|
१ |
तुझ्याशिवाय जगणं काय जगण्याचं स्वप्नसुध्दा पाहू शकत
नाही,श्वासाशिवाय काही क्षण मी जगू शकतो,पण तुझ्याशिवाय एकही क्षण जगू शकत नाही. |
२ |
तुझ्यावर रागवणं तुझ्यावर रुसणं मला कधी जमलंच नाही कारण
तुझ्याशिवाय माझं मन दुस-या कुणात रमलंच नाही. |
३ |
एक पवित्र प्रेम होऊन गेलं पण ते तर शहाजहानचं होतं मलाही तसचं
करायचं होतं पण......मुमताजसारखं माझं कोणीच नव्हतं. |
४ |
ऋतू बदलत जातात दिवस उजाडतो,मावळ्तो सागरालाही येत राहते ओहोटी
आणि भरती बदलत नाहीत ती फ़क्त माणसा माणसांमधली अनमोल नाती...... प्रेमाची ! |
५ |
आठवणीत तू नजरेत तू ओठावरही तु्झेच नाव तुझ्यावर प्रेम करतो........
माझे नाव. |
६ |
तु येणार असताना मध्येच पावसावं येणं कळत नाही,पण तुझ्या
प्रेमाएवढा त्यात भिजण्याचा त्यात आनंद मिळ्त नाही. |
७ |
रातराणी उमलावी तशी उमलतेस,मनापासून दरावळतेस, खरं सांगू का तुला
मला तू खूप आवडतेस. |
८ |
एक मनी आस एक मनी विसावा तुझा चंद्र्मुखी चेहरा रोजच नजरेस पडावा
नाहीतर तो दिवसच नसावा. |
९ |
असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे.असे
असावे प्रेम केवळ सावलीतच नव्हे उन्हात साथ देणारे.असे असावे प्रेम केवळ सुखातच
नव्हे तर दुखातही साथ देणारे. |
१० |
प्रेम म्हणजे काय असतं ते मला ठाऊक नाही प्रेम म्हटल्यावर फ़क्त
तुझंच नाव दिसतं म्हणूनच ते मझ्यासाठी प्रेम असतं. |
११ |
तुला काहीतरी सांगावं मनात ब-याचदा येऊन गेलं.सांगणार होतो खूप
काही शब्दावाचून राहून गेलं. |
१२ |
प्रेमाचा वर्षाव नुकताच होवू लागलाय,कधी न जाणवणारा सुगंध
सभोवार दरवळू लागलाय. |
१३ |
पतंगला असते दो-याची साथ,झाडाला असते वेलीची साथ,तुझ्या हातात
हात करु नकोस विश्वासघात. |
१४ |
माझी कविता वाचताना......नेहमी डोळे गळतात,तिच्या आयुष्याचे धागे
म्हणे माझ्या जीवनाशी जुळतात. |
१५ |
पटकन हसणे पटकन रुसणे मोहक तुझी आदा
तुझ्या मोहक सौंदर्यावर आहे मी मनापासून फ़िदा.
|
१६ |
बोलत नाहीस पण हसतेस मी बघितले की लाजतेस नक्की प्रेम करतेस ?
का मला उगीचच कोड्यात असे टाकतेस. |
१७ |
तू मिळाल्यावर सुध्दा परमेश्वराचा राग आला सुंदर दान पदरात
टाकयला त्याने किती उशीर केला. |
१८ |
तू चिंब भिजल्यावर तुझ्या गालावरचे थेंब गालावरच राहायला
तरसता,क्षणभर का होईना ते गुरुत्वाकर्षण विसरतात. |
१९ |
सग्ळं तुला देऊन पुन्हा माझी ओंजळ भरलेली पाहिलं तर तू तुझी
ओंजळ माझ्या ओंजळीत धरलेली ! |
२० |
मनात तुझ्या नसतानाही मागे वळून पाहशील का ? तुझ्याचसाठी थांबलो
इथे दोन शब्द बोलशील का ? पाहून पाहून दमलो मी अखेर तू पाहशील का ? कोंडल्या
भावना,वाट देशील का ? स्वप्न पाही मन माझं तुझंही असच होतं का ? मनात तुझ्या
नसतानाही कबुल तू करशील का ? |
२१ |
समुद्रकाठी बसणारे लोकं सर्व वेडे असतात मात्र खरे प्रेम करणारे
लोकं फ़ार थोडे असतात. |
२२ |
प्रेम एक आठवण आहे हळूवारपणे जीवलग माणसाशी ह्रदयात केलेली
साठवण आहे. |
२३ |
वेड्या मित्राची प्रीत कधी कळलीच नाही तुला तुझ्या प्रीतीची
छाया कधी मिळालीच नाही मला. |
२४ |
काही नाती जोडली जातात,कही जोडावी लागतात काही जपावी लागतात तर
काही आपोआप जपली जातात यालाच प्रेम म्हणतात ! |
२५ |
येणा-या प्रत्येक सावळीत तुझाच भास आहे,तू येशील अशी उगीचच आस
आहे. |
२६ |
तुझ्याशिवाय दुसरीचा विचार करणे ही कल्पनाच सहन होत नाही कारण
तुझ्याशिवाय मझ्या मनात इतर कोणालाही स्थान नाही. |
२७ |
ह्रदयात तू नजरेत तू ओठावर तुझेच नाव तुझ्यावर प्रेम करते
मी.....माझे नाव. |
२८ |
निळाईच्या गर्द ह्रदयात एकदातरी सामावून घेशील क ? आकाशाचं
स्वप्न नको मला एकदातरी आपलं म्हणशील का ?
