१०१ सर्वच गोष्टी सांगायच्या नसतात ज्या गोष्टी न सांगता समजतात त्याला वेडं प्रेम म्हणतात.
१०२ शाहजाहाने बांधलेला ताजमहाल सर्वांना दिसतो, मी मनात बांधलेला तुझ्या प्रेमाचा ताजमहाल तुला का दिसत नाही ?
१०३ एकदा तरी सपनात तू सजून यावंस म्हणूनच केलय म्या खंडोबाला नवस.
१०४ जे जोडले ते नाते जी जोडली ती सवय जी थांबते ती ओढ जे वाढते ते प्रेम जो संपतो तो सहवास आणि निरंतर राहतात त्या आठवणी.............
१०५ सांगण्यासाठी तुला किती करतो गृहपाठ पण मन ही असं भित्र समोर तू अलीस की,मनातलं सगळं सपाट !
१०६ क्षणभर जरी दिसली नाहीस तर जिवाची नुसती तगमग,दिसलीस की दिलाची धकधक हे असं का होतं कळेना,प्रेम ज्याला म्हणतात,ते हेच तर नाही ना ?
१०७ तुला माझ्या मनातील भावना कळल्या नाहीत, जेव्हा तुला कळतील तेव्हा ती वेळ गेलेली असणार म्हणून म्हणतो परत विचार कर आणि मला सांग मी वाट पहात राहीन.
१०८ तू आहेस म्हणून मी आहे,तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे,तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि तूच शेवट आहेस.
१०९ धरणी सांगे आकाशाला मी तर तुझी मुर्ती रे तुझ्या सावळीत मी हरवले माझी सर्व किर्ती रे आसमंत उधळून देउन उजळून टाकल्या भूमंताचा साज चमत्कार तुझे हे अप्रतम जणू स्वर्गाचा होऊल भास.
११० तुझ्याकडं पाहीलं की चंद्राला तुझी उपमा द्यावी की तुला चंद्राची उपमा द्यावी याचंच मला कोडं पडतं !
१११ तू मला सवाल केलास,भेटेल का गं उदात्त प्रेम ? समज,तसं प्रेम भेटलंच तर तू जागशील त्याला याचा काय नेम ?
११२ काय अर्थ तुझ्या तारुण्याला ज्याला प्रेम म्हणजे काय तेच मुळात कळत नाही.
११३ नात्यातले आपले बंध कसे शुभेच्छांनी बहरुन येतात उधळीत रंग सदिच्छांचे शब्द शब्दांना कवेत घेतात.
११४ तुझी स्वप्नं बघायला रात्र पुरत नाही अजमावून तर बघ माझ्या ह्र्दयात तुझ्याशिवाय दुसरं कुणीच नाही.
११५

गालावरती खळी तुझ्या लावी वेड मला काय सांगू तुला कसं कसं होतंय मला!

 

११६ प्रत्येकवेळी वाटतं माझे प्रेम तुला कळावं जसं चकोराला वाटतं सारे चांदणं आपण गिळावं.
११७ तू नाही माझ्या नजरेत मावत,तूलाच तुझ्या नजरेत सामावून घे!
११८ फ़ुलांचा जसा वर्षाव होतो असं तू येताना वाटतं मग तुला त्या फ़ुलांनी रोखावं असं तू जाताना वाटतं.
११९ नजरेत तुला घेईन मी ह्रदयात तुला कैद करेन तू फ़क्त माझी हो तुला फ़ुलासारखी जपून ठेवेन!
१२० कधी एकटा असताना खिन्न होऊन विचार करीत असतो तुझाच विचार करीत असतो आणि अचानक् धूरात तुझा हसरा चेहरा साकार होतो.
१२१ तुझे मन आरशासारखे स्वच्छ आहे,दुधासारखे व पाण्यासारखे निर्मळ आहे म्हणूनच .....तुझ्यावर फ़िदा आहे.
१२२ पाण्यासारखा निर्मळ  कलासारखी सुंदर हळालीसारखी हळवळ पक्ष्यासरखी उडणारी कोकीळासारखी गाणारी मनातल्या मनात गुणगुणणारी अशी ती राहुलची राणी !
१२३ येता - जाता सतत हसतेस दिल खुलास फ़क्त प्रेमाचाच माझ्या तुला प्रेमाचा का होत नाही आभ्यास ?
१२४ तू दिसतेस खूप छान,तू हासतेस खूप छान,याला एकच उपाय शुभमंगल सावधान,तुझ्या आणि माझ्या प्रेमाला गंध कस्तुरीचा असावा जीवनातील प्रत्येक  क्षण तुझ्याच सहवासात जावा.
१२५ एक क्षण तुझ्या सहवासात असलेला,एक क्षण तुझ्या विरहात रुसलेला,एक क्षण तुझ्या प्रतिक्षेत बसलेला,एक क्षण तुझ्या आठवणीने फ़ुललेला,एक क्षण तुझ्या बरोबर हसलेला,माझ्या हृसयात मात्र खोलवर ठसलेला असा माझा एक क्षण तुझ्याचसाठी जगलेला जणू चंदनाप्रमाणे..........
१२६ मुसळधार पावसाला मी जरा सुद्धा घाबरत नाही पण तुझा आश्रू मात्र दुरुनही पाहावत नाही फ़ील माय लव्ह.
१२७ मी तुला बघतो म्हणून तु मला बघून तोंड फ़िरवतेस माझं लक्ष नसताना मात्र बघतेस प्रेम करते तर का बरं घाबरतेस.
१२८ सूर्य वंशज तू तुझ्या नसण्याने रात्री अमावश्या भासते,तुझ्या उजळण्याने उन्हातही चांदणे फ़ुलते.
१२९ किती प्रयत्न केले मी तुझे प्रेम मिळाया पण लागला तुला वेळ किती प्रेम माझे कळाया ऋतुमागून ऋतू गेले, वर्षामागून वर्ष,अजूनही माझ्या मनात तुझे स्वागत आहे सहर्ष ! फ़ुल आहे गुलाबाचं काट्यांना काय भ्यायचं प्रेम आहे आपल्या दोघाचं दुनियेला काय घाबरायचं.
१३० किती काळ राहशील दुर नाही जाणीव तुला माझ्या मनाची तूच सांग रखशील का लाज माझ्या प्रेमाची.
१३१ तू सोबत असलीस की, मला माझाही आधार लागत नाही तू फ़क्त सोबत रहा,मी दुसरं काही मागत नाही.
१३२ एक वेळ तू दुनिया जिंकशीलही,पण मला....नाही जिंकू शकणार !
   
   
   
   
   
   
   
   
 
www.shreeyoginfo.com
2007-09 All Rights Reserved