५१ सर्वच गोष्टी सांगायच्या नसतात,ज्या गोष्टी न सांगता समजतात त्याला वेडं प्रेम म्हणतात.
५२ अक्षर उमटतं पण शब्द सुचत नाहीत अक्षराच्या खेळात आता अक्षरच सूचत नाहीत तुला काय एस एम एस करु झोळी माझी खाली आहे शब्दांसाठी भुकेला मी भिकारी पेक्षा भिकारी आहे एसएमएस करायला कुणाचा रिप्ले मिळत नाहे,भिक मागून सुद्धा कुणी माणूसकी दाखवत नाही.
५३ जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचं असतं तेच प्रेम आयुष्यभरं मनात जपायचं असतं.
५४ माझ्यावर तुझे प्रेम आहे असे मला समजले आहे.तुझ्या ओठांनी नाही पण तुझ्या डोळ्यांनी सांगितले आहे.सत्य आहे की भास हे समजण्यासाठी ह्य चार ओळी लिहिल्या आहेत.
५५ तू काहीही सांग मला जमणार नाही असं काहीच नाही तुझ्यासाठी काहीही करताना मी हातात काहीही राखत नाही.
५६ मला माहित आहे,माझा प्रत्येक शब्द पुन्हा पुन्हा वाचशील प्रत्येक शब्दात मला आठवशील...........
५७ तू माझ्यावर प्रेम करणं,म्हणजे सूर्याच पश्चिमेकडे उगवणं आणि मी तुझ्यावर प्रेम करणं, म्हणजे माझं दिशाहीन जगणं.
५८ क्षणभर वाटते मला तुला पाहावे मी चोरुन,तुझे गोड नाव ह्रदयात माझ्या ठेवावे मी कोरुन.
५९ कातरवेळचा गार वारा तुझ्या स्मृती घेऊन भेटतो मिट्ट काळोखी येता गारवा पाऊस अलगद डोळ्यांत दाटतो.
६० समईला साथ आहे जोतीची,अंधाराला साथ असते प्रकाशाची, चंद्राला साथ असते चांदण्याची, प्रेमाला साथ असते फ़क्त दोघांची.
६१ कोणाच्या तरी मनात घर करुन पहा. खरंच जीवनात एकदा तरी खरं प्रेम करुन पहा.
६२ जपण्यासारखं बरचं काही उद्यासाठी राखून ठेवलंयं ह्र्दयाच्या पंखावरती तुझंच नाव कोरुन ठेवलय.
६३ मुसळधार पाऊस... छत्री एकच हवेत गारवा...मनात अंगार पाऊस चिंबचिंब...भिजलेला कधी तुझ्या..मनात कधी माझ्या..मनात.
६४ माझे शब्द मला आता छळायला लागलेत मला वाटतेय आता तुला पण कळायला लागलंय.
६५ तू जवळ नसलीस की असं वाटतं तुझ्याबरोबर बरंच काही बोलावं पण तू जवळ आलीस की असं वाटतं तुझ्याखाद्म ऎक टक पाहतच रहावं.
६६ पाहिलं तुला पहिल्यांदा मनात माझ्या बसलीस काय करु मी तू माझी होशील.
६७ नजरेला नजर देतेस जाताना हसत जातेस प्रेमाची भाषा समजूनही गप्प का राहतेस?
६८ प्रेमाच्या हाकेला साद मिळाली स्वप्नांना वास्तवाची आस मिळाली मन माझं खुदकन हसलं तुझ्या डोळ्यांत जेव्हा माझं प्रेम दिसलं.
६९ तुला माहित आहे सखी मला तुझ्याशिवाय करमत नाही म्हणूनच असेल कदाचित तुला मला भेटणं जमत नाही.
७० मी तुझ्यावर प्रेम करतो,हे ओठावर आणता येत नाही,प्रेम असंच असतं,हे शब्दातही सांगता येत नाही.
७१ भूत,भविष्य,वर्तमान यात तुझ्याच आठवणींची स्पर्धा आहे कारण माझ्या आयुष्यात व्याकरणात तूच क्रियापद,कर्म आणि कर्ता आहे मला वाटतं तू रुसल्यावर मी हळवी समजून काढावी तुझ्या गालावरती खळी मग माझ्या ओठावर दडावी.
७२ तुला राग आला कि तू दिसतोस छान पण एकटक पाहत राहिले की,खाली झुकवतोस मान तुझ्या माझ्या जीवनात एक दिवस असा येणार आहे तुझी आई माझी सासू व माझी आई तुझी सासू होणार आहे.
७३ शरीर आहे, पण आकार नाही डोकं आहे पण अक्कल नाही.
७४ असंच तू माझ्या डोळ्यांतं पाहावं आणि मी तुझ्या अस़चं तू माझ्या डोळ्यांत पाहावं आणि मी तुझ्या पाहत पाहत दोघांनी आंधळं व्हावं,कारण प्रेम हे अंधळच असतं म्हणतात ! कसं सांगू तुला किती जड झालंय जगायला एकेक महिना तुझा चेहरा नाही मिळत बघायला.
७५ स्वप्न तुझे असले तरी स्वप्नात मी असू दे,पाऊल तुझे असले तरी गंध माझा असू दे.
७६ तुझ्यापुढं मला हे जगच वटतं लहान,जिथं आहे तुझे प्रेम महान, म्हणून्च माझं आयुष्य तुझ्यापुढं टाकलं मी गहान.
७७ भिडते जेव्हा नजरेला नजर तेव्हा तुझाच विचार मानात असतो,तू माझ्याशी स्पष्ट कधी बोलशील मी त्याचीच वाट पाहत बसतो.
७८ तू रोज माझ्या समोरुन जातेस,पण हिम्मत होत नाही बोलण्याची,मनात तू आहेस खरी पण भिती वाटते आय लव्ह यू म्हणण्याची.
७९ असा दिवस उजाडतो असा दिवस मावळतो प्रिय.........तुला पाहण्यासाठी जीव माझा तळमळतो तुझा हसरा तो चेहरा मन माझं मोहून टाकतो माझ्या प्रेमाचं प्रतीक मी तुला पुण्यनगरीमध्ये देतो.
८० मनातलं काही तरी सांगायचं पण सांगायचं होत नाही,अबोला धरशील म्हणून बोलणंच होत नाही.
८१ तुझं हसणं आणि माझं फ़सणं दोन्ही एकाचवेळी घडलं नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.
८२ ख-या प्रेमाला खोली असते ते खळखळत वाहात नाही,जात-पात,धर्म,पैसा ते कधीच पाहत नाही.
८३ वर्षाच्या प्रत्येक महिन्याला.....महिन्याच्या प्रत्येक आठवड्याला आठवड्याच्या प्रत्येक दिवसाला दिवसाच्या प्रत्येक तासाला तासांच्या प्रत्येक मिनिटाला मिनिटांच्या प्रत्येक सेकंदाला आठवण येते तुझी मला प्रत्येक क्षणा- क्षणाला.
८४ साथ मागतो जन्माची नको नुसत्या क्षणांची त्यासाठी गरज आहे फ़क्त तुझ्या होकरची !
८५ इंटरव्ह्युसाठी गेलेल्या एका तरुणाला निवड समितीच्या एका सदस्यानं विचारलं - माझं तुझ्यावर प्रेम आहे.असं कावळा कावळीला कसं सांगेल ? तरुणानं उत्तर दिलं - काव....काव....काव....! ही भाषा समजून घे ! श्रावणातल्या सरीसारखं तुझं येणं जाणं आणि पागोळीच्या पाण्यासारखं तुझं उरुन राहणं.
८६ युध्दात आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असतं पण महागाईच्या या जगात युद्धा आणि प्रेम टिकवणं अक्षम्य असतं.
८७ मी दिवस संपण्याची वाट बघतो कारण रात्री ओढ असते मी रात्रीची वाट पाहतो कारण रात्र  स्वप्नांची असते मी स्वप्नांची वाट पाहतो कारण स्वप्नात तुझी ओढ असते मी त्या भेटीची वाट पाहतो तू माहीत असतेस मी तुझी वाट पाहातो कारण तुझ्याशिवाय मी कोणीच नसतो.
८८ मनात तू,दिलात तू, फ़ुलात तू,दंवात तू ह्रदयाच्या प्रत्येक स्पंदनात तू!
८९ समक्ष तर एक शब्दही बोलत नाहीस,मग स्वप्नात कशी येतेस मनमोकळ्या गप्पा मारायला ?
९० सुखदुःखाच्या वळणावरती निर्भय होऊनी येशील का ? ताण मनातला तुझा झुगारुनी साथ तुझी मज देशील का ? गळून पडतील दुःखे सारी रममाण माझ्यात होशील का?
९१ प्रेम असते सर्वत्र पसरलेल्या क्षमाशील धरतीसारखे प्रेम असते कुठेही न थांबता संथ वाहणा-या नदीसारखे,प्रेम असते निखळ सौंदर्य दाखविणा-या स्वच्छ,सुंदर आरश्यासारखे प्रेम असते तुडुंब भरलेल्या अथांग सागरासारखे प्रेम असते स्वतंत्र फ़िरणा-या आकाशातील पक्षासारखे, प्रेम असते ईश्वराचे अस्तित्व दाखवणा-या समईतील ज्योतीसारखे,प्रेम असते अपार सावली देणा-या विशाल वटवृक्षासारखे म्हणूनच आयुष्यात एकदा तरी प्रेम करावे आणि प्रेमरुपी जीवन जगावे.
९२ केल्याने होत नाही,पैशाने मिळत नाही तेच प्रेम होय त्यात जग दिसत नाही,जे कुणाला भीत नाही तेच प्रेम होय तोडल्याने तुटत नाही,जे कधी मरत नाही तेच प्रेम होय ज्याची श्रद्धा मनात आहे,ज्याचा आनंद त्यात आहे तेच प्रेम होय.
९३ मी  आपला येडा खुळा बोलतो दिल खुलास पण जीव जडलाय माझा तुझ्यावर,आहे का तुला त्याचा आभास !
९४ जे तुला जाणवतं मलाही जाणवतं पण व्यक्त  होत नाही त्या अव्यक्त भावनेस माझा गोड सलाम !
९५ मलाच उमगेना तू समीप की तू दूर कधी बोलशील याचीच लागलीय हुरहुर !
९६ कितीही रागावलीस तरी मी तुझ्यावर रागावणार नाही,कारण तुझ्याशिवाय मी कुणावर प्रेम करणार नाही.
९७ करु नकोस घाई विचार कर थोडा,दिसेल का शोभून तुझा न तिचा जोडा.
९८ प्रेम हसत करायचं असतं,मनाला वळण लावायवं असतं,यातच सगळं असतं.
९९ ठाऊक आहे मला चोरुन मला बघतेस याचा अर्थ काय समजू मी प्रिये ?
१०० आजार आहे तुझ्या प्रेमाचा औषध नको,फ़क्त होकार दे !
 
www.shreeyoginfo.com
2007-09 All Rights Reserved