५१ तुझ्या डोंळयात आश्रू येतील असं मी कधीच वागणार नाही लारण त्या अनमोल आसवांची किंमत मी चुकवू शकणार नाही.
५२ रवि गेला अस्ताला आकाशाला झाली गुलाबी उधळण मला सतावत होते फ़क्त ......तुझीच आठवण.
५३ फुलाकडे सहानुभूतीनं काय बघतेस त्याला देठाचा तरी आधार आहे जरा माझ्या ह्रदयात डोकावून बघ तुझ्यावाचून सगळा अंधार आहे.
५४ तुझी वाट पाहून शिणले डोळे आता पापणीही ढळेना. हुंदका देऊन रडावंसं वाटलं तर अश्रूही गळेना.
५५ आयुष्यात प्रेमाच्या वाटेवर प्रसंगी काटेही बोचतात, हे माहित आहे मला तुझी साथ लाभणार असेल तर तेही सहन करायला दुःख नाही होणार मला.
५६ तुझी मूर्ती आता मी मनाच्या कप्प्यात बंद केलीय. तिच्यासाठी आता मी कायमस्वरुपी पुष्पमाला अर्पण केलीय.
५७ तुझी आठवण ही नित्यनवा अनुभव आहे कधी उसळणारे वादळं, तर कधी पाकळीवरचं दव आहे. मी तुला सोडून जाईन अशी वेळ कधीही येणार नाही. अशी वेळ आलीच तर मी तुझ्या आधीच निघून जाईन.
५८ अनोळखी होतीस तू ओळख केलीस माझ्याशी दोस्ती फक्त माझी करुनी प्रेम केलेस दुस-याशी.
५९ इतकं प्रेम करु नये की प्रेम हेच जीवन होईल कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल.
६० सहवास चार दिवसाचं वेड लावुन गेला जाता जाता डोळयामध्ये अश्रू ठेवून गेला आयुष्यात नेहमीच तुझी आठवण येत राहील सुखाची किंमत तुझ्याविना अधुरीच राहिल.
६१ कळयांची फुले होताना गंधसुध्दा दरवळतो तुझी वाट पाहताना जीव कसा व्याकुळतो.
६२ प्रेमात तुझ्या जगण्यासाठी एकदा तरी भेटावंसं वाटतं मिठीत तुझ्या, दुःखांना विसरुन सारं जग विसरावसं वाटतं.
६३ प्रेमात जरा रागवल्याशिवाय प्रेमात गोडी येणार नाही आणि रागावून जरा दूर गेल्याशिवाय त्या भेटीचे महत्त्व तुला कळणार नाही.
६४ दीप माझ्या स्म्रुतीचा जपून जरा सांभाळ कोणजाणे आयुष्याची केव्हा येईल संध्याकाळ.
६५ दिल तोडायचं होतं तर आधी प्रेम करायला तरी का शिकवलंस नंतर खुप रडवायचं होतस तर आधी हसवायला तरी का शिकवलसं.
६६ तुझ्यासोबत सजवलेलं स्वप्नाचं घर मी कधीही तोडणार नाही तू ये किंवा नको येऊस तुझी वाट पाहणं सोडणार नाही.
६७ कधी कधी माझ्यावर तुझ्या आठवणीचा मेघ पसरतो वाट पाहणा-या डोळयांतून गालावरती हळूच थेंब उतरतो.
६८ फुलासारखी फुलत रहा सुगंधासारखी दरवळत रहा डोळयात अश्रू आले तरी आयुष्यभर हसत रहा.
६९ तुझी- माझी भेट कदाचित घडत राहील पुन्हा पुन्हा पण प्रश्नच राहतोय तू कधी भेटशील पुन्हा ?
७० एक चारोळी माझ्य़ा मनात नकळत प्रेम बसवुन गेली शेवटची ओळ मात्र ह्रदयाला फसवून गेली.
७१ तु समोर आलीस की नुसतं तुला बघत असतो आणि तू जवळ नसताना तुझ्या आठवणीसोबत जगत असतो.
७२ सौदर्याची तु खाण अन अत्तराचा घडा प्रेम कर माझ्याव नाहीतर होईन मी वेडा.
७३ तरी ओठावर हसू दिसायला हवं दूरवर गेलेल्या पावलांनी माझ्यासाठी वळायला हवं.
७४ मी म्हणालो माग हवे ते ती म्हणाली तुझे काही नको राजा सर्व काही दिले देवाने आणि तूच एक फुटका पेला नशिबी माझ्या.
७५ जीवनातील सारी सुखद स्वप्ने ओंजळीने भरुन घ्यावी कितीही आडवळणे आली तरी ती तुला भरभरुन द्यावी.