|
२९ |
काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो निखळणा-या प्रत्येक ता-याजवळ
तुलाच मागत होतो. |
३० |
तेज असावे सूर्यासारखे प्रखरता असावी चंद्रासारखी शीतलता असावी
चांदण्यासारखी प्रेयशी असावी तर तुझ्यासारखी. |
३१ |
प्रेम नसावे कापरासारखे झुर्रकन उडून जाण्यासारखे प्रेम असावे
अत्तरासारखे आयुष्यभर दरवळत रहण्यासारखे. |
३२ |
एकांत क्षणी...कधी तरी असं वाटतं कुणीतरी आपलं असावं दुखाःच्या
क्षणी हसवावं आणि सुखाच्या क्षणात मार्गावर व्हावं. |
३३ |
तू म्हणजे तूच आहेस,मी म्हणजे मी तुझाच आहे जन्मभर राहिली साथ
आपुली हीच प्रेमाची हमी आहे रुसणे,रागावणे मला चालणार नाही,तुझ्या गुलाबी गालावर
ओठाने स्पर्श करणार नाही. |
३४ |
प्रेम आहे निशब्द शाब्दांनाही न सापडणार प्रेम आहे गुपित
कुणालाही न उलगडणारं प्रेम आहे भावनिक स्पर्शालाही न कळणारं प्रेम आहे जीवन मरणानेही
न संपणार. |
३५ |
तुझ्या चेह-यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे.म्हणूनच माझ्या
मनाची तुझ्याकडं ओढ आहे.तुझ्या अबोलपणाचं कारण माझ्यावरील राग आहे. मग मीही अबोलाच
राहतो तसं राहणं मला भाग आहे. |
३६ |
जळण-या वातीला प्रकाशाची साथ असते नेहमी माझ्या मनात तुला
भेटण्याची आस असते. |
३७ |
प्रेम फ़ार उतू गेलं की त्याला जपावं लागतं जपताना त्याला
गोंजारावं लागतं. |
३८ |
मला आवडतो पाऊस गुलमोहराला फ़ुलवणारा आणि तेवढ्याच मायेने
बाभळीलाही झुलवणारा. |
३९ |
डोळे मिटले की तू दिसतेस डोळे की हे जग तुला मी दिसतो का
जरा डोळ मिटून बघ. |
४० |
तसे प्रत्येकाला वाटते की सुखात सहभागी होणारा,दुःखात पाठीशी
असणारा,संकटात हातात हात धरणारा,असा एक लाईफ़ पार्टनर असावा जसा तुझ्यासारखा. |
४१ |
संशय मनात रुतून बसतो तोच खरा घातक असतो या संशयाला लवकर दुर
कर आणि प्रेम वेड्या.......च्या ह्रदयात उभार प्रेमाचं घर. |
४२ |
झुरायचं असतं,लपत छपत भेटायचं असतं,रुसत फ़ुगत रहायचं असतं,कळत
नकळत रडायचं असतं आयुष्य असंच लोटायचं असतं जीवन असचं जगायचं असतं. |
४३ |
मना मनातून आज उजळले आनंदाचे लक्षदिवे समृध्दीच्या या नजरांना
घेऊन आले वर्ष नवे ! |
४४ |
माझ्याकडे बघुन
जेंव्हा एखादे फ़ूल
हसते खरे सांगू......त्यात
मला तुझे रुप दिसते. |
४५ |
मला बोलायचयं तुझ्याशी थोडं पण तुला समजेल की नही हेच पडलंय मला
मोठ कोडं ! |
४६ |
प्रेम असते सर्वत्र पसरलेल्या क्षमाशील धरतीसारखे प्रेम असते
कुठेही न थांबता संथ वाहणा-या नदीसारखे,प्रेम असते निखळ सौंदर्य दाखविणा-या
स्वच्छ,सुंदर आरश्यासारखे प्रेम असते तुडुंब भरलेल्या अथांग सागरासारखे प्रेम असते
स्वतंत्र फ़िरणा-या आकाशातील पक्षासारखे, प्रेम असते ईश्वराचे अस्तित्व दाखवणा-या
समईतील ज्योतीसारखे,प्रेम असते अपार सावली देणा-या विशाल वटवृक्षासारखे म्हणूनच
आयुष्यात एकदा तरी प्रेम करावे आणि प्रेमरुपी जीवन जगावे. |
४७ |
कोण होती ती ? जी हृदयात घर करुन गेली कधी उघडले नव्ह्ते
जे,दार ते उघडून गेली. |
४८ |
प्रेम कर असं अगदी माझ्यासारखं प्रेमासाठी मार चंद्रावर उडी आणि
मोडून घे स्वतःची तंगडी प्रेमासाठी जरी केलास जरी कोणाचा खून तरी पळून जाऊ नको भिऊन
प्रेमासाठी काढ अंगातील रक्त पण प्रेमातून होवू नको विरक्त प्रेम कर असं अगदी
माझ्यासारखं प्रेयसी म्हणाली,माझ्यासाठी जीव दे तरी तिचं म्हणणं खरं होऊ दे तरी तिचं
म्हणणं खरं होऊ दे......दिवस - रात्र कर फ़क्त तिचेच विचार अभ्यासाचा मात्र करु
नको प्रचार अभ्यास आपल्याला कधीही करता येईल.पण प्रेयसीला मात्र एकदाच मिळवता येईल. |
४९ |
प्रेमाचे गुंतवून धागे दूर अशी जाऊ नकोस, मलासुध्दा मन आहे हे
विसरुन जाऊ नकोस. |
५० |
गाणा-या पक्षाला विचार झुळझुळणा-या वा-याला विचार झगमगत्या ता-याला
विचार उसळत्या दर्याला विचार सारे तुला तेच सांगतील मी फ़क्त तुझ्यावरच प्रेम करतो. |
|