पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे

 

पान नंबर

१०

११

१२

१३

१४

१५

१६

१७

१८

१९

२०

२१

२२

२३

२४

२५

२६

२७

२८

२९

३०

३१

३२

३३

३४

३५

३६

३७

३८

३९

४०

४१

४२

४३

४४

४५

 

 

 

पतीने पत्निचे नाव घेण्याचे उखाणे
 
पान नंबर

 

 

 

पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे

४०

आशिर्वादाची फुले वेचते वाकुन
------- रावांचे नाव घेते आपला मान राखून

४१

दत्तात्रयाचा अवतार ब्रम्हा, विष्णू, महेश्वर

------- रावांशी जुळले जीवनावे स्वर

४२

दया, क्षमा, शांती हेच सतीचे माहेर
------- रावांच्या चरणावर केला पंचप्राणांचा आहेर

४३

गौतमाची गौतमी, वसिष्ठांची अरुंधती
------- रावांची मी सौभाग्यवती

४४

ह्रदयरुपी शिंपल्यात प्रितीचे पाणी
------- रावांच्या नावाने बांधले मंगळमणी
४५ मंगळसुत्र हा सौभाग्याचा अलंकार
------- रावांच्यासह ध्येय आशा होवोत साकार
४६ मंगळसुत्राच्या वाटीत संगम सासर माहेरचा
------- रावांचे नाव घेऊन मान राखते सर्वांचा
४७ देवीच्या देवळात भोपी खेळतो पोत
------- रावांनी बांधली माझ्या गळयात मंगळसुत्राची पोत
४८ मंगळसुत्र हेच बायकांचे लेणे
------- रावांकरिता स्विकारले ------- घराणे
४९ अलंकारात अलंकार श्रेष्ठ मंगळसुत्र
------- रावांच्या हाती माझे जीवनसुत्र
५० शिवाजीसारखा राजा गादीवर बसावा
------- रावांचे नाव घेते आशिर्वाद असावा
५१ भाऊबीजेच्या दिवशी भाऊरायाला ओवाळीन
------- रावांचे नाव घेते --------- ची बहिण
५२ अत्तरदाणी गुलाबदाणी विडे ठेवले करुन
------- रावांना माळ घातली कुलदेवतेला स्मरुन
५३ सौभाग्यवतीचा अलंकार म्हणजे काचेचे चूडे
------- रावांचे नाव घेते मंगळागौरीपुढे
५४ गुलाबाचे फुल गणपतीला वाहिले
------- रावांचे जीवनासाठी पुणे शहर पाहिले
५५ सांबाच्या पिंडीला बेल वाहिला हिरवागार
आणि ------- रावांच्या जीवासाठी केला संसार
५६ मोत्याचे पेले पाहून चंद्र सुर्य हसे
जमलेल्या मंडळीत ------- राव खासे
५७ काळया चंद्रकलेवर ता-यांसारख्या टिकल्या
------- रावांच्या मळयात खूप तूरी पिकल्या
५८ सागवान पेटीला सोन्याची चूक
------- रावांच्या हातात कायदयाचे बूक
५९ लहानश्या भिंती चित्रे काढू किती
सासुबाईच्या पोटी -------- राव मोती