Back to Jokes Home

सुपरहिट जोक्स

पान नंबर

१०

११

१२

१३

१४

१५

१६

 

 

 

 

अहो जरा हसता का ?

  • लक्ष्मीधराची जगातल्या मोठ्यातल्या मोठ्या कोट्याधिशात गणना केली जात असे. एक दिवस  लक्ष्मीधर एकाएकी ॠदयविकाराच्या आजारानं मरण पावला, दुस-या दिवशी सगळ्या वर्तमानपत्रात अगदी पहिल्या पानावर ती बातमी छापून आली. त्यांचा परिचय देतांना अखेर म्हटलं होतं, लक्ष्मीधर हे निपुत्रिक असुन, त्यांच्या अवाढव्य संपत्तील कुणी वारस नाही.  त्यांच्या प्रेतयात्रेला प्रचंड गर्दी लोटली होती. जेव्हा त्यांच्या शवाला अग्नी देण्यात आला, तेव्हा एक चांगले कपडे केलेला इसम धायमोकलून रडू लागला. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्याच्याकडे गेले. गर्दीत वर्तमानपत्रांचे अनेक बातमीदार होते. त्यापैकी एकाने त्याच्याजवळ जाऊन विचारले, तुम्हाला फ़ार दुःख झालंय हे दिसतंच आहे, परंतु प्रत्येकाला एक ना एक दिवस मरण हे आहेच. लक्ष्मीधर तुमचे नातलग होते का? 'नाही ना?' नो इसम म्हणाला, 'म्हणूनच तर मला एवढं दुःख झालंय.

  • आँफ़िसमध्ये फ़िरत कामकाज पहात असतांना मँनेजरची दहा रुपयांची नोट कुठंतरी पडली. त्यानं ती नोट कुणाला सापडली असेल तर ती आणून देण्यास सांगितले. मँनेजरची मर्जी संपादन करण्यासाठी म्हणून कारकुनांसकट सर्वांनी शोधाशोध सुरु केली.  साधारण अर्ध्या तासाने एका प्युनने एक एकच्या दहा नोटा मँनेजरच्या समोर आणून ठेवल्या. त्याबरोबर मँनेजर चकीत होऊन प्युनकडे पाहत म्हणाला 'अरे माझी दहा रुपयांची नोट हरवली आहे. एकेक रुपयांच्या दहा नोटा नाही हरवल्या.' 'ते मला माहीत आहे साहेब' प्युन अगदी निर्विकारपणे म्हणाला, 'दहा रुपयांचीच नोट सापडली. मागच्या खेपेला आपली अशीच एक नोट हरवली होती आणि ती मला सापडली होती. त्यावेळी आपल्याकडे सुटे पैसे नव्हते. ह्या खेपेला अडचण नको म्हणून नोट सुटी करुन आणली.'

  • काँलेज हाँस्टेलमध्ये राहणा-या चार मुलींनी हाँस्टेल सुपरीटेंडेटकडे तक्रार केली की, समोरच्या मुलांच्या हाँस्टेलमधील काही विद्यार्थी कपडे बदलतांना दारं लावून घेत नाहीत. तसंच रात्री झोपतांना ते अंगावर काहीच कपडे नसताना झोपतात. ही तक्रार ऎकून हाँस्टेल सुपरीटेंडेट काहीसे चकीत झाले. तक्रार खरोखरंच खरी आहे की काय हे पाहण्यासाठी म्हणून त्या चार मुलींच्या खोलीत गेल्या. त्यांच्या खोलीतून त्यांनी समोरच्या हाँस्टेलातलं काही दिसतं की काय, हे पाहावं म्हणून त्या खिडकीकडे गेल्या. परंतु तिथून काहीच दिसत नव्हतं. त्याबरोबर त्या मुलींना म्हणाल्या, 'परंतु मला तर इथनं समोरच्या हाँस्टेलच्या खिडक्या दिसतच नाहीत.'  एक मुलगी पुढं होऊन म्हणाली, 'परंतु त्यासाठी खुर्चीवर उभं रहायला हवं.

