|
१ |
दुध उतू जाई पर्यंत तापवू नकोस, माझा जीव जाईल इतका जीव लावू नकोस. |
२ |
मी म्हणतो काही नको फक्त तुझी साथ दे, मझ्याबरोबर फिरण्यासाठी फक्त तुझा हात
दे. |
३ |
उमटली तुझी पाऊले इथेच ओल्या रेतीत, आठवून आठवून शेवटी आठवणीच उगवती मातीत. |
४ |
समजू नकोस उथळ मझ्या मैत्रीला मी शेवाळ नाही, हंसही नही, संकटात साथ सोडून
पळणारा,मी आहे
........., स्वतः जळून इतरांना प्रकाश देणारा.
|
५ |
आज काल स्वप्नांनाही तुझीच सवय झाली आहे, जगण्याला ही माझ्या काहिशी
रंगत आली आहे. |
६ |
हल्ली हल्ली मला तुझी स्वप्ने पडतात, स्वप्नातून तू जाताच मला झोपेतून जागं
करतात. |
७ |
तू सुंदर दिसतेस त्याला तू काय करणार, प्रेम करतो तुझ्यावर त्याला मी काय
करणार, पण काय आहे तुझ्यावर मला कळत नाही तुला
पाहिल्याशिवाय माझा दिवस जात नाही. |
८ |
जो बाण मारतो त्याला तो विसरुन जाणं सोप असतं पण ज्याच्या हृदयावर बाण
बसतो,त्याला त्याच्या वेदना समजतात. |
९ |
तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय की मलाच मी सापडत नाही, एकटा
शोधावा म्हटल पण तुझ्याशिवाय काहीच सापडत नाही. |
१० |
तुझ्या जवळ काही मागितल्यावर तु म्हणतेस...... मलाच घेऊन जा, त्यावेळी मला
तुला सांगावसं वाटतं तू माझ्यातच विरुन जा.
|
११ |
केतकीच्या वनातील किरणांचे कवडसे कुंजविहार करतात, कुसुमापरी कुंचल्यातून
कसरत करत करत कालांतराने कंर्णमधुर कोमलतात. |
१२ |
तू मला दिसलीस की मनात माझ्या धडधडतं,थोडी लाजून हसलीस की बजेट माझं गडगडतं. |
१३ |
खूप दूर असतेस नयनांपासून माझ्या अंतःकरणातून मात्र जवळ नयनांचा विरह सहन तर
होत नाही म्हणूनच रोज भेटण्यासाठी वेड्या मनाची घाई. |
१४ |
पिवळे पिवळे हरीण त्याचे वाकडे तिकडे पाय तुमचा एकही एस एम एस आला नाही
मोबाईलचा बॅलन्स संपला की काय ? |
१५ |
हसत होतीस तु,बोलत सुध्दा होतीस न सांगता कळत होते तु प्रेम करत होतीस
मैत्रीणीच्या संगतीची चुणुक हळुच
येई वा-याची झुळुक नसे याची कल्पना मुळीच गंधवेडी
सोबत जाईल हळुच. |
१६ |
संध्याकाळ मावळून गेली सुर्यास्त झाल्यावर आणि काळोख मात्र नटून बसला चांदण
आल्यावर. |
१७ |
आवाज येत होता झुळुझुळु पाण्याचा,थांबवू शकत नव्ह्तो वेग मनाचा,क्षण
प्रत्येक जो होता आनंदाचा,तो अनअमोल आनंद होता आमच्या प्रेमाचा. |
१८ |
गाण्यातुन कळ्तो अर्थ म्हणून जीवनाला आहे मतितार्थ,काहीच नाही असमर्थ फ़क्त
करायचे आहे सार्थ. |
१९ |
तुझ्या प्रेमात मी भारावून गेलो होतो,ध्यानीमनी प्रत्येक क्षणी मी
तुलाच आठवत होतो. |
२० |
निसर्गाला रंग हवा असतो फ़ुलाला गंध हवा असतो माणुस हा एकटा कसा राहणार कारण
त्यालाही प्रेमाचा छंद हवा असतो. |
२१ |
दिस नकळत जाई रात्र रेंगाळत राही असा एकही क्षण नाही की तुझी आठवण येत नाही. |
२२ |
माझ्यापासून दूर गेल्यावर आठवण माझी काढशील ना ? काही बोलावसं वाटलं तर
मोबाईलवर कॉल करशील ना ?
|
२३ |
मनातील शंका एकत्र साठव.......... भूतकाळातील गोष्टी पुन्हा आठव..........
