Back to Jokes Home

सुपरहिट जोक्स

पान नंबर

१०

११

१२

१३

१४

१५

१६

 

 

 

 

अहो जरा हसता का ?

  • एका स्त्रिच्या साडीवर चांदण्यांची डिझाईन होती व तिच्या हातात एक दाट केस असलेला छोटासा कुत्रा होता. ती रस्त्यावरुन जात असतांना एक लांबलचक दाढीवाला येतो.

    दाढीवाला - आकाश के तारे, तेरे साडी पे.

    स्त्री - मेरे कुत्ते के बाल, तेरे दाढी पे.

  • बंडू - आई, तुला सर्कशीतले खेळ येतात का गं ?

    आई - नाही रे.

    बंडू - मग शेजारच्या काकू कशा म्हणतात की तू बाबांना बोटावर नाचवतेस म्हणून?

  • आई - बंडू दुकानातून अर्धा किलो साबुदाणा घेऊन ये. उपवासाच्या दिवशी साबुदाणा चालतो. (थोडया वेळाने)

    आई - अरे, तू साबुदाणा का आणला नाहीस?

    बंडू - आई तू म्हणाली होतीस ना, साबुदाणा उपवासाच्या दिवशी चालतो म्हणून मी साबुदाण्याची पिशवी रस्त्यावर ठेवली. आता तो चालत चालत येईल इकडे.

  • मुलगा - बाबा, कोल्ह्याला कोल्हाच का म्हणतात ?

    बाबा - याचं उत्तर सोपं आहे. कोल्हा कुणासारखा दिसतो? तो हत्तीसारखा दिसतो? नाही. वाघासारखा दिसतो का? नाही. चिमणीसारखा दिसतो का? नाही. मग तो कुणासारखा दिसतो?

    मुलगा - कोल्ह्यासारखा.

    बाबा - बरोबर. म्हणून त्याला कोल्हा म्हणतात.

  • शिक्षक - रमेश, तुला रोज शाळेत यायला उशिर का होतो? तू तर सायकलवरुन येतोस.

    रमेश - याचे कारण शाळेच्या रस्त्यावर असलेली पाटी.

    शिक्षक - कोणती पाटी?

    रमेश - त्यावर लिहिलयं, पुढे शाळा आहे. सावकाश जा.

  • घटस्फ़ोटाचा खटला चालू आहे.

    माधवी - न्यायमूर्ती, लग्नानंतर वर्षभर सुखाने संसार केला आणि वर्षाने वासंती आली.

    न्यायमुर्ती - मग वाईट काय त्यात?

    माधवी - नाही हो. वासंतीचं वय वीस वर्ष आहे. चांगली देखणी, शेजारी राहणारी.

  • वासंती - मी तुमच्यासाठी किती कष्टाने गाजर हलवा केला त्याची तुम्हाला कल्पना नाही.

    वसंत - आणि मीही तो किती कष्टाने खाल्ला त्याची तुला कल्पना नाही.

  • वडील - काँलेजात तू सगळ्यात कठीण गोष्ट कोणती शिकलास?

    मुलगा - दातांनी बिअरची बाटली कशी उघडावी.

  • विवेक - लठ्ठ माणसं नेहमी गोड का बोलतात?

    विशाल - कडू बोललं तर पळून जाऊ शकत नाहीत म्हणून.

  •  बगाराम वर्तमानपत्राच्या कार्यालयात गेला. त्याला त्याच्या दिवंगत भावाच्या निधनाची बातमी प्रसिध्द करायची होती. तिथल्या कारकूनाला त्यानं किती खर्च येईल असे विचारले.

    कारकून -  'एका काँलम सेंटीमीटरला ४० रुपये.'

    बगाराम - ' अरे बापरे माझा भाऊ तर १८० सेंटीमीटर होता.'

Click Here To Send This Greetings To a Friend

 
www.shreeyoginfo.com
© 2007-09 All Rights Reserved