५१ स्वप्नात येतेस तेव्हा, अमूल्य भेट द्यावीशी वाटते.खरोखर समोर आलीस की, चापट द्यावीशी वाटते.
५२ तुमच्या डोक्यावर हात न्या शिंगे आहेत का ? नाहीत ? पक्का....पुन्हा तपासा नाहीत ? हंड्रेड पर्सेंट ? ठीक आहे.गाढवाच्याही डोक्यावर शिंगे नाहीत.
५३ मंदिरात तुला भेटलो नाही, म्हणून ती रुसलेली......मी भेटायला आलो नाही, कारण माझी बायको आत बसलेली.
५४ तुझ्यासाठी बंगला मी बांधला आहे भिवंडीला,एकदा तरी येऊन भेट तुझ्या लाडक्या गवंडीला.
५५ मुंबईतल्या अतिवॄष्टीला जबाबदार कोण ? आपले आर.आर.पाटील का ? त्यांनी अप्सराचं नृत्य बंद केल्यामुळे पर्जन्यराज इंद्रदेवाचा कोप झाला ना.
५६ प्रेम फ़क्त एकट्यासाठी करायचे असते.आणि आयुष्यभर निभवायचे असते.सत्यनारायणाचा प्रसाद म्हणून वाटत सुटायचे नसते.
५७ मंदिरासमोर आम्ही खेळत होतो क्रिकेट तिकडून आली मुलगी आणि पडली माझी विकेट.
५८ शक्ती येण्यासाठी आता व्यायामाची गरज नाही.जाहिरातीतला चहा पिला की डोंगरही उचलायला हरकत नाही-
५९ तिचे सुंदर रुप पाहूनी,माझे भान हरपून गेले भानावर मी आलो तेव्हा,दुध सारे करपून गेले.
६० तुझी रोजची वटवट ऎकून कधी-कधी असं वाटतं देवानं तुला खापराचं का नाही तोंड दिलं !
६१ अंधारात आलीस मला धडकलीस ऎवढी कशी काळी गं तू हसलीस म्हणून दिसलीस.
६२ कोण म्हणतं तू प्यारी सी गुडिया तू तर माझ्यासठी आफ़त की पुडिया !
६३ कसा आहेस ?-बरा आहे ताई कशी आहे ?-बरी आहे.आई पण बरीच असेल-हो.बाबा पण बरेच अस्तील ? -नाही बाबा एकच आहेत !
६४ करुन करुन भागलीस...आणि आता आईबरोबर देवपूजेला लागलीस ?
६५ मना सज्जना प्रेम दुरुनी करावे,जरी तिच्या जवळ असा नीट उभे रहावे,तिने नालायक संबोधता आपण थँक्स म्हणावे.
६६ माझ्याशीच नेहमी असं का बरं होतं जेव्हा-जेव्हा माझं मन कुणावर जडतं लव्हस्टोरी सुरु होण्याआधीच मध्येच कोणीतरी बिब्बा घालायला कलमडतं.
६७ जवळ आला दसरा म्हणून दिला गजरा,ती दोन पावलं पुढं आली आणि वाजवले माझे साडेबारा.
६८ कालपर्यंत मला वाटत होतं तिरक्या नजरेनं तू मलाच पाहतेस आज पटलंय तो भ्रम होता माझा,कायम तू तशीच पाहतेस !
६९ करतेस नखरा,फ़क्त एकच तुला कळत नाही खाजवतेस डोकं कुठही खराखरा !
७० तुझ्यावर प्रेम केले माझी भावी पत्नी समजून पण जळवलंस मला तू पूजेतील अगरबत्ती समजून.
७१ मन वेडं झालं,तर काय होतं ? जास्त काही होत नाही मेंटल हॉस्पिटलला जावं लागतं ! स्वतःला समजतेस ऎश्वर्या रॉय,अगं तू तर गावातील गावरान गाय !
७२ स्टॅण्डवरच्या गर्दीत मला ती दिसली माझ्याकडे पाहून ती थोडी हसली,हसल्यावर मी म्हटलं पोरगी फ़सली,मी तिच्या जवळ जाताच कसली अहो कानाखाली माझ्या चप्पल बसली.पुन्हा दुसरी मुलगी हसली मी मात्र घरची वाट धरली..........
७३ अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं तुझ्या लेकाचं डोकं जणू कालवणाचं भगुलं.
७४ सदा सर्वदा योग तुझा घडावा तो घडत असताना तिथे कोणी नसावा.
७५ कोल्हापुरचा फ़ोटो,इचलकरंजीची पैठणी साडी कधीही न तुटणारी दोघांची जोडी.
७६ पुरामध्ये भवरा अन मंत्र्यांचा दौरा मतदारांना चुचकारितोसी अरे लब्बाड चोरा झाला संसाराचा इस्कूट त्यांना वाटतोय बिस्कूट जनता झोपे अंधारात मंत्री ऎशारामात.
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
 
www.shreeyoginfo.com
© 2007-09 All Rights Reserved