पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे

 

पान नंबर

१०

११

१२

१३

१४

१५

१६

१७

१८

१९

२०

२१

२२

२३

२४

२५

२६

२७

२८

२९

३०

३१

३२

३३

३४

३५

३६

३७

३८

३९

४०

४१

४२

४३

४४

४५

 

 

 

पतीने पत्निचे नाव घेण्याचे उखाणे
 
पान नंबर

 

 

 

पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे

१०१

नागपंचमीच्या सणी सख्या पुजती वारुळाला
----- रावांविना शोभा नाही वैभवाच्या देऊळाला

१०२

पोपटाची हाक ऐकून मैना लागली डाळींब सोलायला

----- रावांचे नाव घेऊन मी लागले माणिकमोती वेचायला

१०३

साता-याचे पेढे, नाशिकचा चिवडा
----- रावांची निवड हाच माझा निवाडा

१०४

व्रुंदावनी कोणी बाई तुळस लाविली
----- रावांच्या संसारात आहे शीतल सावली

१०५

ध्येय, प्रेम, आकांक्षांची जिथे होतसे पूर्ती
अशा ----- रावांची माझ्या मनी मूर्ती
१०६ अमेरीकेत आहे न्यायदेवतेचा पुतळा
----- रावांचे नाव घेते मला सांभाळा
१०७ उगवला सायंतारा, रातराणी बहरली
----- रावांचे नाव घेते वरात दारी आली
१०८ स्वप्नपूर्तीच्या क्षणी आळविते केदार
----- रावांच्या मुळे मला मिळाले घरदार
१०९ सावळ्या ढगांना सोनेरी कडा
----- रावांच्या हातांचा माझ्याभोवती वेढा
११० प्रेमरुपी नंदादिपात लावते प्रितीची फुलवात
----- रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात
१११ इग्रंजी भाषेत भिंतीला म्हणतात वाँल
---- रावांच्या नावाने कुंकु लावते लाल
११२ अशोकवनात लावली केळी
----- रावांचे नाव घेते संध्याकाळच्यावेळी
११३ यमुनेच्या काठी क्रुष्ण खेळत होता खेळ
----- रावांचे नाव घेते संध्याकाळचीवेळ
११४ इग्रंजी भाषेत चाकुला म्हणतात नाईफ
----- राव माझे हजबन्ड मी त्यांची वाईफ
११५ गुलाबाचे झाड फुलांनी वाकले
----- रावांमुळे सासरी पाऊल टाकले
११६ लग्नप्रसंगी लोक करतात आहेर
----- रावांसाठी सोडले आईवडिल अन माहेर
११७ अमरावतीच्या अंबादेवीला सोन्याचा साज
----- रावांबरोबर शुभमंगल झाले आज
११८ पाटल्या केल्या हात दिसे सवाई
वडिलांनी माझ्या ----- रावांना केले जावई
११९ जोडवी केली,  तोरडया केल्या, नथ केली जाईची
----- रावांसाठी आशा सोडली मी माझ्या आईची
१२० मिठाचा सत्याग्रह झाला समुद्राकाठी
----- रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी