्वतःच्या मुलीला जन्म सोडला तर शरद पवार हे अन्य कशालाही जबाबदार नाहीत.

 • म्हातारपणी लग्न करावं का? ... अवश्य, वधू तरुण असल्याशी कारण.

 • पुर्नजन्मावर तुमचा विश्वास आहे काय? ... नाही बुवा. गेले दोन जन्म मी पुर्नजन्मावर विश्वास  ठेवणं सोडून दिलंय.

 • पैसा माणसाचा अधःपात करतो. ...तो आपल्याकडे नसतो तेव्हा असेच म्हणायचे असते.

 • "के. ई. एम. हाँस्पीटलमध्ये लवकरात लवकर कसं जायचं?" "अगदी रस्त्याच्या मधोमध उभे रहा."

 • सचिन तेंडुलकर विषयी एक वाईट उदगार काढणे शक्य आहे का? ...सचिन तेंडुलकर बारावीत नापास झाला होता.

Click Here To Send This Greetings To a Friend

 
www.shreeyoginfo.com
2007-09 All Rights Reserved