  • रामू न्हावी एका माणसाची दाढी करीत होता. माणूस बराच लहरी होता. त्याने रामूला विचारले. 'काय रे, कधी गाढवाची दाढी केली आहेस का?' 'नाही, हि पहिल्यांदाच करतोय.'रामू म्हणाला.

  • एका तरुण प्राध्यापकांवर लट्टू विद्यार्थीनीने त्यांना ग्रंथालयात एकटे गाठून म्हटले, 'सर आज संध्याकाळी मला बराच वेळ मोकळा आहे. त्या वेळेत मी काय करावे?' प्राध्यापकांनी शांतपणे म्हटले, 'परवा ट्यूटोरीयलमध्ये तुम्ही खूप चुका केलेल्या आहेत. त्या दुरुस्त करुन ट्युटोरीयल लिहून काढा.'

  • वक्त्यांना नेहमी टाळ्या मिळतात. त्यांची वर्गवारी कशी करता? असं विचारल्यावर एक वक्त्ता म्हणाला, 'भाषण सुरु होण्यापूर्वीच्या टाळ्या म्हणजे भाषण चांगलं होईल अशी आशा. भाषण चालू असताना ब-याच वेळाने मिळणा-या टाळ्या म्हणजे, बसा आता, पुरे झालं. आणि भाषण संपल्यावरच्या टाळ्या म्हणजे,सुटलो एकदाचा रटाळ भाषणाच्या तावडीतूनच्या टाळ्या.'

  • पुष्पा प्रथमच विरारहून जाण्यासाठी म्हणून लोकलमध्ये बसली होती. अंधेरीला गाडी थांबताच एक फ़ँशनेबल तरुणी गाडीत चढली आणि पुष्पाच्या समोरच्या बाकावर बसली. पुष्पा काहीशा कुतुहलानेच त्या तरुणीच निरीक्षण करु लागली.  माहिमच्या खाडीजवळ येताच, त्या तरुणीने आपली पर्स उघडून सेंटची बाटली काढली आणि खाडीतली दुर्गंधी शिरु नये म्हणून बाटली उघडून नाकाला लावली.  त्याचवेळी गाडीत खाडीचा दुर्गंध शिरला, त्याबरोबर नाक फ़ेंदारुन पुष्पा त्या तरुणीकडे पाहात म्हणाली,  'ए बया, तुझी ती बाटली बंद कर की. किती घाण वास आला तुझ्या त्या बाटलीचा.'

  • सुहासचा उदास चेहरा पाहून हाँस्टेलवरचा मित्र त्याला म्हणाला, 'का रे तब्येत बरी नाही का तुझी?' 'तब्येत बरी आहे रे 'मग? चेहरा असा का?'  'कालच वडिलांकडून पुस्तकांसाठी पैसे मागितले होते आणि मनिआँर्डरची वाट पाहात होतो तर पुस्तकांचंच पार्सल आलं...'

  • मुंबईच्या एका हमरस्तावरन रमणलाल मोटारीने घरी चालले होते. तेवढ्यात हवालदाराने शिटी मारुन त्यांना मोटार रस्त्याच्या कडेला घ्यायला सांगितली आणि त्यांच्याकडे ड्रायव्हींग लायसन्सची मागणी केली. मला हे समजू शकत नाही रमणलाल म्हणाले, माझ्या हातून काहीच चूक झालेली नाही तरी.  'असं मी केव्हा म्हटलं?' हवालदार म्हणाला, 'परंतु रस्त्यानं मोटार इतक्या काळजीने चालवत होता की, तुमच्याकडे लायसन्स नसावं याची मला दाट शंका आली.'

  • प्रख्यात इंग्लीश नाटककार जाँर्ज बर्नार्ड शाँ यांना एका प्रसिध्द चित्रपट अभिनेत्रीने विचारले.  'मी तुझ्याशी लग्न करु इच्छिते.' 'कारण कळेल का?' 'लग्नानंतर आपल्याला जे मुल होईल ते तुमच्याप्रमाणे बुध्दीमान आणि माझ्याप्रमाणे सुंदर होईल.' 'आणि उलट झालं तर?' शाँनी विचारलं.

Click Here To Send This Greetings To a Friend

 
www.shreeyoginfo.com
2007-09 All Rights Reserved