Back to Jokes Home

सुपरहिट जोक्स

पान नंबर

१०

११

१२

१३

१४

१५

१६

 

 

 

 

अहो जरा हसता का ?

  • एक आडदांड माणूस हाँटेलातून बाहेर पडला. त्याच्या हातात छ्त्री होती. तोच दुसरा एक काळाकुळा माणूस त्याच्यामागे धावत आला आणि त्याने त्या आडदांड माणसाला विचारले, 'आपण चिंतामण चिकटे

            का? ' 'नाही' ... तो गरजला.

            'म ...म... मी चिंतामण चिकटे आणि तुमच्या हातातली छ्त्री चिंतामण चिकटेची आहे.' काळाकुळा म्हणाला.

  • एकदा रवी खेळण्यांच्या दुकानात जाऊन एक बंदूक मागतो. दुकानदाराने बंदूक दिल्यानंतर त्याला तो नकली नोट देतो. रवीने नकली नोट दिल्याचे दुकानदार त्याला सांगतो. तेव्हा रवी म्हणतो, तुम्ही सुध्दा मला नकली बंदूक दिली ना.'

  • एका नवीन नाटककारानं लिहिलेल्या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला जेष्ठ नाटककार श्री अमुकतमुक यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केले होते. नाटक संपल्यावर नाटककारानं श्री अमुकतमुक यांना अभिप्राय विचारल्यावर ते म्हणाले, नाटकाच्या शेवटच्या सीनमध्ये नायक खलनायकाला सुरा खुपसून मारतो याऎवजी पिस्तुलाची गोळी झाडून मारतो असं दाखवा. हा फ़रक कशासाठी, 'असं विचारल्यावर श्री अमुकतमुक म्हणाले. ठो आवाजाने प्रेक्षक नक्की जागे होतील.'

  • एका हत्तीणीचे आँपरेशन झाल्यावर सर्जन नर्सला विचारले, सगळी हत्यारे व्यवस्थित परत ठेवलीत ना? काही राहीले तर नाही ना? नर्स म्हणाली, 'सर हत्यारे सर्व मिळाली, पण डाँक्टर देशपांडे कोठे दिसत नाहीत.'

  • एक प्रख्यात दरोडेखोर आरोपीच्या पिंज-यात उभा होता. न्यायाधिशाने त्याला विचारले, 'एकच घर तू या आठवड्यात तीन वेळा फ़ोडलंस. तुला याबद्द्ल काही सांगायचंय का?'  'या मुंबईत घरटंचाई किती आहे साहेब, हेच यावरुन सिध्द होत नाही का?'

  • पँरीसमध्ये एक असे केशकर्तनालय आहे, तेथे केवळ कुत्र्यांच्याच हजामती केल्या जातात. या केशकर्तनालयात येणा-या प्रत्येक कुत्र्याला मोठ्या आदराने खुर्चीवर बसवले जाते आणि केस कापून होताच त्याच्या पुढे आरसा धरण्यात येऊन ते कसे कापले आहेत ते त्याला दाखवले जाते.

  • सिगरेट सोडणे फ़ार सोपे काम आहे. आजपर्यंत मी ती शंभर वेळा सोडली आहे.' मार्क ट्वेन.

  • एका छोट्या मुलीने शिक्षकांना विचारले, 'गांधीजी जर इतके प्रामाणिक होते, तर त्यांच्या जंयतीला आपण सगळ्या बँका बंद का ठेवतो?'

  • तुम्हाला जर गोगांट करणा-या बायकांना शांत करायचं असेल तर त्यांना एकच विचारा - 'तुमच्यापैकी वयाने मोठी असलेली बाई फ़क्त बोलेल.'

  • गणपुले वर्ष संपता आपल्या फ़र्मच्या मालकाकडे गेले आणि म्हणाले, 'साहेब, मला पगारवाढ हवीय.' 'तुमच्या शेजारच्या टेबलावर बसून जो कामं करतोय, त्याच्यापेक्षा तुमचा पगार जास्तच आहे आणि त्याला सहा मुलं आहेत' मालक म्हणाले. गणपुले म्हणाले, 'माझी अशी समजूत आहे की, आम्हाला जो पगार मिळतो, तो आम्ही इथं बसून काय उत्पादित करतो त्यासाठी आहे. आम्ही आमच्या खाजगी वेळेत घरी काय उत्पादन करतो त्यासाठी नव्हे. आणि गणपुलेंना पगारवाढ मिळाली.'

Click Here To Send This Greetings To a Friend

 
www.shreeyoginfo.com
2007-09 All Rights Reserved