Back to Jokes Home

सुपरहिट जोक्स

पान नंबर

१०

११

१२

१३

१४

१५

१६

 

 

 

 

अहो जरा हसता का ?

 • आज तो उशीरा घरी आला. त्याची बायको दारातच उभी होती. ती, म्हणाली, 'तुम्ही मला शब्द दिला होतात की, यापुढे मी दारुच्या थेंबालाही स्पर्श करणार नाही. तुम्हाला मी कैक वेळा सांगितले आहे. तुम्ही दारु सोडली नाहीत, तर मी तुम्हाला सोडून जाईन.'

  'तू तरी तुझा शब्द खर की,' तो अडखळत म्हणाला.

 • दगडू नावाप्रमाणे दगड आणि सांगकाम्या नोकर होता. त्याला प्रत्येक गोष्ट नीट समजावून सांगावी लागे, एके दिवशी त्याच्या हातावर ठमाकाकूंनी एका रुपयाची दोन नाणी ठेवली आणि त्या म्हणाल्या, ' हे बघ दगडू एक रुपयाचे टमाटर घेऊन ये आणि एक रुपयाचे बटाटे घेऊन ये.'

  दगडू बरं म्हणाला आणि धावत निघाला, थोड्या वेळाने परत आला तेव्हा ठमाकाकू म्हणाल्या.

  'आणलेस टमाटर-बटाटे.'

  'नाही' -दगडू

  'का?'

  'कुठल्या रुपयाचे टमाटर आणायाचे आणि कुठल्या रुपयाचे बटाटे आणायचे हे तुम्ही कुठं सांगितलं होतंत?'

 • ही समाधी माझ्या मित्राची आहे. त्याने आपल्या म्रुत्यूनंतर आपले सर्व काही अनाथआश्रमास देऊन टाकले.

  फ़ार थोर होते ते, काय दिले त्यांनी?

  चार मुली आणि दोन मुलगे.

 • एका शिंप्याकडे एक इसम आला. शिंप्याने हातातलं काम खाली ठेवलं आणि विचारलं, काय शिवायचं आहे आपणाला?'

  'माझ्या मुलानं तुमच्याकडून चार वर्षापूर्वी वुलनचा सूट शिवून नेला होता आणि त्याचे पैसे त्याने अजून दिले नाहीत, असं मला समजलं आहे.' तो इसम म्हणाला.

  होय, होय! शिंपी आतूर होऊन म्हणाल, तुम्ही ते द्यायला आला आहात का ?

  'नाही...नाही' तो इसम म्हणाला, 'त्याच शर्तीवर तुम्ही मलाही एक सूट शिवून द्याल का म्हणून विचारायला आलोय.'

 • वझेबाई चांगली साडी खरेदी करायला गेल्या. त्यांनी दुकानदाराला एका साडीची किंमत विचारली असता दुकानदार म्हणाला, '३०० रुपये'

  वझेबाई जोरात म्हणाल्या, बापरे!

  त्यांनी दुस-या एका साडीची किंमत विचारली, दुकानदार म्हणाला, 'दोनदा अरे बापरे'

 •  काँलेजातून पदवीधर झालेल्या एका तरुणाने पुढे व्यवसाय करुन चांगली संप्पती मिळवली. एक दिवस तो आपल्या काँलेजात गेला आणि प्राध्यापकांना म्हणाला, मी बराच पैसा मिळवला आहे. आणि माझ्या काँलेजसाठी काही करावं अशी माझी ईच्छा आहे. मी कुठल्या विषयांत विशेष प्राविण्य दाखवलं होतं, ते तुम्हाला आठवतं का?

  प्राध्यापक म्हणाले, 'माझ्या वर्गात असताना तू नेहमी झोपा काढायचास.'

  'छान हरकत नाही. मी काँलेजच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठं शयनग्रुह बांधून देतो.'

Click Here To Send This Greetings To a Friend

 
www.shreeyoginfo.com
2007-09 All Rights Reserved