७६ माझ्या आयुष्याचं ध्येय मी आता ठरवलंय म्हणूनच खेळकर मनाला मी थोडसं आवरलंय.
७७ प्रेमभंगाचा धोका आणखी कोण खातोय ? म्हणूनच मी आता एकटाच रहातोय.
७८ लिहायचं तुला काही म्हणून हट्ट मनाने धरला मजकूर सारा लिहिला पण मायनाच नेमका उरला.
७९ रात्री माझ्या घरासमोर अंगण भरुन चांदणं पसरलं सकाळी पाखरांनी चिवचिवाट केला आणि चांदणं अंगणाला विसरलं.
८० तू कुठेही रहा, सुखी रहा सुख माझॆ त्यातच आहे कुठेही जा स्वतःला जपत रहा कारण माझा प्राण तुझ्यात आहे.
८१ माझ्याही मनाच्या कोप-यात कधीकाळी बीज अंकुरलं होतं पण तुझ्या एका नकाराने ते रुजण्या आधीच कोमेजून गेलं.
८२ चालून चालून चालायचं असतं मधूनच वाकडं वळायचं असतं असचं असतं जीवनाचं सार म्हणुन जीवन जगायचं असतं.
८३ आपलं फ़सणार प्रेम हा नियतीचा खेळ आहे आपण एकत्र यायला अजूनही वेळ आहे काही क्षण असे असतात की जे विसरायचे नसतात,काही अश्रू असे असतात की जे दाखवायचे नसतात.
८४ तुला कधीच विचारणार नाही मला का सोडलंस ? तो मात्र सुदैवी आहे ज्याच्याबरोबर नवं नातं जोडलंस.
८५ साथ तुझी हवी मला हे जीवन जगताना आठवण तुझी येते मला मी एकटी असताना.
८६ दुःख सारे विसरुन हसलो फ़क्त तुझ्याचसाठी तूच सांग कधी रडलीस का माझ्यासाठी.
८७ प्रेमाच्या सागरात अर्धवट सोडून दिलीस तू मला प्रेमाची सजा परंतू तुला काय माहित असे प्रेम करण्यातच असते वेगेळी मजा.
८८ जळणा-या वातीली प्रकाशाची साथ असते नेहमी माझ्या मनात तुला भेटण्याची आस असते.
८९ आता मी सुद्धा ठरवलंय अगदी तुझ्यासारखं वागायचं तू हसलीस तर हसायचं तू रुसलीस तर रुसायचं.
९० ढग येतात पण पाऊस पडत नाही आठवण येते पण चेहरा दिसत नाही पुढे गाय मागे वासरु सांग प्रिये तुला कसे विसरु.
९१ वेडी झाले तुझ्यासाठी जरी थांब आता थोडा तरी कशासाठी करतोस अशी माझ्या मनाची अधोगती.
९२ तुझ्याचसाठी जन्म घेतला तुझ्याचसाठी मरणार आहे तुझ्यावाचून माझ्या जीवनाला अर्थ तरी काय उरणार आहे.
९३ पावसाच्या थंडगार थेंबात चिंब चिंब भिजायचं असतं जीवनातील दुःख विसरुन क्षण्भर जगायवं असतं
९४ प्रेम करणे हा गुन्हा असेल तर तो मला मान्य आहे.तुझ्यासाठी शिक्षा भोगण्यास मी केव्हाही तयार आहे.
९५ तू मला विसरली असलीस तरी मी नाही विसरणार तुला कधी विसरतो का किनारा आपल्या अथांग सागराला ?
९६ जीवनात दुःखाचा सागर असेल,जन्म आपण घेतला आहे तर जीवेनात जगायलाच पाहिजे.
९८ रात्र संपते दिवस उगवल्यावर,दिवस संपतो अंधार पडल्यावर, माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे विसरु शकेन डोळे मिटल्यावर.
९९ तारुण्या प्रेमाचा मोह कुणालाच आवरता येत नाही बदनाम तोच होतो जो योग्य वेळी स्वतःलाच सावरत नाही.
१०० ज्याला चेतना असतात त्याला वेदना होतात अन ज्याला भावना असतात्त्यालाच यातना होतात..........
१०१ जेव्हा काळाची वेळ येते तेव्हा वेळेत काळ घेऊन जातो.मातीत विलीन झाल्यावरही आत्मा मात्र अमर राहतो.
१०२ कुणी कुणाचा नसतो साथी देहाची अंती होते माती.आपणच आपल्या जीवनाचे सोबती मग कशाला हवीत हो खोटी नाती.
 
www.shreeyoginfo.com
© 2007-09 All Rights Reserved