पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे

 

पान नंबर

१०

११

१२

१३

१४

१५

१६

१७

१८

१९

२०

२१

२२

२३

२४

२५

२६

२७

२८

२९

३०

३१

३२

३३

३४

३५

३६

३७

३८

३९

४०

४१

४२

४३

४४

४५

 

 

 

पतीने पत्निचे नाव घेण्याचे उखाणे
 
पान नंबर

 

 

 

पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे

३४०

इंद्रधनुष्यात असतात सप्तरंग
------- रावांच्या संसारात मी आहे दंग

३४१

शिक्षणाने विकसीत होते संस्कारीत जीवन

------- रावांच्या संसारात राखीन मी सर्वाचे मन

३४२

सासरी आहे माझ्या सुंदर हिरवा मळा
------- रावांमुळेच लागला मला त्यांचा लळा

३४३

मला गूणवान पती मिळाले याचा वाटतो प्रत्येकाला हेवा
------- राव माझ्या जीवनातील मौल्यवान ठेवा

३४४

आज सारे सुख माझ्या दारी दाटले
------- रावांचे प्रेम अजून तरी नाही आटले
३४५ मी नव्हती सुंदर तरी मला निवडले
------- रावांचे हेच रुप मला फार आवडले
३४६  तळहातावर मेंदी रचली, त्यावर तेलही शिंपडले
------- रावांचे मन मी केव्हाच जिंकले
३४७ केसात माळते मी रोज गुलाबाचे फुल
------- राव माफ करतात माझी प्रत्येक भुल
३४८ पौर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल
------- रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल
३४९ ------- रावांच्या नावाने भरला मी हिरवा चूडा
त्यांच्यावर करेन मी प्रेमाचा सडा
३५० स्वातंत्र्याच्या होमकूंडात विरांनी घेतली उडी
------- रावांच्या नावाने घालते गळयात मंगळसुत्राची जोडी
३५१ नाजूक अनारसे साजूक तूपात मळावे
------- रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे
३५२ चंदेरी सागरात रुपेरी लाटा
------ रावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा
३५३ पौषातील धुंद वारा छेडितो माझ्या अंगाला
------- रावांचे नाव घेते सूर्यनारायणाच्या साक्षीला
३५४ दीनदुबळयाचे गा-हाणे परमेश्वरांनी ऐकावे
------- रावांसारखे पती मिळाले आणखी काय मागावे
३५५ ग्रुहकामाचे शिक्षण देते माता
------ रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाकरीता
३५६ शरदाचे संपले अस्तित्व, वसंताची लागली चाहूल
------- रावांच्या संसारात टाकते पहिले पाऊल
३५७ वेळेचे कालचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस
------- रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस
३५८ अंगणात होती मेथी पाणी घालू किती
------- रावांच्या हातात सत्यनारायणाची पोथी
३५९ डाळिंब ठेवले फोडून संत्र्याची काढली साल
------- रावांच्या नावाने कुंकु लावते लाल