माझी आठवण आल्यास माझ्या नावाने एस एम एस पाठव. |
२४ |
चार शब्द कधी बोलत नाहीस एक कटाक्ष तरी टाकत जा,कॉल कधी करत नाहीस मिस कॉल
तरी करत जा! |
२५ |
शरीररुपी हण्डसेटमध्ये आत्मरुपी सिमकार्ड टाकलेले असतं, पापपुण्ण्याचे कॉल
करुन एक दिवस कार्ड संपलेले असतं. |
२६ |
प्रेमाचा वर्षाव नुकताच होवू लागलाय कधी न जाणवणारा सुगंध सभोवार दरवळू
लागलाय. |
२७ |
हिरवे हिरवे पान त्याला हिरवा हिरवा देठ माझी आठवण आली की स्टेशनवर येऊन भेट. |
२८ |
एक मनी आस एक मनी असावा,तुझा चंद्र्मुखी चेहरा रोज नजरेस पडावा नाहीतर तो
दिवसच नसावा. |
२९ |
रातराणी उमलावी तशी उमलतेस,माझ्या मनात मनापासून दरवळतेस,खरं
सांगु का तु मला खूपखूप मनापासून आवडतेस. |
३० |
तू येणार असताना पावसाचं येणं कळत नाही,पण तुझ्या प्रेमाएवढा भिजण्याचा आनंद
मिळत नाही. |
३१ |
पापण्यात लपलेली तुझी नजर माझ्याकडे बघून लाजत आहे तुझ्या पायातील पैजण सुध्दा
माझ्या नावाने वाजत आहे. |
३२ |
प्रीतीच्या फ़ुलपाखरा माझा एक संदेश देशील का ? माझं मन जिथं आहे त्यांना टोच
मारुन मिसकॉल करण्यास सांगशील का ? |
३३ |
प्रेमाच्या गावात घसरला पाय,आजच्या मुलींचा भरवसा काय ? एकाला हाय,दुस-याला
बाय तिस-यासंगे पळून जाय........... |
३४ |
जेव्हा तुला एकटे वाटेल नजरेसमोर धुके वाटेल आस-पास कोणीच दिसणार नाही,सगळे
जग अंधुक होऊन जाईल,तेव्हा तू माझ्याकडे ये मी तुला डोळ्यांच्या डॉक्टरांकडे घेऊन
जाईन. |
३५ |
तुझ्या प्रेमाने कपाळावरचं कुंकूसुध्दा हसतं ! खरंच सखे या बंधनात किती
सामर्थ्य असतं ! आपलं कोणीतरी असण्यापेक्षा, आपण कोणाचे तरी व्हांव ! त्याच्यासाठी
जगत असताना त्याचंच होऊन जावं. |
३६ |
छोट्या मोठ्या केसांना जोर लावतेस कशाला,मुळातच आहेस गोरी पावडर लावतेस कशाला
? |
३७ |
तुला भेटण्याचे वचन,तु माझ्याकडे मागितले होते पण घरी लवकर या,असे बायकोने
सांगितले होते, |
३८ |
सॉरी ! तुला त्रास दिल्याबद्द्ल पण कामच तसं आहे........ तू तुझा फ़ोटो पाठवून
देशील का ? मी पत्ते खेळतो आहे.....परंतु जोकर हरवला आहे. |
३९ |
साडी नेसून दिसते सुंदर स्वप्नात धरला मी तुझा पदर,उठून पाहतो तर काय हातात
माझ्या चादर. |
४० |
सळ आली अंगावर चुंबन दिले गालावर कवेत घेना म्हणत होती वा-याची
ती झुळक होती तुला हसताना पाहण्यासठी मी स्वतः विदुषक झालो तू सासरी गेल्यावर मात्र
मी सर्कसीतच परमनंट झालो. |
४१ |
जरा कुरकूर झाली की धमकी देतेस सोडून जाण्याची सावली पडली आहे
तुझ्यावर सुध्दा बहुतेक त्या राजकारण्याची. |
४२ |
तुझी आठवण आली की मला काही सुचत नाही,मी तुझा अन तु माझी
याशिवाय काही सुचत नाही. |
४३ |
बरसात की रात,एक भिगी लडकी,भिगी झुल्फ़े,भिगे होंट, उसे नजरे मिली
उसे देख कर ऎसा लगा उद्या हिला १००% सर्दि होणार. |
४४ |
तुझचं प्रेम होतं नशिबवान म्हणून दिलास माझ्या हातात हात,असताना
सदैव तुझी साथ,लाखो संकटांवर मी करेन मात. |
४५ |
माझ्या डोळ्यातील कधीतरी वाचून पहा भाव, त्यात फ़क्त दिसेल तुला
प्रिये,तुझे नाव. |
४६ |
रात्र झाली तरीही डोळे मिटून जागा राहतो,तुला घेऊन येणा-या
स्वप्नांची वाट पाहतो. |
४७ |
ती येण्याआधी पावसाचे अवेळी येऊ नये ती आल्यावर मात्र पावसानं
बरसण्याचं विसरु नये. |
४८ |
मी पाहतो तुझ्याकडे तू पहावेस म्हणून पण हसते तुझी मैत्रीण मी
हसतो तुझ्याकडे बघून तू हसवेस म्हणून तर हसते तूझी मैत्रीण.म्हणुनच मी ठरवलं तुझ्या
मैत्रीणीलाच प्रपोज करायचं,म्हणजे तू हो म्हणशील बरोबर ना ? |
४९ |
आहेस थोडी गोरी म्हणून समजू नकोस परी तुझ्यापेक्षा आमची मोलकरीण
बरी. |
५० |
आपुन बोला-तु मेरी लैला, वो बोली का खोड काडतोस, जा ना मुकंच
बैला ! |
|